AUS vs SL: अंपायरने LBW आऊट दिले, अन् डेव्हिड वॉर्नरने हासडली शिवी; व्हिडिओही झाला व्हायरल..

0

AUS vs SL: श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया (AUS vs SL) यांच्यामध्ये काल खेळल्या गेलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला. या विजया बरोबरच ऑस्ट्रेलियाने विश्वचषक 2023 मध्ये आपल्या विजयाचे खाते उघडले आहे. पहिल्या दोन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर, ऑस्ट्रेलिया संघाचा सेमी फायनलचा प्रवास खडतर झाला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचे खेळाडू संयम गमावताना पाहायला मिळत आहेत. काल डेव्हिड वॉर्नर (David Warner) बाद झाल्यानंतर, तर त्याने थेट अंपायरलाच शिवीगाळ केली. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.

उर्वरित सहा सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाला सेमी फायनलमध्ये पोहोचण्यासाठी पाच विजय आवश्यक आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचे खेळाडू चांगलेच आक्रमक असल्याचे पाहायला मिळत आहे. उर्वरित सहा सामन्यामध्ये ऑस्ट्रेलिया संघाला इंग्लंड, न्यूझीलंड आणि पाकिस्तान अशा बलाढ्य संघांचा सामना करायचा आहे. काल ऑस्ट्रेलियाने श्रीलंके विरुद्ध आपल्या पहिल्या विजयाची नोंद केली. मात्र विजयाबरोबर डेव्हिड वॉर्नरच्या कृत्यामुळे या सामन्याला गालबोट देखील लागले.

श्रीलंका संघाच्या सलामीवीरांनी दमदार सुरुवात करून दिली होती. मात्र 20 षटकानंतर श्रीलंकेचे फलंदाज ठराविक अंतराने बाद होत गेले. एकवेळ श्रीलंका संघाने 21.4 षटकात बिनबाद 125 धावा केल्या होत्या. मात्र त्यानंतर 125 वरून श्रीलंकेचा डाव केवळ 210 धावांत संपुष्टात आला. 211 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या सलामवीरांना चांगली सुरुवात करता आली नाही. डेविड वॉर्नरने षटकार लगावला, मात्र त्यांनतर दिलशान मधूशंकाने पायचीत करत त्याला बाद केले.

अंपायरने बाद दिल्यानंतर, मात्र वॉर्नरचा पारा चांगलाच चढला. मागचा पुढचा कोणताही विचार न करता डेव्हिड वॉर्नरने थेट अंपायरला शिवीगाळ केली. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. पाच चेंडूत 11 धावांवर खेळत असताना चेंडू वॉर्नरच्या पायाला जाऊन आदळला. दिलशानने जोरदार अपील केली. आणि अंपायरने आउट दिले.

अंपायरने आऊट दिल्यानंतर असहमती दर्शवत वॉर्नरने DRS ची मागणी केली. मात्र DRS मध्ये अंपायर कॉल असल्याचं स्पष्ट झालं. अंपायरने बाद दिले असल्याने अंपायरचा निर्णय कायम ठेवण्यात आला. मात्र या निर्णयामुळे वॉर्नर चांगलाच संतापला. आणि त्याने थेट मैदानावर शिवीगाळ केली. बाद झाल्याने वॉर्नरला इतका राग अनावर झाला होता की, त्याने पवेलियनमध्ये जात असताना अनेकदा पाठीमागे पाहत आपला राग व्यक्त केला.

हे देखील वाचा Flipkart sale: दमदार कॅमेरा, 8GB रॅम असणारे हे चार भन्नाट स्मार्टफोन Flipkart वर मिळतायत फक्त..

Saif Ali Khan: ..म्हणून त्यावेळी अमृता सिंगने सैफ अली खानला दिल्या होत्या झोपेच्या दोन गोळ्या..

ENG vs AFG: इंग्लंडच्या पराभवाने ऑस्ट्रेलियाला संजीवनी; जाणून घ्या कोण जाणार सेमीफायनलमध्ये..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.