Acharya Chanakya Niti: लग्नानंतर नशीब पालटायचं असेल तर याच महिलेशी करा लग्न; अन्यथा उध्वस्तापासून कोणीच वाचवू शकणार नाही…
Acharya Chanakya Niti: आचार्य चाणक्य (acharya Chanakya) हे थोर विद्वान होते. आपल्या चाणक्य नीति (Chanakya Niti) या ग्रंथांमधून त्यांनी समाज हिताच्या अनेक गोष्टींचा उलगडा केला आहे. आजही समाजात आचार्य चाणक्य यांनी केलेल्या उपदेशाच्या मार्गाने असंख्य जण आपला प्रवास करताना पाहायला मिळतात. विवाह (marriage) संबंधी देखील आचार्य चाणक्य यांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत.
लग्न हा आयुष्याचा खूप महत्त्वाचा टप्पा असतो. असं म्हटलं जातं, लग्नानंतर मनुष्याचे दुसरं आयुष्य सुरु होते. वैवाहिक जीवनात आनंद, समाधान हवं असेल तर लग्नापूर्वी कोणत्या महिलेची लग्न करायला हवं? या विषयी आचार्य चाणक्य यांनी उपदेश केला आहे. जो लग्न करणाऱ्या प्रत्येक पुरुषाला माहीत असायला हवा. जाणून घेऊया सविस्तर.
वैवाहिक जीवन सुखी आणि आनंदी करायचं असेल, तर योग्य जोडीदाराची निवड करणे खूप गरजेचे आहे. विवाह करण्यासाठी कोणती स्त्री योग्य आहे? या विषयी आचार्य चाणक्य यांनी आपली मते मांडली आहेत. आचार्य चाणक्य यांच्या मते जी महिला धार्मिक असते, अशा महिलेसोबत विवाह केल्यास कुटुंबात सुख समाधान-शांती येते. साहजिकच सुखी आणि आनंदी कुटुंबामध्ये लक्ष्मीचा सहवास राहतो.
सौंदर्य हे कधीच चिरकाल टिकत नाही. बौद्धिक क्षमता माणसाच्या आयुष्यात कायम सोबत राहते. त्यामुळे विवाहासाठी महिलेची निवड करताना सौंदर्यापेक्षा तिच्या बौद्धिक क्षमतेचा विचार करणे आवश्यक आहे. मात्र पुरुष नेमकं याच गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. सुसंस्कृत आणि संस्कारी महिला असेल, तर आपल्या कुटुंबाची प्रतिष्ठा कायम राहावी, याचा ती नेहमी विचार करत असते. त्यामुळे विवाहासाठी जोडीदाराची निवड करताना, त्याची बौद्धिक क्षमता, मूल्य सिद्धांत या गोष्टी विचारात घ्यायला हव्यात असं आचार्य चाणक्य सांगतात.
जीवन जगत असताना आयुष्यामध्ये चढउतार हे येतातच. मात्र आलेल्या संकटांचा सामना करण्यासाठी कुटुंबाने एकत्रित उभे राहणं फार आवश्यक असतं. यामध्ये पत्नी खूप महत्वाचा घटक आहे. पत्नी संकटांमध्ये आपल्या पतीला खंबीरपणे साथ देणारी असावी. लग्नासाठी जोडीदार निवडताना तो तुम्हाला संकटात साथ देणार आहे की नाही, हे पाहून निवड करायला हवी असं आचार्य चाणक्य सांगतात.
आचार्य चाणक्य सांगतात, आर्थिक परिस्थिती हालकीचे असताना पत्नीने साथ द्यायला हवी. आर्थिक परिस्थिती कमकुवत असताना पत्नीने आपल्या इच्छा, आकांक्षा बाजूला सारून कुटुंबासाठी काटकसर करणे आवश्यक आहे. काटकसर करून जर ती आपला संसार चालवत असेल तर अशी महिला पतीसाठी भाग्यवान असल्याचं चाणक्य सांगतात.
हे देखील वाचा CR Recruitment 2022: दहावी पास उमेदवारांसाठी सेंट्रल रेल्वेत हजारो पदांची मेगा भरती; असा करा ऑनलाईन अर्ज..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम