Namo Shetkari Yojana: राज्य सरकारच्या नमो योजनेचा पहिला हप्ता गुरुवारी होणार जमा; नरेंद्र मोदींच्या हस्ते वितरण

0

Namo Shetkari Yojana: केंद्र सरकार (central government) नंतर आता महाराष्ट्र राज्य (Maharashtra government) सरकारने देखील शेतकऱ्यांना (farmer ) आर्थिक मदत व्हावी यासाठी नमो शेतकरी महा सन्मान योजनेअंतर्गत वार्षिक सहा हजार रुपये आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेच्या पहिल्या हप्त्याचे वितरण गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिर्डीतून होणार आहे. राज्यातील पीएम किसान योजनेचा लाभ मिळणाऱ्या तब्बल 85 लाख 60 हजार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.

शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर, नमो शेतकरी योजेंची घोषणा करण्यात आली होती. आता या योजनेचा पहिला हप्ता गुरुवारी नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते वितरित केला जाणार आहे. पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. आज रविवारी 22 तारखेला प्रत्येक जिल्ह्यात या योजनेत किती लाभार्थी असतील? याची कृषी विभागाकडून जाहीर करण्यात येणार आहे.

गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर असून, शिर्डीमध्ये नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. त्याच सभेतून पंतप्रधान नरेंद्र पीएम किसान योजनेच्या शेतकऱ्यांना 14 वा हप्ता मिळाला होता, केवळ त्याच शेतकऱ्यांना नमो योजनेअंतर्गत दोन हजाराचा हप्ता बँक खात्यात जमा केला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नमो योजनेचा हप्त्याचे वितरण झाल्यानंतर, सोमवारी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत.

पीएम किसान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांनी अद्याप eKYC प्रक्रिया पूर्ण केलेली नसेल, तर अशा शेतकऱ्यां आपली आधार जोडणी प्रक्रिया पूर्ण करून नमो शेतकरी योजनेचाही लाभ घेता येणार असल्याचं कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले होते. जर तुम्हाला पी एम किसान योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या नमो शेतकरी आधार जोडणी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

पीएम किसान योजने प्रमाणेच नमो शेतकरी योजनेची देखील अधिकृत वेबसाइट तयार करण्याचे काम महाराष्ट्र राज्य सरकारने महाआयटी कंपनीकडे दिले आहे. वेबसाईट तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आले आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना आधार जोडणी प्रक्रिया घरबसल्या ऑनलाईन करता येणार आहे.

हे देखील वाचा Jaggery Purity : तुम्ही खरेदी करत असलेला गूळ भेसळयुक्त आहे की नाही हे कसं ओळखाल? घ्या जाणून..

WC 2023 semi final scenario: भारत, न्युझीलंड नंतर तिसरा semifinalist मिळाला; इंग्लंडला किती संधी? वाचा सविस्तर.

NZ vs IND: या चार खेळाडूंना रोखता आलं नाही, तर भारताचा वाजणार बाजा; चार जमेच्या बाजूंमुळे न्युझीलंड आहे प्रचंड सरस..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.