Raj Thackeray: शनिवारी हनुमान जयंतीला पुण्यात येत असतानाच राज ठाकरे यांनी खाल्ली ‘मटनाची’ उकड..

0

Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेमुळे गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे चांगलेच चर्चेत आहेत. तीन तारखेला गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या अनेक मुद्द्यांमुळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघालं. खासकरून मशिदीवर असणारे भोंगे काढले गेले नाही, तर मशिदीसमोर हनुमान चालीसा लावण्याचा आपल्या कार्यकर्त्यांना दिलेला आदेश चांगलाच वादग्रस्त ठरत, असल्याचं पाहायला मिळत आहे.

गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणावर विरोधकांनी जोरदार टीका केली. गुढीपाडवा मेळाव्यात भाजपचा भोंगा वाजला असल्याची टीका देखील राज ठाकरेंवर शिवसेनेने केली. मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोर पेडणेकर यांनी तुंबलेल्या मोरीतून भाजपचे गांडूळ निघाले. असल्याचा घणाघात देखील केला. राज ठाकरे यांनी भाजपची स्क्रिप्ट वाचून दाखवली अशी देखील टिका झाली. या भाषणावर शरद पवार यांनी देखील टीका केली. राज ठाकरे यांनी पुन्हा विरोधकांना उत्तर म्हणून ठाण्यात उत्तर सभा घेतली.

ठाण्यात झालेल्या उत्तर सभेत राज ठाकरे यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. खासकरून राज ठाकरे यांनी पवार कुटुंबाला टार्गेट केल्याचं पाहिला मिळाले. शरद पवार हे नास्तिक आहेत, अशी जोरदार टीका राज ठाकरे यांनी केली. मात्र आता सोशल मीडियावर या संदर्भातली एक पोस्ट व्हायरल झाली. राज ठाकरे औरंगाबादहून शनिवारी पुण्याला येत असताना, एका हॉटेलमध्ये मटन खाल्ल्याची ही बातमी आहे.

एकीकडे लोकांना राज ठाकरे हनुमान चालीसा म्हणायला लावत आहेत, आणि दुसरीकडे शनिवारीच मटण खात आहेत. यासंदर्भातली लोकमतने दिलेली बातमी सोशल मीडियावर शेअर करून राज ठाकरे यांच्यावर टीका करण्यात येत आहे. शरद पवार नास्तिक नसून, राज ठाकरेच नास्तिक असल्याचं काही नेटकरी म्हणताना दिसत आहेत. मात्र सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेली बातमी काही महिन्यांपूर्वीची आहे.

काही महिन्यांपूर्वी राज ठाकरे औरंगाबादवरून पुण्याला येत असताना, केडगाव मधील एका हॉटेलमध्ये राज ठाकरे यांनी मटणाची उकड खाल्ली होती. यावेळी राज ठाकरे यांनी खूप दिवसांची मटणाची उकड खाण्याची इच्छा पूर्ण झाली असल्याचं देखील म्हटलं होतं. मात्र ही जुनी बातमी विरोधकांनी पुन्हा एकदा मसाला लावून सोशल मीडियावर शेअर केली, आणि राज ठाकरे यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला. मात्र राज ठाकरे औरंगाबादहुन पुण्याला येत असताना ज्या दिवशी जेवले त्या दिवशी देखील शनिवारच होता. त्यामुळे राज ठाकरे यांनी हनुमान जयंतीच्या शनिवारीच मटन खाल्ल्याचं अनेकांना वाटलं. मात्र ही बातमी जुनी असल्याचं आता स्पष्ट झालं आहे.

मिटकरी यांनीही साधला निशाणा

या बातमीवरून राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी देखील राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. अमोल मिटकरी यांनी एक ट्विट करत म्हंटले आहे, “राजसाहेब हिंदू धर्मामध्ये सोमवार, गुरुवार, शनिवार हे पवित्र दिवस मानले जातात, या दिवशी मां सा हा र वर्ज्य असतो. एक जुनी बातमी वाचली, ज्यात तुम्ही शनिवारी तुमच्या आवडीचे जेवण जेवला. याची एक आठवण म्हणून, बातमी पाठवत आहे. शक्य असल्यास संभाजीनगरमध्ये होणाऱ्या पुरवणी सभेत याचा खुलासा करावा”

हे देखील वाचा Raj Thackeray: राज ठाकरेंनी टाकलेला डाव त्यांच्यावरच उलटला; सर्वोच्च न्यायालय म्हणाले..

Raj Thackeray New Home:असं आहे राज ठाकरे यांचे नवीन घर, आता राज ठाकरे गेले आपल्या नवीन घरी; घर पाहून लोक झाले चकित

Viral video: काही कळायच्या आत मगरीने घेतला चित्त्याच्या नरडीचा घोट; व्हिडिओ पाहून तुमचाही उडेल थरकाप..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.