Raj Thackeray: पोलिसांना धक्का देऊन, संदिप देशपांडे गेले पळून; महिला कॉन्स्टेबल जखमी व्हिडिओ व्हायरल..

0

Raj Thackeray: सध्या भोंग्यावरून राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. औरंगाबादमध्ये (Aurangabad) झालेल्या सभेत पोलिसांनी (police) घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर विविध कलमांतर्गत गु न्हा दाखल करण्यात आला आहे. काल राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर मनसेचे अनेक बडे नेते नॉटरिचेबल झाल्याचं देखील पाहायला मिळालं होतं. मनसेच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना यासंदर्भात नोटिसा पाठवत पोलीस ॲक्शन मोडमध्ये आल्याचे दिसून आले.

राज ठाकरे यांचा शिवतीर्थ या निवासस्थानी कार्यकर्ते जमा होऊ नये, यासाठी पोलिसांचा शिवतीर्थ बाहेर फौज फाटा तैनात करण्यात आला आहे. पुढची भूमिका काय याविषयी चर्चा करण्यासाठी संदीप देशपांडे (Sandip Deshpande) संतोष साळी(santosh aali) तसेच संतोष धुरी (Santosh dhuri) शिवतीर्थावर गेले होते. शिवतिर्था बाहेर माध्यमांशी संवाद साधत असताना पोलीस आपल्याला अटक करणार असल्याची चाहूल लागताच संदीप देशपांडे, संतोष साळी, आणि संतोष धुरी पळून गेल्याची माहिती आहे. या तिघांना पकडण्यासाठी पोलिस कॉन्स्टेबल गेले असताना, एका महिला पोलीस कॉन्स्टेबल धक्का लागून ती खाली कोसळल्याची दुर्देवी घटना घडली आहे. सुदैवाने या कॉन्स्टेबलला फारशी इजा झाली नाही.

दरम्यान काल राज ठाकरे यांच्यावर औरंगाबाद येथे झालेल्या सभेत घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर, मनसेचे अनेक बडे नेते नॉटरिचेबल झाले होते. अनेकांनी आपले फोन स्वीच ऑफ केल्याची माहिती समोर आली होती. मात्र आज मनसेचे नेते आक्रमक झाल्याचे दिसत आहे. मनसेने राज्य सरकारला तीन तारखेपर्यंत म शि दी वरचे भों गे काढण्यासंदर्भात अल्टिमेटम दिला होता. आज अल्टिमेटची तारीख संपत असल्याने, पोलीस अधिक आक्रमक झाले असून, ठिकठिकाणी अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. काल नॉटरिचेबल असणारे नेते अचानक शिवतीर्थावर आल्याने, पोलीसांनी त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांना धक्का देऊन संदीप देशपांडेसह काही नेते पळून गेले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज संध्याकाळी पत्रकारांशी संवाद साधणार असून, या संदर्भात आपली भूमिका मांडणार असल्याची माहिती आहे. मात्र त्याआधीच पोलिसांनी शिवतीर्थावर कडक बंदोबस्त लावला असून, शिवतीर्थावर कुठल्याही कार्यकर्त्याला येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तीन तारखेपर्यंत सरकारने मशिदीवरील भोंगे काढले नाहीत, तर दुप्पट आवाजाने म शि दी समोर हनुमान चालीसा (Hanuman chalisa) लावायचा, अशा सूचना राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केल्या होत्या. त्याच्य पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात येत आहे.

दरम्यान शिवतीर्थाबाहेरून पोलिसांना धक्का देत संदीप देशपांडे,संतोष धुरी, आणि संतोष साळी यांनी पळ काढताच, बाकीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घ्यायला सुरुवात केली. दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महत्वाचे नगरसेवक पुण्याचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल होताच, चार दिवस तिरुपती बालाजीला निघून गेले. राज ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानंतर कार्यकर्त्यांकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने, आता राज ठाकरे काय भूमिका घेणार हे महत्त्वाचे ठरणार आहे.

हे देखील वाचा Raj Thackeray: आज प्रभोधनकार ठाकरे असते, तर ‘खेटराने हाणला असता; या कारणामुळे राज ठाकरे यांच्यावर केली एकेरी टिका..

India Post Bharti: पोस्ट ऑफिसमध्ये 40 हजार पदांची मेगा भरती; दहावी पास उमेदवारांची अशी केली जाणार निवड..

Flipkart Big Saving Days Sale: फ्लिपकार्टचा धूम धडाका! नवीन स्मार्टफोसह सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर तब्बल 80 टक्‍क्‍यांपर्यंत डिस्काउंट..

Raj Thackeray: राज ठाकरेंनी टाकलेला डाव त्यांच्यावरच उलटला; सर्वोच्च न्यायालय म्हणाले..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.