Aryan Khan Drug case: पहिला बॉम्ब फुटला! आर्यन खान ड्रग्स प्रकरणाचा ‘मास्टरमाईंड’ सुनील पाटील राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असल्याचं उघड
आर्यन खान ड्रग्स प्रकरणात आता आणखी एका नव्या पात्राची ‘एन्ट्री’ झाल्यामुळे पुन्हा एकदा देश हादरून गेला आहे. महिना उलटून गेला तरी देखील, ‘आर्यन खान ड्रग्स’ (Aryan Khan Drug case) प्रकरणाचा तिढा काही सुटता सुटेना. दिवसेंदिवस आर्यन खान ड्रग्स प्रकरण गुंतागुंतीचं होत चाललं असून, सामान्य माणूसही आता या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे ऐकायला मिळत असल्याने, त्रस्त झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून एनसीबीचे अधिकारी ‘समीर(Sameer wankhede) वानखेडें’वर नवाब(Nawab Malik) मलिक यांनी केलेल्या आरोपांमुळे आर्यन खान ड्रग्स प्रकरणात समीर वानखेडेंकडे संशयाने पाहिले जात आहे. समीर वानखेडे यांच्या विरोधात अनेक खुलासे आणि काही पुरावे नवाब मलिक दररोज सादर करत असल्यामुळे समीर वानखेडे चांगलेच अडचणीत आल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र आज ‘मोहीत कंबोज’ (Mohit Kamboj) या भाजपाच्या कार्यकर्त्याने राष्ट्रवादीचा कार्यकर्ता सुनील पाटील हाच या प्रकरणाचा मास्टर माईंड असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.
मुंबईत पत्रकार परिषद mumbai press conference) आयोजित करून ‘मोहित कंबोज’ यांनी तब्बल एक तास ही पत्रकार परिषद चालवली. एक तासाच्या या पत्रकार परिषदेतून मोहित कंबोज यांनी या प्रकरणाचा सगळा उलगडा करण्याचा प्रयत्न केला. आर्यन खान ‘ड्रग्स’ प्रकरणात किरण गोसावी,सॅम डिसूजा, प्रभाकर साईल ही नावं कशी आली? याची देखील सविस्तर मांडणी या पत्रकार परिषदेत मोहित कंबोज यांनी केली. कंबोज यांनी या पत्रकार परिषदेत काही व्हिडिओ आणि फोटो देखील पत्रकारांना सादर केले असून, या प्रकरणाने पुन्हा एकदा वेगळं वळण घेतल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
या पत्रकार परिषदेत ‘मोहित कंबोज’ यांनी सुनील पाटील(Sunil patil) हा या प्रकरणाचा मास्टर माईंड असून त्याचा राष्ट्रवादीच्या अनेक बड्या नेत्यांशी घरगुती संबंध असल्याचा धक्कादायक खुलासा देखील केला आहे. एवढंच नाही तर तो वीस वर्षापासून राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे. असं देखील मोहीत कंबोज यांनी म्हटलं आहे. मोहीत कंबोजने केलेल्या आरोपांमुळे या प्रकरणात आता नवीन ‘ट्विस्ट’ आला आला असून, येणारे काही दिवस हे प्रकरण आणखी तापण्याची शक्यता आहे.
१ नोव्हेंबरला ‘सुनील पाटील’ यांनी सॅम डिसूजा(Sam disuza) नावाच्या व्यक्तीला फोन करून कार्टिलिया क्रुझवर ट्रग्ज पार्टी होणार असल्याची माहिती दिली. त्याचबरोबर या पार्टीत २७ जणांचा सहभाग असून त्यांचा ड्रग्स रॅकेटशी संबंध असल्याची माहीतीही सॅम डिसूजा याला सुनील पाटील यांनी दिली. असा खुलासा मोहित कंबोज याने केला. ‘सुनील पाटील’ याने माझं बोलणं एनसीबीच्या अधिकाऱ्यांशी करून दे, असं सांगितल्यानंतर सॅम डिसूजा या व्यक्तीने देखील व्ही.व्ही. सिंग नावाच्या एनसीबी अधिकाऱ्याशी सुनील पाटील यांचं बोलणं करून दिलं.
‘सुनील पाटील’ यांनी सॅम डिसूजा, याला या प्रकरणाची सगळी माहिती दिली. त्याचबरोबर आपला एक माणूस हे प्रकरण व्यवस्थित हाताळणार असल्याचं देखील त्याने ‘सॅम डिसूझा’ला फोनवर सांगितलं, असाही खुलासा ‘मोहित कंबोज’ यांनी आज पत्रकार परिषदेत केला. हा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून हा व्यक्ती किरण गोसावी (Kiran Gosavi)होता. किरण गोसावी हा सुनील पाटील यांचा खास माणूस असून, प्रभाकर साईल ही माणसं सुनील पाटील यांचीच आहेत. या प्रकरणातून खंडणी वसूल करण्याचा सगळा कट ‘सुनील पाटील’ याच्याच सांगण्यावरून रचला असल्याचा खळबळजनक दावा ‘मोहित कंबोज’ यांनी केला आहे.
BIGGEST EXPOSE in the history of Maharashtra in this Press Conference
प्रेस वार्ता: महाराष्ट्र के इतिहास का सबसे बड़ा खुलासा https://t.co/avVBCnutBn— Mohit Bharatiya ( Mohit Kamboj ) (@mohitbharatiya_) November 6, 2021
मोहित कंबोज यांनी सुनील पाटील यांच्यावर हे धक्कादायक आरोप केल्यानंतर सुनील पाटील यांचा थेट राष्ट्रवादीशी (NCP) मोठा संबंध असून, अनेक बड्या नेत्यांशी त्यांची खूप जवळीक असल्याचा धक्कादायक खुलासा देखील मोहित कंबोज यांनी आज पत्रकार परिषदेत केला आहे. एवढंच नाही तर, माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या मुलांशीही सुनील पाटील यांची जिगरी दोस्ती असल्याचं त्यांनी म्हटलंय. पाटील यांनी कोणाच्या सांगण्यावरून हे कारस्थान रचलं आहे? असाही घनाघात त्यांनी या पत्रकार परिषदेत केला. नवाब मलिक आणि सुनील पाटील यांचे काय संबंध आहेत? असा सवाल देखील मोहित कंबोजने उपस्थित केला आहे.
मुंबईच्या हॉटेल ‘ललीत’वर (hotel Lalit) सुनील पाटील यांची शबाब, शराब, कबाब,आणि नवाब अशी पार्टी रंगत होती. या पार्टीत नेमकं काय काय होत होतं? या पार्टीला राष्ट्रवादीचे कोण-कोणते नेते उपस्थित असायचे? असा सवालही मोहीत कंबोजने उपस्थित केला आहे. सह्याद्री अतिथीगृहावर (Sahyadri House) दाऊदशी संबंधित असणारा व्यक्ती अनिल देशमुख यांना भेटत असल्याचा देखील खळबळजनक आरोप मोहित कंबोज यांनी केला आहे. या बैठकीमध्ये ‘सुनील पाटील’ हा व्यक्ती देखील उपस्थित असायचा,असा देखील खुलासा मोहीत कंबोज यांनी केला आहे.
Video: अफगाणिस्तानने न्यूझीलंडला हरवले नाही तर तुम्ही काय कराल?,जडेजा गेला चक्रावून दिले उत्तर
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम