Virat Kohli century: ..म्हणून विराट करणार नव्हता शतक, केएल राहुलच्या त्या दोन वाक्यात विराटचे मन फिरले..

0

Virat Kohli century: काल भारतीय संघाने विश्वचषक 2023 (world Cup 2023) मधील सलग चौथा सामना दिमागदार पद्धतीने जिंकत सेमी फायनलच्या दिशेने दमदार प्रवास सुरू असल्याचे दाखवून दिले. बांगलादेश (IND vs BAN) संघाानेे दिलेेले 257 धावांचे दिलेले आव्हान भारतीय संघाने 42 षटकात पूर्ण केले. मात्र या विजयापेक्षा जास्त चर्चा विराट कोहलीने (virat kohli) साजऱ्या केलेल्या आपल्या कारकिर्दीच्या 48 व्या शतकाची झाली.

दमदार सलामी नंतर विराट कोहली आणि केएल राहुलने (kl Rahul) केलेल्या भागीदारीच्या जोरावर भारतीय संघाने तीन गाड्यांच्या मोबदल्यात बांगलादेश संघावर विजय मिळवला. एकवेळ विराट कोहलीचे शतक अपूर्ण राहिल की, काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र केएल राहुलच्या पुढाकारामुळे भारतीय चेस मास्टर विराट कोहलीचे शतक साजरे झाले.

एकीकडे विजयासाठी भारतीय संघाला तीस धावांची आवश्यकता होती. तर दुसरीकडे विराट कोहलीला आपले शतक साजरे करण्यासाठी देखील 30 धावांचीच आवश्यकता होती. या परिस्थितीमध्ये विराट कोहलीने आपले शतक होऊ शकते, ही अशा सोडून दिली होती. मात्र केएल राहुलने तू स्ट्राईक घेऊन तुझे शतक पूर्ण करू शकतो असं सांगितले.

राहुलच्या विधानानंतर विराट कोहली म्हणाला, जर एका धावेसाठी पळालो नाही, तर पर्सनल माइलस्टोटोनसाठी मी खेळत असल्याचा मेसेज जाईल. तो योग्य नाही, आणि मलाही नको आहे. विराट कोहलीच्या या विधानानंतर केएल राहुल म्हणाला, जर पर्सनल माइलस्टोन बनत असेल, तर आपण का नाही करायचा. आपण सहज सामना जिंकत आहोत. तू तुझे शतक पूर्ण कर.

केएल राहुलने विराट कोहलीला दिलेल्या या सल्ल्यानंतर विराट कोहलीने आक्रमक पवित्रा घेत, दोन चौकार आणि तीन षटकार खेचले. विराट कोहलीच्या शतकाला केवळ केएल राहुलच नाही, तर अंपायर देखील मदत केल्याचे पाहायला मिळाले. विजयासाठी दोन आणि विराटच्या शतकासाठी तीन धावांची गरज असताना नसूम अहमदने (Nasum Ahmed) लेक साईडला टाकलेला चेंडू वाईट असल्याचे स्पष्ट दिसत होते. मात्र अंपायरने बॉल वाईड दिला नाही.

वाईट चेंडूवर आयसीसीचा नियम

अंपायरने विराट कोहलीच्या शतकाला मदत केल्याचा आरोप क्रिकेट चाहत्यांसह समीक्षकांनी देखील केला. मात्र वाईड बॉल विषयी आयसीसीने (ICC) नियमात बदल केला आहे. फलंदाजी करताना फलंदाज ज्या ठिकाणी उभा आहे. चेंडू जर गोलंदाजाने त्याच ठिकाणी टाकला, आणि फलंदाजाने आपली दिशा बदलली. तर तो चेंडू वाईट देता येणार नाही. आयसीसी कडून हा नियम 2022 मध्ये करण्यात आला आहे. आयसीसीआयच्या नियमानुसारच अंपायरने आपला निर्णय दिला असल्याचेही आता बोललं जात आहे.

हे देखील वाचा Hardik Pandya ruled out: दुखापतीमुळे हार्दिक पांड्या बाहेर; न्युझीलंड विरुद्धच्या सामन्यात संघात होणार दोन बदल..

Sara Tendulkar Viral video: गिलने चौकार मारताच साराने वाजवल्या जोरजोरात टाळ्या; व्हिडिओ व्हायरल झाल्याने डेटिंगच्या चर्चा..

Virat kohli hundred: होय विराटचे शतक व्हावे म्हणून अंपायरने दिला नाही वाइड बॉल; विराटकडे पाहून स्मित हास्यही केले, पाहा व्हिडिओ..

Lalit Patil drug case: ललित पाटिल ड्रग्स प्रकरणात नवा ट्विस्ट; ललितच्या खुलाशाने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.