IND vs BAN: उद्या भारत ठोकणार विजयाचा चौकार; संघात होणार दोन मोठे बदल..

0

IND vs BAN: विश्वचषक 2023 (world Cup 2023) स्पर्धा आता रंगतदार अवस्थेत आली आहे. दक्षिण आफ्रिकेला नेदरलँड कडून पराभवाचा सामना करावा लागल्याने, आता भारतीय संघ अव्वल स्थानावर कायम राहिला आहे. भारतीय संघाचा जर पराभव झाला नाही, तर गुणतालिकेत पहिल्या क्रमांकासह भारतीय संघ सेमी फायनलमध्ये धडक मारू शकतो. वर्ल्ड कपपुर्वी भारतीय संघात अनेक समस्या होत्या. मात्र भारतीय संघाने दमदार खेळ करत सगळ्या समस्या बाजूला सरल्या. असं असलं तरी रोहित शर्मा (Rohit Sharma) राहुल द्रविड (Rahul Dravid) पुढे दोन खेळाडूंची चिंता कायम आहे.

उद्या भारतीय संघाला बांगलादेश विरूद्ध विश्वचषकातील चौथा सामना खेळायचा आहे. पुण्याच्या मैदानावर हा सामना पार पडणार असल्याने, या सामन्यातही क्रिकेट चाहत्यांना धावांचा पाऊस पाहायला मिळेल. भारतीय संघ विजयाचा चौकार ठोकण्याचा इराद्याने मैदानात उतरेल. आतापर्यंत जवळपास सर्वच खेळाडूंनी आपापला रोज पार पाडत भारताच्या विजयात मोठा वाटा उचललेला आहे.

जवळपास सगळ्या खेळाडूंनी दमदार खेळ सादर केला असला तरी कर्णधार रोहित शर्मा आणि कोच राहुल द्रविडसमोर दोन खेळाडूंची चिंता आहे. आणि म्हणून बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात टीम मॅनेजमेंटने यापूर्वी घेतलेला निर्णय दुरुस्ती करून यापुढे विश्वचषकात भारतीय संघ मैदानात उतरणार असल्याचे बोललं जात आहे.

कर्णधार रोहित शर्मा आणि कोच राहुल द्रविड यांच्यापुढे रविचंद्रन अश्विन (ravichandran Ashwin) आणि शार्दुल ठाकूर (shardul Thakur) या दोन खेळाडूंची चिंता आहे. फिरकी साठी अनुकूल असणाऱ्या खेळपट्टीवर रविचंद्र अश्विनने चांगली गोलंदाजी केली असली तरी फलंदाजी करण्यासाठी त्याला संधी मिळाली नाही. दुसरीकडे शार्दुल ठाकूरला मात्र गोलंदाजीत देखील कमाल करता आली नाही. त्यामुळे आता फिरकीपटूंसाठी अनुकूल असणारी खेळपट्टी वगळून, इतर मैदानावर या दोन्हीं खेळाडू व्यतिरिक्त राहुल द्रविड आणि रोहित शर्मा विचार करत आहेत.

रविचंद्रन अश्विन आणि शार्दुल ठाकूर हे आठव्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतात. केवळ याच कारणासाठी दोघांना भारताच्या अंतिम अकरामध्ये संधी देण्यात आली होती. मात्र भारतीय खेळपट्ट्या फलंदाजीसाठी अनुकूल असल्याने आठव्या क्रमांकाची आवश्यकता भासत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अशावेळी एका स्पेशल जलदगती गोलंदाजाच संघात समावेश करण्यावर टीम मॅनेजमेंट विचार करत आहे.

मोहम्मद शमी (Mohammed Shami) जबरदस्त फॉर्ममध्ये असल्याने, देखील कॅप्टन रोहित शर्मा आणि कोच राहुल द्रविडला यावर गंभीरतेने विचार करणे भाग पडलं आहे. मोहम्मद शमी जबरदस्त फॉर्ममध्ये असल्याने, भारताच्या अंतिम अकरा मधून तो बाहेर बसू शकत नसल्याचे अनेक क्रिकेट दिग्गजांनी म्हंटले. आता याच रणनितीनुसार भारतीय संघ बांगलादेश विरुद्ध देखील मैदानात उतरणार आहे. यापुढे शार्दुल ठाकूर शिवाय भारतीय संघ आपला अंतिम अकराचा संघ मैदानात घेऊन उतरवणार असल्याचं सांगितलं जातं आहे.

हे देखील वाचा Train Ticket From Google Pay: या सोप्या पध्दतीने Google Pay वरून करा झटक्यात ट्रेनचं तिकीट बुक..

NTPC Recruitment 2023: या उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Dates benefits: पुरुष महिला दोघांसाठीही खजूर आहे वरदान; अशा प्रकारे खा, त्यासाठी मिळेल भरपूर ताकद..

World Cup 2023 semi-final scenario: सेमी फायनलमध्ये पोहचण्यासाठी भारताला आणखी किती विजय आवश्यक? जाणून घ्या गणित..

AUS vs SL: अंपायरने LBW आऊट दिले, अन् डेव्हिड वॉर्नरने हासडली शिवी; व्हिडिओही झाला व्हायरल..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.