Virat kohli hundred: होय विराटचे शतक व्हावे म्हणून अंपायरने दिला नाही वाइड बॉल; विराटकडे पाहून स्मित हास्यही केले, पाहा व्हिडिओ..

0

Virat kohli hundred: काल भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यामध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात भारतीय संघाने विजयाचा चौकार ठोकला. फलंदाज आणि गोलंदाज यांनी केलेल्या दमदार कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने एकहाती विजय मिळवला. मात्र भारताचे विजयापेक्षा विराट कोहलीने (Virat kohli) केलेल्या शतकाची जोरदार चर्चा झाली. (Virat Kohli 48 hundred in ODI cricket)

भारताच्या भेदक माऱ्यापुढे बांगलादेश संघाच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. फलंदाजी साठी अनुकूल असणाऱ्या खेळपट्टीवर बांगलादेश संघाने भारतासमोर 257 धावांचे आव्हान उभं केलं. दमदार सलामी आणि त्यानंतर विराट कोहलीने केलेल्या शतकाच्या जोरावर भारताने हे आव्हान 41.3 षटकात तीन गड्यांच्या मोबदल्यात सहज पूर्ण केले.

भारतीय संघाने या विश्वचषकात आपला चौथा विजय संपादन केला. मात्र विजया पेक्षा जास्त चर्चा विराट कोहलीने केलेल्या शतकाची झाली. चर्चा होण्याला कारणही तसंच आहे. भारतीय संघाला विजयासाठी 30 धावांची आवश्यकता होती. आणि विराटच्या शतकाला देखील तितक्याच धावांची आवश्यकता होती.

भारताचा विजय आणि विराट कोहलीचे शतक पूर्ण होण्यासाठी 30 धावांची आवश्यकता होती. त्यामुळे विराटचे शतक पूर्ण होणार का? या विषययी अनेकांना उत्सुकता लागली होती. केएल राहुलने (kl Rahul) लायसन्स दिल्यानंतर विराट कोहलीने (virat kohli) आक्रमक पवित्रा घेतला. आणि तब्बल तीन षटकार खेचले. मात्र या दरम्यान एक आश्चर्यकारक गोष्ट घडली, ज्यामुळे अंपायरला मोठ्या प्रमाणात ट्रोल देखील केलं जात आहे.

42 व्या षटकात नसूम अहमद (Nasum Ahmed) गोलंदाजी करण्यासाठी आला असताना भारताला विजयासाठी तीन धावांची आवश्यकता होती, तर विराटच्या शतकासाठी दोन धावांची आवश्यकता होती. हा प्रसंग तयार झाला असताना नसून अहमदने चेंडू वाईड टाकला. लेक साईडला टाकलेला चेंडू पूर्णपणे वाईड असल्याचे स्पष्ट दिसत असताना देखील अंपायर रिचर्ड केटलबरो (Richard Kettleborough) यांनी वाईड दिला नाही.

अंपायरच्या या निर्णयावर समालोचकांनी देखील आक्षेप घेतला. एवढंच नाही तर, चेंडू वाईट टाकल्यानंतर, अंपायरच्या चेहऱ्यावर देखील स्मित हास्य होते. साहजिकच त्यामुळे अंपायरने विराटचे शतक पूर्ण होण्यासाठी चेंडू वाईट असतानाही दिला नाही, हे स्पष्ट होतं. या प्रकारामुळे रिचर्ड केटलबरो यांना काहींनी ट्रोल केले तर काहींनी कौतुक देखील केले.

हे देखील वाचा Lalit Patil drug case: ललित पाटिल ड्रग्स प्रकरणात नवा ट्विस्ट; ललितच्या खुलाशाने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ..

PM Kisan 15th Installment: या तारखेला जमा होणार पिएम किसान योजनेचा पंधरा हप्ता; तत्पूर्वी करावे लागणार हे काम..

SA vs NED: आफ्रिकेचा पराभव करत नेदरलँडने बिघडवलं सेमी फायनलचे गणित; कोणाला किती संधी? वाचा सविस्तर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.