IND vs NZ World Cup 2023: सूर्याच्या मनगटाला दुखापत, तर ईशान किशनही..; सामन्यापूर्वी भारत संकटात, कशी असेल प्लेइंग11..

0

IND vs NZ World Cup 2023: 2023 विश्वचषकात 21 वा सामना आज भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) या दोन तुल्यबळ संघांमध्ये खेळवण्यात येणार आहे. दोन्ही संघ सुरुवातीचे चारही सामने दिमागदार पद्धतीने जिंकत विश्वचषकामध्ये गुंतवलिकेत अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर विराजमानही आहेत. दुपारी दोन वाजल्यापासून क्रिकेट चाहत्यांना हा सामना पाहायला मिळणार आहे. मात्र तत्पूर्वी सामन्यापूर्वीच भारतीय संघ संकटात सापडला आहे.

2019 मध्ये झालेल्या पराभवाची परतफेड करण्याची संधी भारतीय संघाकडे चालून आली आहे. भारतीय संघ दमदार फॉर्ममध्ये देखील आहे. अशातच बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) दुखापत झाल्याने, भारतीय प्लेईंग इलेव्हनचे समीकरण बिघडलं आहे. राहुल द्रविडने (Rahul Dravid) घेतलेल्या पत्रकार परिषदेत सूर्यकुमार यादव आणि शमीला अंतिम 11 मध्ये संधी मिळणार असल्याचे संकेत दिले होते. मात्र आता सूर्यकुमारला दुखापत झाल्याने टीम इंडिया संकटात आहे.

न्युझीलंड विरुद्धच्या सामना हार्दिक पांड्या खेळणार नसल्याने, संघात दोन बदल करावे लागणार आहेत. असतानाच ईशान किशन (ishan Kishan) आणि सूर्यकुमार यादवला (suryakumar Yadav) झालेली दुखापत भारतीय संघावर मोठं संकट आणणारी आहे. काल सराव करताना रघुने टाकलेल्या थ्रो सूर्यकुमार यादवच्या मनगटावर जाऊन आदळला आणि तो दुखापत झाला.

सूर्यकुमार यादवच्या मनगटाला चेंडू लागल्यानंतर, त्याने मनगटाला पट्टी देखील बांधली होती. एवढेच नाही, तर त्यानंतर सूर्यकुमार यादवने सरावही केला नाही. सूर्यकुमार यादवची दुखापत किती गंभीर आहे, याविषयी अद्याप माहिती देण्यात आली नाही. मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार न्युझीलंड विरुद्ध तो खेळू शकणार नाही.

दुसरीकडे ईशान किशनला देखील सराव करत असताना मानेवर मधमाशी चावली. ईशान किशनने देखील त्यांनतर सराव केला नाही. मात्र ईशान किशन विषयी फारशी चिंता करण्याची आवश्यकता नाही. न्युझीलंड विरुद्ध खेळण्यासाठी तो सज्ज आहे. परंतु सहाव्या क्रमांकाची जागा मोकळी असल्याने या क्रमांकावर सूर्यकुमार यादव बेस्ट पर्याय ठरू शकला असता.

अशी असेल प्लेइंग11

रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव/ईशान किशन, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत, शमी, सिराज

हे देखील वाचा NZ vs IND: या चार खेळाडूंना रोखता आलं नाही, तर भारताचा वाजणार बाजा; चार जमेच्या बाजूंमुळे न्युझीलंड आहे प्रचंड सरस..

PM Kisan 15th Installment: या तारखेला जमा होणार पिएम किसान योजनेचा पंधरा हप्ता; तत्पूर्वी करावे लागणार हे काम..

aaiclas recruitment : 12 वी उत्तीर्ण असाल तर महिना पगार मिळेल 21,500 ; जाणून घ्या भरती विषयी सविस्तर..

Vikas Divyakirti: लग्नाअगोदर दोन-तीन ब्रेकअप गरजेचे; दिव्यकीर्ती यांनी सांगितलेले कारण जाणून तुम्हालाही पटेल..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.