Amazon Summer Sale: Amazon वर सर्वच किराणा मालावर 50 टक्क्यांपर्यंत सूट; जाणून घ्या सविस्तर..

0

Amazon Summer Sale: जगप्रसिद्ध ई-कॉमर्स वेबसाइट अमेझॉन आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नेहमीच सेलचं आयोजन करत असते. खासकरून या वेबसाईटवरून ग्राहक मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी करताना दिसून येतात. मात्र आता ॲमेझॉन घरगुती वापरातील आणि किराणा मालावर भन्नाट ऑफर्स घेऊन आलं आहे. आता अमेझॉनवर ग्राहकांना स्वस्तात किराणा माल खरेदी करता येणार आहे. ॲमेझॉनवर सुपर व्हॅल्यू डेज’ हा सेल आजपासून 10 मेपर्यंत सुरू राहणार आहे.

ॲमेझॉनने आपल्या ग्राहकांसाठी Amazon Summer Sale आयोजित केला असून, ग्राहकांना ‘सुपर व्हॅल्यू डेज’च्या माध्यमातून घरगुती उपयोगी आणि किराणा मालावर मोठी सूट मिळणार आहे. अनेक खाद्य पदार्थांच्या किंमती गगनाला भिडल्या असल्याने, ग्राहकांसाठी हा सेल मोठी पर्वणी ठरणार असल्याचं बोललं जात आहे. अनेक खाद्यपदार्थांवर, तसेच खाद्यतेल, इतर काही महत्त्वाच्या खाद्यपदार्थांवरही या सेलमध्ये ग्राहकांना मोठी सूट मिळणार आहे. एवढेच नाही तर, घरगुती वापरातील जीवनावश्यक वस्तू, आणि किराणा मालावर ग्राहकांना तब्बल पन्नास टक्‍क्‍यांपर्यंत सूट मिळणार असल्याने या सेलची जोरदार चर्चा रंगली आहे.

मोस्टली आपण मोबाईल तसेच इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर मोठ्या प्रमाणात सूट मिळत असल्याचं ऐकतो. अनेक ई-कॉमर्स वेबसाइट देखील मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर मोठ मोठ्या ऑफर्स देतात. दोन दिवसापूर्वी फ्लिपकार्टकडून देखील सेलचं आयोजन करण्यात आले आहे. मात्र त्या सेलमध्ये मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर सूट देण्यात आली आहे. आता अमेझॉनने देखील आगळावेगळा सेल आयोजित केला असून, किराणा मालाची खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी हा सेल मोठी पर्वणी ठरणार आहे. आता आपण या सेलमध्ये कोण-कोणत्या घरगुती वापरातील वस्तूंवर आणि किराणामालावर, किती टक्के सूट देण्यात आली आहे? हे सविस्तर जाणून घेऊया.

Amazon ने आजपासून १० मे पर्यंत तुमच्यासाठी ‘सुपर व्हॅल्यू डेज’च्या माध्यमातून किराणा, घरगुती जीवनावश्यक वस्तू, तसेच पॅकेज केलेले खाद्यपदार्थ, पर्सनल केयर, बेबी केयर उत्पादनांवर तब्बल५०% पर्यंत सूट दिली आहे. विशेष म्हणजे ग्राहकांना दावत फॉर्च्यून ऑईल, आशीर्वाद, कॅडबरी आणि नेविया यासारख्या ब्रँडेड वस्तूंवर देखील 50 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट देण्यात आला आहे. त्यामुळे ग्राहकांना आता ब्रँडेड वस्तू तसेच पदार्थ निम्म्या किंमतीत खरेदी करता येणार आहे.

या आहेत ऑफर्स

दावत सुपर बासमती तांदूळ जर पाच किलो खरेदी केला तर, तुम्हाला 25 टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे. अनेक जण दावत सुपर बासमती राइस खरेदी करताना दिसून येतात. जर तुम्ही हा तांदूळ खरेदी करणार असाल, तर तुम्ही ॲमेझॉनवर जाऊन यासंदर्भातली ऑफर चेक करून खरेदी करू शकता. Amazon.in वर हा बासमती तांदूळ तुम्ही साधारणपणे साडे पाचशे रुपयांपर्यंत खरेदी करू शकता.

जर तुम्ही आशीर्वाद या ब्रँडचे मसाले खरेदी करत असाल, तर तुमच्यासाठी ॲमेझॉनवर या मसाल्यांचा कॉम्बो पॅक मिळणार आहे. ॲमेझॉनवर जर तुम्ही हा पॅक खरेदी केला, तर तुमची जवळपास 50 टक्के रक्कम वाचणार आहे. आशीर्वाद स्पाईस कॉम्बो पॅकमध्ये तीखट, हळद, धना पावडर तुम्हाला मिळणार आहे. या पॅकची किंमत ॲमेझॉनवर फक्त १४८ रूपये असणार आहे.

लहान मुलांच्या आवडीचे कॅडबरी, ओरियो, चॉकलेटी सँडविच बिस्कीटांचा फॅमिली पॅक तुम्हाला केवळ 60 रुपयांमध्ये मिळणार आहे. म्हणजेच या पॅक खरेदीवर तुम्ही तब्बल तीस रुपये वाचू शकणार आहे. अनेकजण फोरच्युन ऑइल खरेदी करताना पाहायला मिळतात. या ब्रँडेड ऑईलवर देखील ॲमेझॉनवर डिस्काउंट देण्यात आला आहे.

अनेक जण ‘टाटा टी ‘चाच चहा पिताना दिसून येतात. जर तुम्ही ‘टाटा-टी’ पीत असाल, आणि तुम्हाला ‘टाटा-टी’ खरेदी करायचा असेल, तर तुम्ही ॲमेझॉनवर फक्त 528 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. ॲमेझॉनवर यासह अनेक ब्रॅडेंड कंपनीच्या पदार्थांबरोबरच इतरही अनेक खाद्यपदार्थांवर पन्नास टक्क्यांपर्यंत डिस्काउंट देण्यात आला आहे. जर तुम्हाला किराणामाल खरेदी करायचा असेल, तर तुम्ही यावर क्लिक करून पाहू शकता.

हे देखील वाचा Flipkart Big Saving Days Sale: फ्लिपकार्टचा धूम धडाका! नवीन स्मार्टफोसह सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर तब्बल 80 टक्‍क्‍यांपर्यंत डिस्काउंट..

Onion: शेतकऱ्यांनो कांदा विकण्याची गडबड करू नका; या कारणामुळे महिन्याभरातच कांदा सत्तर रुपये किलोने विकला जाणार..

India Post Bharti: पोस्ट ऑफिसमध्ये 40 हजार पदांची मेगा भरती; दहावी पास उमेदवारांची अशी केली जाणार निवड..

Raj Thackeray: पोलिसांना धक्का देऊन, संदिप देशपांडे गेले पळून; महिला कॉन्स्टेबल जखमी व्हिडिओ व्हायरल..

Viral video: स्टोअर रुममध्ये करताना मुख्याध्यापक आणि शिक्षिकेला गावकऱ्यांनी पकडले रंगेहाथ; तो व्हिडिओही झाला व्हायरल.. 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.