Raj Thackeray New Home:असं आहे राज ठाकरे यांचे नवीन घर, आता राज ठाकरे गेले आपल्या नवीन घरी; घर पाहून लोक झाले चकित

0

Raj Thackeray New Home: ऐन सणासुदीच्या काळात सगळेच नवीन काहीतरी खरेदी करण्याच्या प्रयत्न करत असतात, त्यातल्या त्यात दिवाळीमध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. त्यामध्ये राज ठाकरे यांचे देखील नाव आता पुढे आले आहे. त्यांनी यंदा दिवाळीचा मुहूर्त साधून एक शुभकार्य केले आहे. राज ठाकरे यांनी त्यांच्या घरात गृहप्रवेश नुकताच केला आहे. त्यांच्या अगोदरच्या असलेल्या ‘कृष्णकुंज’ या घराजवळच त्यांनी हे घर बांधले आहे. (Raj Thackeray  New Home: This is Raj Thackeray’s new home, now Raj Thackeray has gone to his new home; People were amazed to see the house)

‘शिवतीर्थ’ असं त्यांच्या नवीन निवस्थानाला नामकरण करण्यात आले आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकांना कुठल्याही कामासाठी ‘शिवतीर्थ’ या राज ठाकरे यांच्या नवीन घरी जावं लागेल. राज ठाकरेंनी कृष्णकुंज या आपल्या जुन्या घराच्या बाजूला अजून एक नवीन 5 मजली घर बांधले आहे. राज ठाकरे कालपासून म्हणजेच 6 नोव्हेंबर पासून आपल्या नवीन घरात आपल्या कुटुंबीयांसह राहायला गेले आहेत.

आता कृष्णकुंजवर नाही सरसेनापती शिवतीर्थ वरती भेटणार:
कृष्णकुंज हे राज यांचे नवीन घर सर्व सोयीसुविधा युक्त असे आहे. भाऊबीजेच्या मुहूर्तावर ते आपल्या नवीन घरात कुटुंबासोबत राहायला गेले आहेत. दोन दिवसांपूर्वी सकाळी साडे दहा वाजता राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्या हस्ते नवीन घराची पूजा करण्यात आली होती. त्याचसोबत शिवतीर्थ या घराच्या पाटीचं अनावरणही अमित ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

आपल्या पुत्राने पूजा केल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या नवीन घराची पाहणी केली. त्यांनी आपल्या 5 मजली घराच्या दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावरुन खाली जमलेल्या मनसैनिकांना अभिवादन केलं.  राज ठाकरे यांच्या चेहऱ्यावर नव्या घरात गेल्याचा आनंद ओसांडून वाहत असताना पाहायला मिळाला. राज यांच्या सोबत नव्या घरातल्या गॅलरीमध्ये त्यांच्या सोबत त्यांचे अत्यंत विश्वासू व मनसे नेते नितीन सरदेसाई देखील होते.

असं आहे राज ठाकरे यांचे नवीन घर:
राज ठाकरे यांचा जुन्या ‘कृष्णकुंज’शेजारी बांधण्यात आलेल्या या पाच मजली इमारतीमध्ये पहिल्या मजल्यावर समिती कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे. या नवीन घराच्या इमारतीतमध्ये मनसेचे मुख्य कार्यालय देखील असणार आहे. याच ठिकाणी मनसेचे राज ठाकरे हे आपल्या कार्यकर्त्यांना इथून पुढे भेटणार आहेत, तसेच ज्यांना राज ठाकरे यांना भेटायचे असेल त्यांना देखील याच कार्यालयात राज ठाकरे यांना भेटता येणार आहे.

इतर मजल्यावर राज ठाकरे व त्यांच्या कुटुंबीयांच्या निवासाची सोय करण्यात आली आहे. या पाच मजली इमारतीमध्ये सर्व सोयी सुविधा आहेत. त्याचसोबत शिवतीर्थ या नवीन घरात एक भव्य ग्रंथालय देखील उभारण्यात आले आहे. आता इमारतीचे काम पूर्ण झाले असून इथून पुढे राज ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय याच घरात राहायला गेले आहेत. त्यामुळे आता राज ठाकरे यांचे राजकारण कृष्णकुंजवरून नाही तर शिवतीर्थ येथून चालणार आहेत.

हेही वाचा:Nawab Malik: बिजेपीचा बॉम्ब निघाला फुसका! आर्यन खान ड्रग्स प्रकरणाचा मास्टरमाईंड सुनील पाटील निघाला बीजेपीचा मोहरा

Aryan Khan Drug case: पहिला बॉम्ब फुटला! आर्यन खान ड्रग्स प्रकरणाचा मास्टरमाईंड सुनील पाटील राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असल्याचं उघड

Todays Onion Rate:या कारणामुळे कांद्याचा दर पडणार, कांद्याचे दर येणार आटोक्यात; पहा आजचा दर 

T20 World Cup: आम्ही असंच खेळत राहिलो तर कोणाचा बापही आम्हाला पराभूत करू शकत नाही; विराट कोहलीचा हा सहकारी कडाडला

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.