aaiclas recruitment : 12 वी उत्तीर्ण असाल तर महिना पगार मिळेल 21,500 ; जाणून घ्या भरती विषयी सविस्तर..

0

aaiclas recruitment : दिवसेंदिवस बेरोजगारीचा स्तर वाढत चालला आहे. खाजगी आणि शासकीय सेवांमध्ये देखील नोकरीच्या संधी उपलब्ध नसल्याने ही खूप मोठी चिंतेची बाब आहे. बेरोजगारी मोठ्या प्रमाणात असली तरी काही विभागामध्ये कमी जास्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. AAI कार्गो लॉजिस्टिक्स आणि अलाइड सर्व्हिसेस कंपनीमध्ये बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भरती निघाली आहे.

बारावी उमेदवारांसाठी AAI कार्गो लॉजिस्टिक्स आणि अलाइड सर्व्हिसेस कंपनीमध्ये होणाऱ्या भरती प्रक्रिया संदर्भातली अधिसूचना करण्यात आली असून, इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांना 15 नोव्हेंबर 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहेत. जाणून घेऊया भरती प्रक्रिया संदर्भातली साविस्तर अपडेट..

जागांचा तपशील 

AAI कार्गो लॉजिस्टिक्स आणि अलाइड सर्व्हिसेस कंपनीमध्ये होणाऱ्या भरतीसाठी एकूण 436 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. 436 भरण्यात येणाऱ्या रिक्त जागा ह्या असिस्टंट सिक्योरिटी या पदासाठी होणार आहेत. या पदासाठी उमेदवारांची वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे.

शैक्षणिक पात्रता 

AAI कार्गो लॉजिस्टिक्स आणि अलाइड सर्व्हिसेस कंपनीमध्ये नोकरी करू इच्छित असणाऱ्या उमेदवारांसाठी शैक्षणिक पात्रता ६० गुणांसह बारावी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. (खुल्या आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी) उमेदवार हा जर एससी/एसटी प्रवर्गातील असेल तर 55% गुणासह बारावी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा 

AAI कार्गो लॉजिस्टिक्स आणि अलाइड सर्व्हिसेस कंपनीमध्ये नोकरी करू इच्छित असणाऱ्या उमेदवारांचे वय हे एक ऑक्टोबर 2023 पर्यंत १८ ते २७ वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे. उमेदवार जर SC/ST प्रवर्गातील असेल, तर या वयोमर्यादेमध्ये त्याला पाच वर्षाची अतिरिक्त सूट दिली जाईल. ओबीसी उमेदवारांना 18 ते 30 वर्ष वर्ष वयोमर्यादा असेल.

परीक्षा फी/ नोकरीचे ठिकाण

खुल्या आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना AAI कार्गो लॉजिस्टिक्स आणि अलाइड सर्व्हिसेस कंपनीमध्ये नोकरीसाठी अर्ज करायचा असेल तर 500 अर्ज शुल्क आकारले जाईल. ST/ SC आणि EWS/महिलांसाठी 100 रुपये अर्ज शुल्क आकारले जाईल. निवड करण्यात येणाऱ्या उमेदवारांना संपूर्ण भारतामध्ये नोकरी करावी लागणार आहे.

ऑनलाईन अर्ज आणि पगार

उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. यासाठी तुमच्या मोबाईल मधील क्रोमवर जाऊन तुम्ही http://www.aaiclas.aero/ असं सर्च करा. त्यानंतर या विभागाची अधिकृत वेबसाईट ओपन होईल. त्यानंतर तुम्ही सविस्तर अर्ज करू शकता.

पगाराविषयी सांगायचे झाल्यास, निवड केल्यानंतर उमेदवारांना पहिल्या वर्षी 21 हजार 500, दुसऱ्या वर्षी 22000 आणि तिसऱ्या वर्षी 22 हजार पाचशे रुपये पगार दिला जाईल. जर तुम्ही या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असाल, तर तुम्हाला पंधरा नोव्हेंबर पर्यंत अर्ज करता येणार आहेत.

हे देखील वाचा Vikas Divyakirti: लग्नाअगोदर दोन-तीन ब्रेकअप गरजेचे; दिव्यकीर्ती यांनी सांगितलेले कारण जाणून तुम्हालाही पटेल..

IND vs NZ: उद्या न्युझीलंड विरुद्ध अशी असेल भारताची प्लेइंग 11; शार्दुल बाहेर, तर हे दोन खेळाडू आत..

Acharya Chanakya Niti: लग्नानंतर नशीब पालटायचं असेल तर याच महिलेशी करा लग्न; अन्यथा उध्वस्तापासून कोणीच वाचवू शकणार नाही..

RRC SECR Recruitment 2023 : रेल्वेत नोकरीची संधी! पदवीधरांसह 10/12 उत्तीर्ण उमेदवारांनाही संधी..

Virat Kohli century: ..म्हणून विराट करणार नव्हता शतक, केएल राहुलच्या त्या दोन वाक्यात विराटचे मन फिरले..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.