NZ vs IND: या चार खेळाडूंना रोखता आलं नाही, तर भारताचा वाजणार बाजा; चार जमेच्या बाजूंमुळे न्युझीलंड आहे प्रचंड सरस..

0

NZ vs IND: विश्वचषक 2023 (world Cup 2023) मधील सर्वोत्तम दोन संघामध्ये उद्या धर्मशाळा मैदनावर सामना पार पडणार आहे. भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) या दोन संघांमध्ये होणाऱ्या सामन्याकडे अनेकांचं लक्ष असणार आहे. जो संघ हा सामना जिंकेल, तो अव्वल क्रमांकवर पोचणार आहे. दोन्ही संघ जबरदस्त फॉर्ममध्ये असल्याने सामना अटीतटीचा होणार असल्याची शक्यता असली तरी भारतीय संघावर प्रचंड दबाव असणार आहे.

आयसीसी टूर्नामेंटमध्ये (ICC tournament) न्युझीलंडचा संघ भारतीय संघावर हुकूमत गाजवताना पाहायला मिळतो. 2003 पासून भारतीय संघ आयसीसी टूर्नामेंटमध्ये न्युझीलंड संघाविरुद्ध एकदाही जिंकला नाही. 2019 मध्ये झालेल्या विश्वचषकाच्या सेमी फायनलमध्ये भारतीय फलंदाजांना 239 धावांचे आव्हान पार करण्यात अपयश आले होते.

2019 च्या पराभवाची परतफेड करण्याची संधी भारतीय संघाकडे असली तरी हे आव्हान सोप्प नसणार आहे. भारतीय संघ जबरदस्त फॉर्ममध्ये असला तरी उद्याच्या सामन्यात न्यूझीलंडचा संघच वरचड आहे. 2003 पासून आयसीसी टूर्नामेंटमध्ये भारत एकदाही जिंकला नसल्याने एकीकडे हाही दबाव आहे. तर दुसरीकडे हार्दिक पांड्यामुळे (Hardik Pandya) प्लेइंग इलेव्हनचा समतोलही बिघडला आहे.

न्यूझीलंड संघाच्या जमिनीच्या बाजूचा विचार करायचा झाल्यास, चार खेळाडू भारतीय संघासाठी दोखेदुखी ठरू शकतात. यामध्ये सर्वात पुढे ट्रेंट बोल्टचे नाव आहे. भारतीय फलंदाजांना गेल्या काही वर्षांपासून लेप्टआर्म स्पेसर गोलंदाजांनी अनेकदा अडचणीत आणले आहे. धर्मशाळा मैदानावर हा सामना होणार असल्याने जलदगती गोलंदाजांना सुरुवातील मदत देखील असणार आहे. जर ट्रेंट बोल्टने भारतीय संघाला सुरुवातीला धक्के दिले, तर यातून भारतीय संघ सावरणार का? हा मोठा प्रश्न आहे.

भारतीय वंशाचा रचिन रवींद्र हा देखील जबरदस्त फॉर्ममध्ये असून, टेक्निकली परफेक्ट फलंदाज आहे. त्याचा देखील धोका भारतीय संघाला आहे. जर भारतीय गोलंदाजांना त्याला रोखण्यात यश आलं नाही, तर तो मोठी खेळी साकारण्याची शक्यता नाकारता येत नाही.

न्युझीलंड संघाचा सलामीवीर डेव्हॉन कॉन्वे पासूनही भारतीय संघाला धोका आहे. चेन्नई सुपर किंग संघाकडून खेळताना भारतीय खेळपट्ट्यांवर खेळण्याचा तगडा अनुभव डेव्हॉन कॉन्वेला आहे. शिवाय स्पिन गोलंदाजी देखील दमदार खेळत असल्याने भारतीय संघासाठी त्याचेही मोठे आव्हान असेल.

दुखापतीमुळे केन विल्यमसनच्या (Kane Williamson) अनूपस्थितीमध्ये टॉम लॅथम न्यूझीलंड संघाचे कर्णधार पद सांभाळत आहे. भारतीय संघाविरुद्ध टॉम लॅथमचे (Tom Latham) आकडे जबरदस्त आहेत. भारताविरुद्ध खेळताना टॉम लॅथमने जवळपास 55 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. यामध्ये पाच अर्धशतकांचा आणि दोन शतकांचा समावेश आहे.

दुसरीकडे मिचेल सँटनर (Mitchell Santner,) हा देखील भारतीय संघासाठी डोकेदुखी ठरला आहे. गेल्या काही वर्षांपासून भारतीय फलंदाजांना स्पिन गोलंदाजी खेळताना मोठी अडचण होत असल्याचे दिसून आले आहे. याशिवाय भारतीय खेळपट्ट्यांवर खेळण्याचा दांडगा अनुभवही मिचेल सँटनरकडे आहे. जर भारतीय संघाला या पाच खेळाडूना रोखता आले नाही, तर भारताचा मोठा पराभवही होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हे देखील वाचा IND vs NZ: उद्या न्युझीलंड विरुद्ध अशी असेल भारताची प्लेइंग 11; शार्दुल बाहेर, तर हे दोन खेळाडू आत..

Acharya Chanakya Niti: लग्नानंतर नशीब पालटायचं असेल तर याच महिलेशी करा लग्न; अन्यथा उध्वस्तापासून कोणीच वाचवू शकणार नाही..

aaiclas recruitment : 12 वी उत्तीर्ण असाल तर महिना पगार मिळेल 21,500 ; जाणून घ्या भरती विषयी सविस्तर..

Vikas Divyakirti: लग्नाअगोदर दोन-तीन ब्रेकअप गरजेचे; दिव्यकीर्ती यांनी सांगितलेले कारण जाणून तुम्हालाही पटेल..

RRC SECR Recruitment 2023 : रेल्वेत नोकरीची संधी! पदवीधरांसह 10/12 उत्तीर्ण उमेदवारांनाही संधी..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.