IND vs BAN World Cup 2023: तिसऱ्यांदा उलटफेर करण्यासाठी बांगलादेश सज्ज; या चार कारणामुळे बांगलादेश करू शकतो गेम..

0

IND vs BAN World Cup 2023 मधील सतरवा सामना उद्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर पुण्यात पार पडणार आहे. भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यामध्ये होणाऱ्या या सामन्यात क्रिकेट चाहत्यांना अटीतटीची लढत पाहायला मिळू शकते. भारतीय संघ या विश्वचषकामध्ये दमदार फॉर्ममध्ये असला तरी आयसीसी ट्रॉफी आणि गेल्या काही सामन्यात बांगलादेश संघ भारतासाठी वरचड ठरला आहे.

2007 मध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषकामध्ये भारतीय संघाचा बांगलादेश संघाने आश्चर्यकारकरीत्या पराभव केला होता. एवढेच नाही, तर 2016 आणि 2022 T 20 World Cup मध्ये देखील बांगलादेश संघाने भारताची दमछाक केली होती. बांगलादेशमध्ये खेळल्या गेलेल्या तीन एकदिवसीय सामन्याच्या मालिकेत बांगलादेश संघाने 2-1 असा भारताचा पराभव देखील केला होता.

आता पुन्हा एकदा बांगलादेश संघ भारतीय संघाला धूळ चारण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. बांगलादेश संघात अनेक मॅच विनर अष्टपैलू खेळाडू आहेत. बांगलादेश संघ चार जमेच्या बाजूंच्या जोरावर भारताचा पराभव करु शकतो. जर भारतीय संघाला तोड काढता आला नाही, तर या विश्वचषकात तिसरा उलटफेअर पाहायला मिळू शकतो.

भारतीय गोलंदाजी विरोधात बांगलादेश संघाचे फलंदाज नेहमी वरचढ राहिले आहेत. मेहंदी हसन मिराज, मुशफिकुर रहीम, महमुदुल्लाह, शकीब अल हसन, असे अनेक मॅच विनर खेळाडू बांगलादेश संघात आहेत. बांगलादेश संघाची सगळ्यात जास्त जमेची बाजू म्हणजे स्पिन अटॅक.

बांगलादेश संघाकडे शकीब अल हसन सारखा अनुभवी लेफ्ट आर्म स्पिनर गोलंदाज आहे. गेल्या काही वर्षापासून भारतीय फलंदाजांना लेफ्ट आर्म स्पिनर गोलंदाजांनी आपल्या तालावर नाचवले आहे. उजव्या हाताचे देखील दमदार स्पिनर बांगलादेश संघात आहे. त्यामुळे भारतीय फलंदाज फिरकीपटूंचा कसा सामना करतात, हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

बांगलादेश संघाने गेल्या काही सामन्यात भारतीय संघाला पराभूत केल्याने भारतीय संघावर मानसिक दबाव देखील असणार आहे. नुकतीच पार पडलेली आशिया चषक स्पर्धा भारताने जिंकली असली तरी या स्पर्धेत बांगलादेश संघाने भारताला पराभवाची धूळ चारली होती. याचा देखील दबाव भारतीय संघावर असणार आहे.

हे देखील वाचा SA vs NED: आफ्रिकेचा पराभव करत नेदरलँडने बिघडवलं सेमी फायनलचे गणित; कोणाला किती संधी? वाचा सविस्तर..

TrainMan App Offer: ट्रेनचं तिकीट कन्फर्म न झाल्यास चक्क मिळणार विमानाचं तिकीट, एवढंच नव्हे तर..

NTPC Recruitment 2023: या उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Dates benefits: पुरुष महिला दोघांसाठीही खजूर आहे वरदान; अशा प्रकारे खा, त्यासाठी मिळेल भरपूर ताकद..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.