Sara Tendulkar Viral video: गिलने चौकार मारताच साराने वाजवल्या जोरजोरात टाळ्या; व्हिडिओ व्हायरल झाल्याने डेटिंगच्या चर्चा..

0

Sara Tendulkar Viral video: शुभमन गिलने (Shubman Gill) डेंग्यूच्या आजारातून सावरल्यानंतर दमदार पुनरागमन केले आहे. काल खेळला गेलेल्या भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यात शुभमन गिलने दमदार अर्धशतक झळकावले. मात्र शुभमन गीलच्या अर्धशतकापेक्षा जास्त चर्चा झाली ती सारा तेंडुलकरच्या (sara Tendulkar) उपस्थीतीची.

भारत आणि बांगलादेश यांचा सामना पाहण्यासाठी काल सारा तेंडुलकर स्टेडियममध्ये उपस्थित होती. शुभमन गिल फलंदाजी करत असताना काल सारा तेंडुलकर देत असलेल्या रिएक्शन कॅमेरात कैद झाल्या आहेत. शुभमन गिलची फलंदाजी सारा तेंडुलकर एन्जॉय करत असतानाची अनेक दृश्ये कॅमेरामनने टिकल्यानंतर सारा तेंडुलकर ट्रेण्ड देखील झाली.

शुभमन गिलला पाहण्यासाठी सारा तेंडुलकर सामना पाहण्यासाठी आली असल्याची जोरदार चर्चा आता सोशल मीडियावर रंगली असून, दोघेही एकमेकांना डेट करत असल्याचे देखील बोललं जात आहे. शुभमन गिलने चौकार मारल्यानंतर, सारा तेंडुलकर प्रचंड आनंदित झाल्याचं दिसून आले. सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल दोघे एकमेकांना डेट करत असल्या चर्चा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहेत.

तारा तेंडुलकरने केवळ शुभमन गिलने मारलेल्या चौकारवरच खुश होऊन टाळ्या वाजवल्या नाहीत, तर त्याने घेतलेल्या कॅच नंतर देखील ती खुश होऊन टाळ्या वाजवताना पाहायला मिळाली. एकूणच शुभमन गिलच्या खेळाला एन्जॉय करत त्याला प्रोत्साहन देखील देत असल्याचं दिसून आलं. त्यामुळे आता पुन्हा एकदा दोघांच्या डेटिंगच्या चर्चा रंगल्या आहेत.

डेटिंग करत असल्याचं झालं स्पष्ट?

सारा तेंडुलकर आणि गिल एकमेकांना डेट करत असल्याचे आता स्पष्ट झालं असल्याचं बोललं जात आहे. शुभमन गिला एका इंटरव्यूमध्ये तू साराला डेट करतोयस का? हा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचे उत्तर देताना गिल म्हणाला होता, ”may be” त्यामुळे देखील या चर्चा रंगल्या होत्या. भारताचा पुढील सामना आता रविवारी 22 ऑक्टोंबरला न्युझीलंड विरुद्ध धर्मशाला मैदानावर खेळवण्यात येणार आहे.

न्युझीलंड विरुद्ध रविवारी होणाऱ्या सामन्यात आता सारा तेंडुलकर शुभमन गिलला सपोर्ट करण्यासाठी पोहोचणार का? याची देखील आता अनेकांना उत्सुकता लागली आहे. भारतीय संघाने लगातार चार सामने जिंकून या विश्वचषकात दमदार सुरुवात केली आहे. सेमी फायनलमध्ये पोहोचण्यासाठी भारतीय संघाला आता केवळ पाच सामन्यात दोन विजयाची आवश्यकता आहे.

हे देखील वाचाVirat kohli hundred: होय विराटचे शतक व्हावे म्हणून अंपायरने दिला नाही वाइड बॉल; विराटकडे पाहून स्मित हास्यही केले, पाहा व्हिडिओ..

PM Kisan 15th Installment: या तारखेला जमा होणार पिएम किसान योजनेचा पंधरा हप्ता; तत्पूर्वी करावे लागणार हे काम..

Lalit Patil drug case: ललित पाटिल ड्रग्स प्रकरणात नवा ट्विस्ट; ललितच्या खुलाशाने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.