T20 World Cup: आम्ही असंच खेळत राहिलो तर कोणाचा बापही आम्हाला पराभूत करू शकत नाही; विराट कोहलीचा ‘हा’ सहकारी कडाडला

0

भारतीय संघाचा कर्णधार आणि ‘ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम’ (goat) अशी उपाधी असणाऱ्या विराट कोहलीच्या संघाने काल स्कॉटलंड संघावर दिमाखदार विजय संपादन करत सेमी फायनलमध्ये पोहोचण्याची आशा पल्लवित ठेवल्या आहेत. भारतीय संघाने जरी मोठा विजय संपादन करत ‘ग्रुप बी’ संघांमध्ये सर्वाधिक जास्त ‘स्ट्राईक रेट’ रेट मिळवला असला तरी, सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी भारतीय संघाला, अफगाणिस्थानकडून न्यूझीलंडचा(newzealand) पराभव व्हावा अशी प्रार्थना करावी लागणार आहे. तर आणि तरच भारत सेमी फायनलमध्ये (semi final,) पोहोचेल.

सुरूवातीच्या दोन खराब सामन्यानंतर भारतीय संघ (Indian cricket team) चांगलाच जागा झाला असून, भारताच्या हातात जे काही होतं ते कालच्या सामन्यात भारताने करून दाखवलं. भारतीय संघाचा काल स्कॉटलंड (Scotland) विरुद्धचा ऐतीहासिक आणि सर्वात मोठा विजय ठरला. या स्पर्धेत विराट कोहलीने पहिल्यांदाच नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गोलंदाजांनी देखील विराट कोहलीचा हा निर्णय सार्थ ठरवत, स्कॉटलंड संघाच्या फलंदाजाची पळता भुई करत अवघ्या ८५ धावांवर रोखलं.

भारताकडून ऑल राऊंडर रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) या सामन्यात सर्वोत्तम गोलंदाज म्हणून समोर आला. त्याने आपल्या चार षटकांत अवघ्या 15 धावा देत स्कॉटलंडच्या प्रमुख तीन फलंदाजांना तंबूत पाठवलं. भारताचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमीने देखील तीन षटकात 15 धावा देत तळाच्या 3 फलंदाजांना बाद करत रविंद्र जडेजाला चांगली साथ दिली. जसप्रीत बुमराहने देखील 3.4 षटकात अवघ्या दहा धावा देत स्कॉटलंडच्या दोन फलंदाजांना बाद केले.

भारताकडून सर्वोत्तम परफॉर्मन्स करणाऱ्या रवींद्र जडेजाला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. मात्र रविंद्र जडेजाच्या परफॉर्मस व्यतिरिक्त त्याने सामनावीर पुरस्कार स्वीकारताना प्रेझेन्टेशनमध्ये केलेल्या विधानाची अधिक चर्चा झाल्याचे दिसून आले. हर्शा भोगलेंसोबत बोलताना रवींद्र जडेजा म्हणाला, जर आम्ही असंच खेळत राहिलो तर, जगातला कुठलाही संघ आम्हाला पराभूत करू शकत नाही, असं विधान केलं. त्याने केलेल्या विधानाची चर्चा चांगलीच रंगल्याचे दिसून आले.

सुरुवातीच्या दोन सामन्यात कोणी हात पकडला होता की काय? असा सवाल देखील काही क्रिकेट चाहत्यांनी रवींद्र जडेजाला सोशल मीडियावर विचारल्याचे दिसून आले. तर काहींनी हा अप्रोच सुरुवातीच्या दोन सामन्यात दाखवला असता तर आज सेमी फायनलमध्ये पोहोचण्यासाठी इतर संघांवर अवलंबून राहण्याची वेळ आली नसती. असं देखील सुनावलं. भारतीय संघाला सेमीफायनलमध्ये पोचण्यासाठी आता अफगाणिस्थानला न्यूझीलंडच्या संघाला पराभूत करावं लागणार आहे. (AFGVNZ) जर न्यूझीलंडचा संघ पराभूत झाला तरच भारत सेमीफायनलमध्ये पोहचणार आहे. अन्यथा भारतीय संघाला या स्पर्धेतून आपला गाशा गुंडाळावा लागणार आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.