WC 2023 semi final scenario: भारत, न्युझीलंड नंतर तिसरा semifinalist मिळाला; इंग्लंडला किती संधी? वाचा सविस्तर..

0

WC 2023 semi final scenario: विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धा रंगतदार अवस्थेत आली असून, अनेक तगड्या संघांना सेमी फायनल पूर्वीच आपला गाशा गुंडाळावा लागणार आहे. काल खेळल्या गेलेल्या दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड (ENG vs SA) यांच्यामधील सामन्यात इंग्लंड संघाला दारून पराभवाचा सामना करावा लागला. या परभवा बरोबरच इंग्लंड संघाचे सेमी फायनलमध्ये पोहोचण्याचे स्वप्न जवळपास भंगले आहे. (WC 2023 semi final scenario)

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे दोन संघ या विश्वचषकामध्ये प्रबळ दावेदार मानले जात होते. मात्र या दोन्ही संघांची सुरुवात फारच निराशाजनक झाली. पहिल्याच सामन्यात इंग्लंड संघाला न्यूझीलंड संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला. त्यांनतर अफगाणिस्तान संघाने इंग्लंडला पराभवाची धूळ चारली. या पराभवातून इंग्लंडचा संघ सावरतो तोवरच दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडला तब्बल 229 धावांनी धूळ चारली.

दक्षिण आफ्रिका संघाला देखील नेदरलँड कडून पराभव पहावा लागला. मात्र ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन बलाढ्य संघाला दक्षिण आफ्रिकेने पराभूत केल्याने आता त्यांच्याकडे सेमी फायनलमध्ये पोहोचण्याची मोठी संधी आहे. दक्षिण आफ्रिकेला आपल्या उर्वरित पाच सामन्यामधून केवळ तीन सामने जिंकायचे आहत. यामध्ये भारत, न्युझीलंड, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश संघाचा समावेश आहे.

भारत आणि न्यूझीलंड हे दोन संघ सेमी फायनलच्या उंबरठ्यावर आहेत. या दोन्ही संघांना पाच सामन्यात केवळ दोन विजय आवश्यक आहेत. त्यामुळे भारत, न्यूझीलंड नंतर सेमी फायनलमध्ये पोहचणार दक्षिण आफ्रिका हा तिसरा संघ ठरू शकतो. कारण त्यांच्याकडे इतर संघाच्या तुलनेत अधिक संधी देखील आहे.

इंग्लंड संघाला जर सेमी फायनलमध्ये पोहचायचं असेल, तर उर्वरित पाचही सामने जिंकावे लागणार आहेत. मात्र हे आव्हान प्रचंड तगडं वाटत आहे. त्याचे कारण म्हणजे, त्यांना भारत, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान या तीन संघांना पराभूत करावं लागणार आहे. या तीन पैकी एका जरी संघाने त्यांना पराभूत केलं, तर अधिकृतरित्या इंग्लंडच्या सेमी फायनलमध्ये पोहोचण्याचा आशा संपुष्टात येणार आहेत.

भारत-न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिकेनंतर ऑस्ट्रेलिया संघाला सेमी फायनलमध्ये पोहोचण्याची जास्त संधी आहे. सेमी फायनमध्ये पोहचण्यासाठी ऑस्ट्रेलियाला आपल्या उर्वरित पाच सामन्यांमध्ये चार विजयाची आवश्यकता आहे. पाच सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाला इंग्लड, भारत आणि न्यूझीलंड या तीन बलाढ्य संघांपैकी किमान दोघांना पराभूत करावे लागणार आहे. तरच ते सेमी फायनलमध्ये पोहचू शकतात.

हे देखील वाचा IND vs NZ World Cup 2023: सूर्याच्या मनगटाला दुखापत, तर ईशान किशनही..; सामन्यापूर्वी भारत संकटात, कशी असेल प्लेइंग11..

NZ vs IND: या चार खेळाडूंना रोखता आलं नाही, तर भारताचा वाजणार बाजा; चार जमेच्या बाजूंमुळे न्युझीलंड आहे प्रचंड सरस..

aaiclas recruitment : 12 वी उत्तीर्ण असाल तर महिना पगार मिळेल 21,500 ; जाणून घ्या भरती विषयी सविस्तर..

Vikas Divyakirti: लग्नाअगोदर दोन-तीन ब्रेकअप गरजेचे; दिव्यकीर्ती यांनी सांगितलेले कारण जाणून तुम्हालाही पटेल..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.