MSRTC Requirement 2022: एसटी महामंडळात मेगा भरती; ‘असा’ करा ऑनलाइन अर्ज..
MSRTC Requirement 2022: एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण व्हावे यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी मोठा संप पुकारला होता. एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाला अनेक संघटनांनी देखील पाठिंबा दर्शविला होता. मात्र अखेर संप मागे घेत, कर्मचारी कामावर रुजू होताना पाहायला मिळत आहे. तब्बल साडे पाच महिन्यानंतर एसटी कामगारांनी पुकारलेला संप मिटल्याने प्रवाशांचे देखील होणारे हाल आता संपुष्टात आले आहेत. अशातच आता एसटी महामंडळाच्या पुणे विभागात शिकाऊ उमेदवार या पदासाठी भरती करण्यात येणार असल्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे राज्य सरकारने एसटी महामंडळात काही पदांची भरती देखील केली. कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आवाहन करून देखील कर्मचारी कामावर रूजू झाले नसल्याने, काही विभागात काही पदांची भरती देखील करण्यात आली. मात्र आता नव्याने पुणे विभागात शिकाऊ उमेदवार या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. ज्या उमेदवारांना एस टी महामंडळमध्ये नोकरी करायची आहे, अशा उमेदवारांनी https://apprenticeship.gov.in/pages/Apprenticeship/home.aspx या वेबसाईटला भेट देऊन सविस्तर माहिती घेऊ शकता.
एकीकडे महागाईने उच्चांक गाठला असून, दुसरीकडे बेरोजगारीचा दर देखील दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे साहजिकच अनेकांना रोजगाराची आवश्यकता असल्याचं पाहायला मिळतं. त्यातच कोरोनामुळे अनेकांची दोन वर्षे वाया गेली. दहावी, बारावी तसेच पदवीधर झालेल्या उमेदवारांना को रो ना काळात कुठेही नोकरीसाठी अर्ज करता आला नाही. एवढेच नाही तर, अनेकांना चांगल्या पगाराची नोकरी देखील को रो ना काळात गमवावी लागली. मात्र आता सरकारी तसेच खासगी कंपन्यांमध्ये देखील भरती प्रक्रिया मोठ्या प्रमाणात राबवली जात असून, नोकरी करणाऱ्यांसाठी ही मोठी सुवर्णसंधी आहे.
एसटी महामंडळात पुणे विभागात निघाली भरती
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामध्ये पुणे विभागाने, शिकाऊ उमेदवारांच्या पदाची भरती प्रक्रिया राबवत असल्याची अधिसूचना जारी केली आहे. ज्या उमेदवारांना एसटी महामंडळात नोकरी करायची आहे अशा उमेदवारांनी https://apprenticeship.gov.in/pages/Apprenticeship/home.aspx या वेबसाईटवर जाऊन अर्ज भरणे आवश्यक आहे. या भरती संदर्भातली अधिसूचना उमेदवारांना या वेबसाईटवरच पाहता येणार आहे.
असा करा अर्ज
एसटी महामंडळमध्ये ज्या उमेदवारांना नोकरी करायची आहे, असे उमेदवार https://apprenticeship.gov.in/pages/Apprenticeship/home.aspx यावर क्लिक करून अर्ज करू शकता. या भरती संदर्भात ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी त्यांच्या मोबाईलमध्ये क्रोमवर जाऊन, https://apprenticeship.gov.in/pages/Apprenticeship/home.aspx असं सर्च करणं आवश्यक आहे. तुमच्या क्रोमवर जाऊन https://apprenticeship.gov.in/pages/Apprenticeship/home.aspx असं सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर, भारत सरकार अप्रेंटिसशिपची अधिकृत वेबसाईट ओपन झालेली दिसेल. यानंतर तुम्ही खाली स्क्रोल करत गेल्यानंतर, तुम्हाला यासंदर्भातील अधिसूचना पाहून अर्ज करता येणार आहे. यावर क्लिक करून तुम्ही डायरेक्टही अर्ज भरु शकता
भरलेला अर्ज या ठिकाणी करा जमा
उमेदवारांनी apprenticeship.gov.in/pages/Apprenticeship/home.aspx या वेबसाईटवर जाऊन एसटी महामंडळ संदर्भात भरलेला ऑनलाइन फॉर्मची प्रत शंकरशेठ येथील राज्य परिवहन महामंडळाचे विभागीय कार्यालय या ठिकाणी जमा करायचा आहे. हा फॉर्म तुम्ही, सकाळी दहा ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत जमा करू शकता.
हे देखील वाचा Onion: शेतकऱ्यांनो कांदा विकण्याची गडबड करू नका; महिन्याभरातच कांदा सत्तर रुपये किलोने विकला जाणार..
SAUR KRUSHI PUMP YOJANA: सौर कृषी पंपासाठी राज्य सरकारकडून आता ९५ टक्के अनुदान; असा करा अर्ज..
Marriage tips: या 4 गोष्टी पत्नीपासून लपवून ठेवाव्याच लागतील, अन्यथा होईल सत्यानाश..
Raj Thackeray: राज ठाकरे यांनी आपल्या नातवाचे नाव ठेवले आगळे वेगळे; जाणून घ्या, नावाचा नावाचा अर्थ..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम