Video: अफगाणिस्तानने न्यूझीलंडला हरवले नाही तर तुम्ही काय कराल?,जडेजा गेला चक्रावून दिले ‘हे’ उत्तर
भारत आणि स्कॉटलंड यांच्यामध्ये झालेल्या काल महत्त्वपूर्ण लढतीत अष्टपैलू रवींद्र जडेजाने भेदक मारा करत, स्कॉटलंडच्या प्रमुख तीन फलंदाजांना बाद केले. रवींद्र जडेजाने केलेल्या सर्वोत्तम कामगिरीमुळे त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. मात्र सामनावीरपेक्षा त्याने ‘अटेंड’ केलेली ‘प्रेस कॉन्फरन्स’ (press conference)चांगलीच गाजली. त्याला विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाचे उत्तर देताना तो बावचाळल्याचे पाहायला मिळाले. रवींद्र जडेजाने दिलेल्या उत्तराची चर्चाही नंतर सोशल मीडियावर चांगलीच गाजली.
दुबईमध्ये सुरू असलेली टी-20 विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धा आता अंतिम टप्प्यावर येऊन ठेपली असून, येणाऱ्या दोन दिवसांत या स्पर्धेचे चारही सेमी फायनलीस्ट क्रिकेट चाहत्यांना पाहायला मिळणार आहेत. ग्रुप’बी’ मधून पाकिस्तान(Pakistan) चार सामन्यात चार विजय प्राप्त करत सेमी फायनलमध्ये धडक मारणारा या स्पर्धेतला पहिला संघ ठरलाय. तर दुसरीकडे ग्रुप ‘ए’मध्ये इंग्लंड संघाने आपले चारही सामने जिंकत सेमी फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला आहे.
क्रिकेट चाहत्यांना ग्रुप ‘ए’ मधून सेमी फायनलमध्ये पोहचणारा दुसरा संघ देखील आज पाहायला मिळणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिका यांच्या मधून एक संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करणार आहे. ऑस्ट्रेलियाचा आज वेस्टइंडीज बरोबर तर दक्षिण आफ्रिकेचा बलाढ्य इंग्लंड बरोबर सामना होणार आहे, या दोन्हीं सामन्यात जो संघ जिंकेल तो सेमी फायनलमध्ये धडक मारताना चाहत्यांना पाहायला मिळेल.
काल भारत आणि स्कॉटलंड यांच्यामध्ये झालेल्या महत्त्वपूर्ण सामन्यात भारतीय संघाने खूप मोठा विजय संपादन केला असला तरी, भारतीय संघाला सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी इतर संघावर अवलंबून राहावे लागले आहे. ग्रुप’ए’ मधून सेमी फायनलमध्ये पोहचणारी दुसरी टीम कोण ठरणार? हे उद्या क्रिकेट चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. दुपारी साडेतीन वाजता न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान (AFGvNZ) यांच्यामध्ये सामना होणार आहे. हा सामना झाल्यानंतरच सगळं चित्र पष्ट होईल. जर अफगाणिस्तानने न्यूझीलंड संघाचा पराभव केला तरच, भारत सेमीफायनलमध्ये पोहोचणार आहे.
काल भारतीय संघाकडून सर्वोत्तम खेळाडू ठरलेल्या रवींद्र जडेजाला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. सामनावीर पुरस्कार देऊन गौरवण्यात आल्यानंतर रवींद्र जडेजाने प्रेस कॉन्फरन्स ‘अटेंट’ केली. रवींद्र जडेजाला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. मात्र याच्यापेक्षा जास्त चर्चा झाली ती रवींद्र जडेजाच्या प्रेस कॉन्फरन्सची. एका पत्रकाराने रवींद्र जडेजाला प्रश्न विचारला, आणि रवींद्र जडेजाला चक्रावून गेला. त्याला या प्रश्नाचे काय उत्तर द्यावे हेच समजेना.
तुम्ही विचारलेला प्रश्न मला समजला नाही, कृपया पुन्हा विचारा,असं त्या पत्रकाराला रवींद्र जडेजा म्हणाला. ‘अनूज मिश्रा’ या पत्रकाराने रवींद्र जडेजाला पुन्हा प्रश्न विचारला. भारताला सेमी फायनलमध्ये पोहोचण्यासाठी न्यूझीलंडचा संघ पराभूत होणे गरजेचे आहे, असे बोललं जातंय. मात्र जर न्यूझीलंडचा संघ अफगाणिस्तान विरुद्ध पराभूत झालाच नाही तर काय होईल? अनूज मिश्रा यांच्या या प्रश्नाचे उत्तर देताना, रवींद्र जडेजा म्हणाला, जर असं झालं नाही, तर आम्ही बॅगा भरून घरी निघून येईल. रविंद्र जडेजाने दिलेल्या या प्रश्नाच्या उत्तराची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगल्याचे पहिला मिळाले.
Video: अफगाणिस्तानने न्यूझीलंडला हरवले नाही तर तुम्ही काय कराल?,जडेजा गेला चक्रावून दिले उत्तर
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम
Comments are closed.