World Cup 2023 semi-final scenario: सेमी फायनलमध्ये पोहचण्यासाठी भारताला आणखी किती विजय आवश्यक? जाणून घ्या गणित..
World Cup 2023 semi-final scenario: टीम इंडियाने वर्ल्डकप 2023 (world Cup 2023) मध्ये दमदार सुरुवात केली आहे. सुरुवातीचे तिन्ही सामने दिमागदार पद्धतीने जिंकत या स्पर्धेत आपणच प्रबळ दावेदार असल्यास भारतीय संघाने दाखवून दिले. असं असलं तरी सेमी फायनलचे गणित तितकसं सोपं नाही. या वर्ल्ड कपमध्ये प्रत्येक संघाला एकमेकांविरुद्ध खेळायचे आहे. प्रत्येक संघाचे एकूण नऊ सामने होणार आहेत. त्यामुळे सेमी फायनलमध्ये पोहोचण्यासाठी प्रत्येकाला समान संधी आहे. (World Cup 2023 semi-final scenario)
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (Australia and England) या दोन संघांना अपेक्षाप्रमाणे या विश्वचषकात सुरुवात करता आली नाही. भारतापेक्षाही अधिक या दोन्ही संघांना प्रबळ दावेदार घोषित करण्यात आलं होतं. यामध्ये अनेक दिग्गजांचा समावेश होता. मात्र तिन्ही सामन्यात या दोन्ही संघांना दोन पराभवाला समोर जावे लागले. विशेष म्हणजे इंग्लंड संघाला अफगाणिस्तान संघाने पराभवाची धूळ चारली. त्यामुळे ही स्पर्धा आणखीनच रंगतदार अवस्थेत आली आहे.
भारतीय संघाने या विश्वचषकामध्ये दमदार सुरुवात केली असती तरी सेमी फायनलमध्ये पोहोचण्यासाठी भारतीय संघाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. तीन सामन्यात तीन विजय मिळवून भारतीय संघ अव्वल क्रमांकावर आहे. भारत-न्यूझीलंड दक्षिण आफ्रिका (India, South Africa, and newzealand) हे तीन संघ अनुक्रमे पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
दक्षिण आफ्रिकेने आतापर्यंत या स्पर्धेत केवळ दोन सामने खेळले आहेत. या दोन्हीं सामन्यात त्यांनी श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाला पराभवाची धूळ चारली आहे. आज दक्षिण आफ्रिका नेदरलँड विरुद्ध खेळणार आहे. आजच्या विजयाबरोबर दक्षिण आफ्रिका गुणतालिकेत अव्वल स्थानावर झेप घेईल.
भारतीय संघाचे या स्पर्धेतील सहा सामने शिल्लक आहेत. यामध्ये दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि इंग्लंड या बलाढ्य संघांचा समावेश आहे. याशिवाय बांगलादेश, श्रीलंका आणि नेदरलँड हेही संघ आहेत. या तीन संघाबरोबर भारतीय संघाला विजय मिळवणे तितकसं अवघड जाणार नसल्याचे चित्र आहे. मात्र या तीन संघांविरुद्ध भारतीय संघाला विजय मिळवावाच लागेल. तरच भारतीय संघ सेमी फायनलमध्ये प्रवेश करू शकतो.
म्हणजेच जर दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि इंग्लंड या तिन्ही संघाविरुद्ध भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला, तरी देखील भारतीय संघ सेमी फायनलमध्ये पोहचू शकतो. मात्र त्यासाठी श्रीलंका, बांगलादेश, आणि नेदरलँड संघाविरुद्ध भारतीय संघाला विजय मिळवलाच लागेल. दक्षिण आफ्रिका न्युझीलंड आणि इंग्लंड या तीन संघांपैकी एका संघाविरुद्ध जर भारतीय संघाला विजय मिळवता आला, तर भारतीय संघ सेमी फायनल मधील आपले तिकीट निश्चित करेल.
हे देखील वाचा AUS vs SL: अंपायरने LBW आऊट दिले, अन् डेव्हिड वॉर्नरने हासडली शिवी; व्हिडिओही झाला व्हायरल..
Flipkart sale: दमदार कॅमेरा, 8GB रॅम असणारे हे चार भन्नाट स्मार्टफोन Flipkart वर मिळतायत फक्त..
Saif Ali Khan: ..म्हणून त्यावेळी अमृता सिंगने सैफ अली खानला दिल्या होत्या झोपेच्या दोन गोळ्या..
ENG vs AFG: इंग्लंडच्या पराभवाने ऑस्ट्रेलियाला संजीवनी; जाणून घ्या कोण जाणार सेमीफायनलमध्ये..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम