Dates benefits: पुरुष महिला दोघांसाठीही खजूर आहे वरदान; अशा प्रकारे खा, त्यासाठी मिळेल भरपूर ताकद..

0

Dates benefits: निरोगी आरोग्य (healthy lifestyle) असेल तर माणूस आनंदी जीवन (happy life) जगतो. धावपळीमुळे अलीकडे निरोगी आरोग्य ठेवणं मोठं आव्हान आहे. नियमित व्यायाम आणि निरोगी आहार ही निरोगी आरोग्याची गुरुकिल्ली आहे. असे नेहमी सांगितले जाते. मात्र वेळेअभावी प्रत्येकाला नियमित व्यायाम आणि आहार देखील वेळेवर घेता येत नाही. सहाजिकच त्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. आणि आनंदी आयुष्य कधी उध्वस्त होतं, हेही कळत नाही.

आपल्याकडे अजूनही काही आरोग्याच्या समस्ये विषयी उघडपणे बोलले जात नाही. लैंगिक समस्या हा त्यापैकीच एक विषय आहे. लैंगिक आयुष्यात समाधान असेल, तर तुम्ही जीवनात आनंदी राहू शकता. हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. तुमच्याकडून महिलांना सुख आणि समाधान मिळत असेल, तर महिलांची चिडचिड होत नाही. यासाठी तुमच्यामध्ये लैंगिक समस्या असू नयेत.

जर तुम्हाला तुमची लैंगिक ताकद वाढवायची असेल तर आहारात खजुराच्या समावेश करणे प्रचंड फायदेशीर मानले जाते. एका संशोधनानुसार नियमितपणे खजुराचे सेवन केल्याने लैंगिक ताकद वाढत असल्याचे समोर आले आहे. खजुराचे नियमितपणे सेवन केल्याने शुक्राणूंची संख्या वाढते. साहजिकच त्यामुळे लैंगिक ताकद वाढून अधिक लैंगिक समाधान मिळते.

खजूरमध्ये सोडियम, पोटॅशियम,आयरन व्हिटॅमिन, मॅग्नेशियम असे अनेक फायदेशीर पोषक घटक असतात. अस्ट्रडियोल तसेच प्लेवोनोईड हे स्पर्म वाढवणारे घटक खजुरमध्ये मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे खजुराच्या नियमित सेवनाने शुक्राणूंची संख्या वाढते.

केवळ पुरुषांसाठीच नाही, तर महिलांसाठी देखील खजुराचे नियमितपणे सेवन फायदेशीर ठरते. गर्भधारणाची समस्या असेल, तर खजुराचे नियमित सेवन केल्यास गर्भधारणा संबंधी अडचणी दूर होतात. खजुराचे नियमित सेवन केल्यास महिलांमधील लैंगिक इच्छा देखील जागृत होते.

खजुराच्या सेवनाचा अधिक फायदा मिळवण्यासाठी सकाळी नाश्त्यावेळीच्या आणि संध्याकाळी झोपण्यापूर्वी चार खजूर नियमितपणे खाणे आवश्यक असल्याचं तज्ञ सांगतात. खजुरमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असल्याने, पोट देखील भरलेले राहते. याशिवाय स्मरणशक्ती वाढते. आणि हृदयाचा समस्या देखील दूर होतात.

हे देखील वाचा World Cup 2023 semi-final scenario: सेमी फायनलमध्ये पोहचण्यासाठी भारताला आणखी किती विजय आवश्यक? जाणून घ्या गणित..

AUS vs SL: अंपायरने LBW आऊट दिले, अन् डेव्हिड वॉर्नरने हासडली शिवी; व्हिडिओही झाला व्हायरल..

Flipkart sale: दमदार कॅमेरा, 8GB रॅम असणारे हे चार भन्नाट स्मार्टफोन Flipkart वर मिळतायत फक्त..

Saif Ali Khan: ..म्हणून त्यावेळी अमृता सिंगने सैफअली खानला दिल्या होत्या झोपेच्या दोन गोळ्या..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.