SA vs NED: आफ्रिकेचा पराभव करत नेदरलँडने बिघडवलं सेमी फायनलचे गणित; कोणाला किती संधी? वाचा सविस्तर..

0

SA vs NED: विश्र्वचषक 2023 मध्ये काल दुसरा मोठा उलटफेर पाहायला मिळाला. T20 विश्वचषकानंतर नेदरलँड संघाने दक्षिण आफ्रिकेला (Netherland beat South Africa) काल 50 षटकाच्या वर्ल्ड कपमध्ये (World Cup 2023) देखील पराभवाची धूळ चारली. अफगाणिस्तान संघाने इंग्लंड आणि आता नेदरलँड संघाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. त्यामुळे आता विश्वचषक 2023 स्पर्धा रंगतदार अवस्थेत येऊन ठेपली आहे. (World Cup 2023 semi final scenario)

दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि भारत हे तीन संघ सेमी फायनलमध्ये पोहोचण्याच्या शर्यतीत आघाडीवर होते. मात्र काल दक्षिण आफ्रिकेचा नेदरलँड संघाने पराभव केल्यामुळे पुन्हा एकदा सेमीफायरचे गणित बदलले आहे. दक्षिण आफ्रिकेचा पराभवाने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघाला सेमीफायनलमध्ये पोहोचण्याची आणखी जास्त संधी मिळाली आहे.

इंग्लंड, ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिका या तीन संघाच्या पराभवामुळे आता पाकिस्तान संघाला देखील फायदा झाला आहे. ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि पाकिस्तान या चार संघांना आता सेमी फायनलमध्ये पोहोचण्याची समान संधी मिळाली आहे. यामध्ये पाकिस्तान संघाला अधिक संधी आहे.

पाकिस्तानचे गणित

त्याचे कारण म्हणजे, इंग्लंडचा न्युझीलंड आणि दुबळ्या समजल्या जाणाऱ्या अफगाणिस्तान संघाकडून पराभूत झाला. तर दक्षिण आफ्रिका नेदरलँड कडून आणि ऑस्ट्रेलियाचा संघ दक्षिण आफ्रिका आणि भारत या दोन्ही संघांकडून पराभूत झाला. पाकिस्तान संघाला तीन सामन्यात दोन विजय आणि भारताविरुद्ध एक पराभव पाहावा लागला आहे. त्यामुळे पाकिस्तान संघाला सेमी फायनलमध्ये पोहोचण्यासाठी सहा सामन्यात चार विजयाची आवश्यकता आहे.

दक्षिण आफ्रिकेचे गणित

दक्षिण आफ्रिका सेमी फायनलमध्ये पोहोचण्यासाठी आणखी सहा सामन्यात चार विजयाची आवश्यकता आहे. यामध्ये बांगलादेश, अफगाणिस्तान, भारत न्युझीलंड, इंग्लंड आणि पाकिस्तान संघाचा समावेश आहे. साहजिकच दक्षिण आफ्रिकेला दोन सामने वगळता इतर चार सामने आव्हानात्मक असतील.

इंग्लंडचे गणित

इंग्लंड संघाची परिस्थिती देखील दक्षिण आफ्रिकेप्रमाणेच झाली आहे. दक्षिण आफ्रिकेनंतर इंग्लंड संघाला देखील सेमी फायनलमध्ये पोहोचण्यात इतर संघाच्या तुलनेत मोठं आव्हान आहे. इंग्लंड संघाने तीन सामन्यात दोन पराभव आणि एक विजय मिळवला आहे. सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी इंग्लंड संघाला सहा सामन्यात पाच विजयाची आवश्यकता आहे. इंग्लंड संघाचे सामने भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, नेदरलँड आणि श्रीलंका या संघाशी होणार आहेत.

ऑस्ट्रेलियाचे गणित

वरील दोन्ही संघांपेक्षा जास्त संधी ऑस्ट्रेलिया संघाकडे आहे. कारण ऑस्ट्रेलिया संघ हा दक्षिण आफ्रिका आणि भारताकडून पराभूत झाला आहे. सहा सामन्यांपैकी ऑस्ट्रेलिया संघाला तीन सामने बांगलादेश, अफगाणिस्तान आणि नेदरलँड संघाविरुद्ध खेळायचे आहेत. याशिवाय न्युझीलंड, इंग्लंड आणि पाकिस्तान संघा बरोबर आहेत. ऑस्ट्रेलियाला देखील सहा सामन्यात पाच विजयाची आवश्यकता आहे.

हे देखील वाचा IND vs BAN: उद्या भारत ठोकणार विजयाचा चौकार; संघात होणार दोन मोठे बदल..

Train Ticket From Google Pay: या सोप्या पध्दतीने Google Pay वरून करा झटक्यात ट्रेनचं तिकीट बुक..

NTPC Recruitment 2023: या उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Dates benefits: पुरुष महिला दोघांसाठीही खजूर आहे वरदान; अशा प्रकारे खा, त्यासाठी मिळेल भरपूर ताकद..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.