Lalit Patil drug case: ललित पाटिल ड्रग्स प्रकरणात नवा ट्विस्ट; ललितच्या खुलाशाने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ..

0

Lalit Patil drug case: ससून रुग्णालयातून (sassoon hospital) ड्रग्स रॅकेट चालवणाऱ्या ट्रक माफिया ललित पाटील (lalit Patil) याला अखेर अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी (mumbai police) चेन्नई मधून ललित पाटील याला अटक केल्यानंतर, आता या प्रकरणाने वेगळं वळण घेतलं आहे. ललित पाटील बरोबरच काल नाशिक मधून ललित पाटील याच्या दोन मैत्रिणींना देखील अटक करण्यात आली आहे. ललित पाटील आणि दोन महिलांच्या चौकशीतून आता अनेक धक्कादायक गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत.

मुंबई पोलिसांनी ललित पाटील याला चेन्नईतून अटक केल्यानंतर, पोलिसांनी प्रज्ञा कांबळे (Pragya Kamble) आणि अर्चना निकम (Archana Nikam) या दोन महिलांना अटक केली. या दोन्ही महिला ललित पाटील याच्या मैत्रिणीं आहेत. ललित पाटील याने फरार होण्याअगोदर एक दिवस आपली मैत्रीण प्रज्ञा कांबळे हिच्याकडे येऊन वास्तव्य केले होते. एवढच नाही, तर तिच्याकडून 25 लाख रुपये घेतल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.

ड्रग्स माफिया ललित पाटीलची बेनामी संपत्ती प्रज्ञा कांबळेकडे असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात आली आहे. ललितने प्रज्ञाकडे चांदी देखील ठेवल्याची माहिती समोर आली आहे. प्रज्ञा कांबळेच्या चौकशीतून आता अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. नाशिक, पुणे या शहरांसह ड्रग्स रॅकेट आणखी कुठे कुठे सुरू होते? या ड्रग रॅकेटमध्ये कोणा कोणाचा सहभाग आहे? याची देखील माहिती सगळी माहिती मिळण्याची शक्यता आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेत्या सुषमा अंधारे आणि कसब्याचे काँग्रेसचे आमदार रवी धंगेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन, या ड्रेस रॅकेटमध्ये शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे (Dada bhuse) आणि भाजपच्या बड्या नेत्याच्या सहभाग असल्याचा खळबळजनक आरोप केला होता. ललित पाटील याला अटक केल्यानंतर, ललित पाटीलने माध्यमाला खुलासा केल्याने यामध्ये तथ्य असल्याचं बोललं जात आहे.

पोलिसांनी अटक केल्यानंतर, घेऊन जाताना ललित पाटील याला माध्यमांशी बोलू दिलं गेलं नाही. मात्र पोलीस घेऊन जात असताना ललित पाटीलने माध्यमांशी पळत पळत बोलताना या प्रकरणाला नवीन ट्विस्ट दिला आहे. मी फरार झालो नाही. मला पळवले गेले. असं सांगत त्याने या प्रकरणात कोणाकोणाचा सहभाग आहे त्या सगळ्यांची नावे सांगणार, असाही खुलासा केला. ललित पाटीलने दिलेल्या या प्रतिक्रियेमुळे आता या प्रकरणाचा सूत्रधार कोण? याचीही माहिती मिळण्याची शक्यता असून राज्यातल्या जनतेला उत्सुकता देखील लागली आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

ससून रुग्णालयातून गेल्या 16 महिन्यांपासून ललित पाटील हा ड्रग्स रॅकेट चालवत होता. ससून रुग्णालयामध्ये तो सोळा महिन्यांपासून उपचार घेत असल्याचे सांगून कैदी रुग्ण कक्ष 16 या रूममध्ये राहत होता. ससून रुग्णालयातील कैदी रुग्ण कक्ष सोळा या रूमला ललित पाटीलने आपल्या ड्रग्स रॅकेटचा अड्डा बनवला होता. रुग्णालय स्टाफ पोलीस यांच्या मदतीने हे रॅकेट चालत असल्याचं आरोप होत आहे.

प्रकरण कसे उघडकीस आले?

ससून रुग्णालयात उपचार घेत असल्याचा सांगून 16 महिन्यांपासून तो ससून रुग्णालयातून ड्रग्स रॅकेट चालवत होता. रॅकेट सुरू असताना एक दिवस ससून रुग्णालयाच्या गेटवरच तब्बल दोन कोटी रुपयांचे ड्रग्स सापडले. त्यानंतर हे प्रकरण चर्चेत आले. ड्रग्स सापडल्यानंतर, ललित फरार झाला. सुषमा अंधारे आणि रवींद्र धंगेकर यांनी हे प्रकरण प्रकाशझोतात आणले.

प्रकरणाशी दादा भुसे यांचा संबंध असण्याची का आहे शक्यता..?

दादा भुसे पालकमंत्री असलेल्या नाशिक जिल्ह्यात ललित पाटील याचा भाऊ अमली पदार्थांचा कारखाना चालवत होता. एवढेच नाही, तर शिवसेना पक्षात दादा भुसे असताना दादा भुसे यांनी ललित पाटील याचा मातोश्रीवर पक्षप्रवेश देखील करून घेतला होता. त्यामुळे या प्रकरणाचा संबंध दादा भुसे यांच्यासोबत जोडला जात आहे.

हे देखील वाचा PM Kisan 15th Installment: या तारखेला जमा होणार पिएम किसान योजनेचा पंधरा हप्ता; तत्पूर्वी करावे लागणार हे काम..

IND vs BAN World Cup 2023: तिसऱ्यांदा उलटफेर करण्यासाठी बांगलादेश सज्ज; या चार कारणामुळे बांगलादेश करू शकतो गेम..

SA vs NED: आफ्रिकेचा पराभव करत नेदरलँडने बिघडवलं सेमी फायनलचे गणित; कोणाला किती संधी? वाचा सविस्तर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.