RRC SECR Recruitment 2023 : रेल्वेत नोकरीची संधी! पदवीधरांसह 10/12 उत्तीर्ण उमेदवारांनाही संधी..
RRC SECR Recruitment 2023 : जर तुम्ही पदवीधर किंवा दहावी बारावी उत्तीर्ण असाल, तर तुमच्यासाठी रेल्वे विभागांमध्ये नोकरीची मोठी संधी आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (South East Central Railway) अंतर्गत क्रीडा कोट्यातून काही पदांची डायरेक्ट भरती केली जात आहे. यासंदर्भातली अधिसूचना जारी करण्यात आली असून, उमेदवारांना 13 नोव्हेंबर 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहेत.
रेल्वे विभागाकडून केल्या जाणाऱ्या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीसाठी एकूण 46 पात्र उमेदवारांची भरती केली जाणार आहे. यासाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा आणि अर्ज शुल्क याविषयी देखील माहिती देण्यात आली आहे. जाणून घेऊया या भरती प्रक्रिया संदर्भात सविस्तर अपडेट.
पद/ शैक्षणिक पात्रता
एकूण 46 रिक्त पदांसाठी केल्या जाणाऱ्या या भरतीसाठी उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेविषयी सांगायची झाल्यास, उमेदवार हा कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर मान्यता शिक्षण मंडळातून बारावी आणि दहावी पास असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा/ महत्वाच्या तारखा
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (South East Central Railway) अंतर्गत क्रीडा कोट्यातून केल्या जाणाऱ्या भरतीसाठी उमेदवारांचे वय निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये उमेदवारांचे वय हे 18 ते 25 या दरम्यान असणे आवश्यक आहे. ओबीसी उमेदवारांसाठी 28, तर एससी/एसटी उमेदवारांसाठी तीस वर्षांची वयोमर्यादा असणार आहे. 14 ऑक्टोंबर पासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, १३ नोव्हेंबर पर्यंत अर्ज करण्याची शेवटची मदत दिली आहे.
ऑनलाईन अर्ज
इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आपल्या मोबाईल मधील क्रोमवर https://secr.indianrailways.gov.in/ असं सर्च करा. त्यानंतर तुमच्या समोर अधिकृत वेबसाईट ओपन होईल. त्यानंतर तुम्ही अर्ज करू शकता.
अशी आहे भरती प्रक्रिया
भरती प्रक्रियेविषयी सांगायचं झाल्यास, अर्ज केलेल्या उमेदवारांना क्रमांकानुसार चाचणीसाठी बोलवण्यात येईल. त्यानंतर चाचणी करिता निवडलेल्या अर्ज धारकांना पुढील टप्प्यासाठी बोलवण्यात येईल. चाचणी परीक्षेमध्ये उमेदवारांना 40 गुणांपैकी 25 गुण मिळवणे आवश्यक आहे. तरच उमेदवारांना पुढच्या टप्प्यासाठी बोलवण्यात येईल. त्यानंतर गुणवत्तेच्या आधारे अधिकृत वेबसाईटवर निवड केलेल्या उमेदवारांची यादी लावली जाणार आहे.
हे देखील वाचा Virat Kohli century: ..म्हणून विराट करणार नव्हता शतक, केएल राहुलच्या त्या दोन वाक्यात विराटचे मन फिरले..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम