IND vs NZ: उद्या न्युझीलंड विरुद्ध अशी असेल भारताची प्लेइंग 11; शार्दुल बाहेर, तर हे दोन खेळाडू आत..
IND vs NZ: भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) सामने दरम्यान हार्दिक पांड्या (Hardik Pandya) दुखापत झाल्याने भारतीय संघ आता संकटात सापडला आहे. यापुढे विश्वचषकामध्ये (world Cup 2023) भारताला दक्षिण आफ्रिका, (south africa) न्यूझीलंड, इंग्लंड (England) अशा बलाढ्य संघांचा सामना करायचा आहे. मात्र अशातच हार्दिक पांड्याची दुखापत कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि कोच राहुल द्रविडसाठी (Rahul Dravid) चिंतेचा विषय बनला आहे.
बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात गोलंदाजी करताना हार्दिक पांद्याचा पाय मुरगळल्याने त्याला दुखापत झाली होती. त्याच्या पायाच्या स्कॅनचे रिपोर्ट विषयी अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाही. उपचारासाठी त्याला नॅशनल क्रिकेट अकॅडमी (NCA) बंगलोर याठिकाणी पाठवण्यात आले आहे. हार्दिक पांड्या उद्या रविवारी 22 तारखेला होणाऱ्या न्युझीलंड विरुद्धच्या सामन्यात खेळणार नाही.
न्युझीलंड नंतर पुढच्या सामन्यात तो अवेलेबल असणार आहे की नाही, याविषयी देखील अधिक माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे भारतीय संघासाठी हा मोठा चिंतेचा विषय आहे. हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीमुळे भारतीय संघाला एक अतिरिक्त गोलंदाज आणि अतिरिक्त फलंदाजाचा पर्याय मिळणार नाही. त्यामुळे नाईलाजाने संघात दोन बदल करावे लागणार आहेत.
हार्दिक पांडेच्या दुखापतीमुळे आता शार्दुल ठाकूरला (shardul Thakur) बाहेर बसावं लागणार आहे. शार्दुल ठाकूर कडून सामन्यात दहा षटके टाकून घेणे भारतीय संघासाठी फायदेशीर नाही. आतापर्यंत खेळलेल्या सामन्यांमध्ये शार्दुल ठाकूरला फारशी चमक दाखवत आली नाही. हार्दिक पांड्याच्या दुखापतीमुळे पाच स्पेशालिस्ट गोलंदाज घेऊनच भारतीय संघाला मैदानात उतरावे लागणार आहे. त्यामुळे शार्दुलच्या जागेवर मोहम्मद शमीला (Mohammed Shami) भारताच्या प्लेइंग 11 मध्ये संधी मिळणार आहे.
हार्दिकच्या जाण्यामुळे भारतीय संघाला अखेरच्या षटकात फिनिशिंग टच देणाऱ्या खेळाडूची आवश्यकता आहे. त्यामुळे एक स्पेशालिस्ट फलंदाज मैदानात उतरावा लागणार आहे. सहाव्या क्रमांकावर एका स्पेशालिस्ट फलंदाजाची आवश्यकता असल्याने, भारतीय संघ सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) सोबत जाणार असल्याची माहिती आहे.
ईशान की सूर्यकुमार यादव
एकीकडे सूर्यकुमार यादवच्या नावाची चर्चा असली तरी ईशान किशनचे (Ishan Kishan) नाव देखील चर्चेत आहे. मात्र चार आणि पाच क्रमांकाचे फलंदाज सेट असल्याने सहाव्या क्रमांकावर ईशानपेक्षा सूर्यकुमार यादव अधिक प्रभावशाली ठरू शकतो. असा टीम मॅनेजमेंटचा विचार आहे. न्युझीलँड विरुद्ध भारतीय संघाचा सामना धरमशाळा मैदानावर होणार आहे. धरमशाळा खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल आहे. त्यामुळे एक फायर पॉवर फलंदाज संघात असणे फायदेशीर ठरणार आहे. साहजिक या सगळ्या गोष्टींचा विचार करून ईशान किशन अगोदर सूर्यकुमार यादवला प्लेइंग11 मध्ये संधी दिली जाणार आहे.
हे देखील वाचा NTPC Recruitment 2023: या उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी; जाणून घ्या सर्व डिटेल्स..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम