Raj Thackeray: आज प्रभोधनकार ठाकरे असते, तर ‘खेटराने’ हाणला असता; ‘या’ कारणामुळे राज ठाकरे यांच्यावर केली एकेरी टिका..

0

Raj Thackeray: गेल्या काही दिवसांपासून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे देशभर कमालीचे चर्चेत आहेत. म शि दी व री ल भों गे काढले नाहीत, तर म शि दी समोर दुप्पट आवाजाने ह नु मा न चालीसा लावणार, अशी भूमिका राज ठाकरे यांनी घेतली. आणि नव्या वादाला तोंड फुटले. तीन तारखेपर्यंत त्यांनी सरकारला अल्टिमेटम देत मशिदीवरील भोंगे काढण्यासाठी मुदत दिली. मात्र सरकारने यासंदर्भात ठोस भूमिका घेतली नाही. आता राज ठाकरे या संदर्भात काय बोलणार, याची प्रतिक्षा संपूर्ण महाराष्ट्राला लागून राहिली आहे.

औरंगाबादमध्ये उद्या होणाऱ्या राज ठाकरे यांच्या जाहीर सभेची जोरदार तयारी झाली आहे. विशेष म्हणजे ही सभा यशस्वी आणि यश देणारी ठरावी, यासाठी तब्बल दीडशे ब्राह्मणांकडून पुण्यात आज सकाळी मंत्रोच्चार करून आशीर्वाद देण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. यासाठी पुण्यातील राजमहाल या ठिकाणी येथे सकाळीच ब्रह्मवृंद मोठ्यासंख्येने हजर देखील झाले आहेत.

मात्र आता यावरून राज ठाकरेंना सोशल मीडियावर जोरदार ट्रोल केले जात आहे. सभा सक्सेस होण्यासाठी आणि यश मिळवण्यासाठी राज ठाकरे यांना आता ब्राह्मणांकडून आशीर्वाद घ्यावा लागत असेल, तर हे पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारे नसल्याचे बोलले जात आहे. ज्या प्रबोधनकार ठाकरे यांनी समाज घडवण्याचे काम केले. त्यांचे विचार राज ठाकरे यांनी पायदळी तुडवल्याचे देखील बोलले जात आहे.

पुण्याहून औरंगाबादला सभेसाठी जाण्यापूर्वी राज ठाकरे तब्बल दीडशे ब्राह्मणांचा आशीर्वाद घेणार असल्याची बातमी एका प्रसिद्ध माध्यमाने प्रसारित केली. मात्र या बातमीचा स्क्रीन शॉट काढून, योगेश सावंत यांनी ट्विटरवर राज ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटरवर जहरी टीका करताना त्यांनी म्हटले आहे, जर प्रबोधनकार ठाकरे असते तर, खेटराने हाणला असता. अशी एकेरी भाषेत टीका केली आहे.

राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांच्यावर जोरदार टीका होऊ लागली आहे. राज ठाकरे यांच्या भाषणाची उत्सुकता विरोधकांना देखील असल्याचे पाहायला मिळते. पुराव्यानिशी बेधडक बोलण्याची राज ठाकरे यांची पद्धत अनेकांना भावते. एखांद्या राजकारण्याची हुबेहुब नक्कल करून आपला मुद्दा व्यवस्थित लोकांच्या मनात बिंबवण्यात राज ठाकरे इतर राजकारण्यांच्या तुलनेत अधिक प्रभावी ठरतात. मात्र आता राज ठाकरे हे भाजपची भाषा बोलू लागले आहेत. एवढेच नाही तर, राज ठाकरे यांच्या भाषणाची स्क्रीप्ट आता देवेंद्र फडणवीस लिहितात, असा देखील आरोप विरोधकांकडून केला जातो.

औरंगाबादची सभा ऐतिहासिक?

१मे ला राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये होणारी सभा इतिहासिक होणार असल्याचं मनसेकडून सांगण्यात आले आहे. सुरुवातीला या सभेला पोलिसांकडून परवानगी देण्यात आली नव्हती, मात्र आता परवानगी मिळाली असून, पोलिसांनी या सभेसाठी अनेक अटी आणि शर्ती घातल्या आहेत. विशेष म्हणजे, पोलिसांनी या सभेसाठी फक्त पंधरा हजार लोकांची परमिशन दिली आहे. तसेच या सभेत वंश, जात, धर्म, भाषा, चिथावणीखोर वक्तव्य न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या सभेची वेळ देखील पोलिसांकडून ठरवून देण्यात आली आहे. दुपारी साडेतीन ते रात्री पावणेदहा या दरम्यान ही सभा संपवणे आवश्यक असल्याचे, पोलिसांकडून जारी करण्यात आले आहे. त्यामुळे आता मनसेकडून पोलिसांनी घातलेल्या अटी पूर्ण होणार की नाही, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

हे देखील वाचा Ration Card: आता या लोकांचे रेशन कार्ड होणार बंद! सरकारचा महत्वपूर्ण निर्णय 

MahaGenco Recruitment: महाराष्ट्र राज्याच्या विद्युत कंपनीत मेगा भरती; जाणून घ्या सर्व डिटेल्स आणि करा असा अर्ज..

Viral video: माणसांप्रमाणे प्राणी देखील ठेवतात संबंध; २ कोटी ७० लाख लोकांनी पाहिलेल्या या व्हिडीओत आहे तरी काय? पहा तुम्हीच..

Raj Thackeray: शनिवारी हनुमान जयंतीला पुण्यात येत असतानाच राज ठाकरे यांनी खाल्ली मटनाची उकड..

Raj Thackeray: राज ठाकरेंनी टाकलेला डाव त्यांच्यावरच उलटला; सर्वोच्च न्यायालय म्हणाले..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.