Marriage tips: या 4 गोष्टी पत्नीपासून लपवून ठेवाव्याच लागतील, अन्यथा होईल सत्यानाश..

0

Marriage tips: कुठल्याही नात्यांमध्ये प्रेमाची, विश्वासाची आणि एकमेकांना समजून घेण्याची आवश्यकता असते. जर नात्यांमध्ये या गोष्टीं नसतील, तर तनाव, चिडचिड जास्त प्रमाणात पाहायला मिळते. एवढेंच नाही, तर नाते तुटण्याची देखील दाट शक्यता असते. वैवाहिक जीवनामध्ये तर प्रेम, विश्वास आणि एकमेकांना समजून घेण्याची भावना नसेल, तर संसार उध्वस्त देखील होतो. हे अलीकडच्या काळात कोणालाही वेगळं सांगण्याची गरज नाही. वैवाहिक जीवनामध्ये पती-पत्नी दोघांमध्ये जर प्रेम विश्वास आणि एकमेकांना समजून घेण्याची भावना नसेल तर समजून जा, हे लग्न दिर्घकाळ टिकणार नाही. आज आम्ही तुम्हाला वैवाहिक जीवनाविषयी अशा चार गोष्टी सांगणार आहोत, ज्यामुळे तुमच्या नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो.

अनेकांचे लग्नाअगोदरचे आयुष्य आणि लग्न झाल्यानंतचे आयुष्य पूर्णतः वेगळं असतं. लग्नाअगोदर आपल्याला बिंदास राहायची सवय लागलेली असते. आपले मित्र आई-वडील किंवा जवळचे नातेवाईक आपल्याला चांगल्या प्रकारे ओळखत असल्याने, आपण अनेकदा चुकलो, तरी समजून घेत असतात. मात्र लग्नानंतर तुम्हाला हा हलगर्जीपणा करून चालत नाही. वैवाहिक जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल, तर तुम्हाला पत्नीच्या भावनांची कदर करावी लागते. खूप छोट्या छोट्या गोष्टींकडे तुम्हाला लक्ष द्यावे लागेल. पती-पत्नी दोघांनीही एकमेकांशी संवाद साधताना दोघेही अनेक गोष्टींचा उलगडा करू शकतात. तुम्ही दोघेही एकांतात मनमोकळ्या गप्पा मारू शकता. मात्र अशाही काही गोष्टी आहेत, ज्या तुम्ही एकमेकांशी बोलल्यामुळे तुमच्या नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो, आज आपण याच गोष्टींवर बोलणार आहोत.

भूतकाळातील नात्याबद्दल चर्चा करू नका

लग्नाअगोदर पत्नी आणि पती दोघांचेही बाहेर अफेअर असणे अलीकडच्या काळात नॉर्मल गोष्ट झाली आहे. एवढंच नाही, तर दोघेही आपल्या भूतकाळाबद्दल एकमेकांशी बोलताना देखील आपण पाहतो. यात विशेष असं काही राहिलं नाही. मात्र वारंवार आपण आपल्या भूतकाळातील नात्यांवर चर्चा करत राहिलो तर, हे कुठल्याही पत्नीला आवडणार नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या ‘एक्स’विषयी माहिती देऊ शकता. मात्र वारंवार या गोष्टींची चर्चा करण्यात काहीही अर्थ नाही. यामुळे तुमच्या पत्नीचे मन दुखावले जाईल. आणि तुमच्या नात्यात एक प्रकारे दुरावा निर्माण होण्यास मदत होईल. आपल्या पत्नीपासून काहीही लपवणे उचित ठरत नसल्याचे अनेक जण म्हणतात, हे खरं आहे. पण आम्ही तुमच्या पत्नीपासून काही लपवू नका, तर काही गोष्टीं तुमच्याकडेच ठेवा असं म्हणतो आहोत. हे तुमच्या लक्षात आले असेलच.

पत्नीसमोर चूकूनही करू नका प्रशंसा

वैवाहिक जीवनामध्ये यशस्वी व्हायचे असेल, तर चुकूनही तुम्ही तुमच्या पत्नी समोर तुमच्या मैत्रिणीची किंवा इतर कोणत्याही महिलेची स्तुती करू नका. आपण अनेकदा पत्नीला टोमणा मारण्यासाठी इतर महिलांची स्तुती करतो. मात्र यामुळे तुमच्या नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. कुठल्याही पत्नीला आपला पती दुसऱ्या एका महिलेची स्तुती करत असेल, तर ते कधीही पटत नाही, हे लक्षात घ्या. वास्तविक पाहता, कोणीही छान दिसत असेल तर त्याची स्तुती करण्यात काहीही गैर नाही. मात्र पत्नी समोरच स्तुती करणं मोठा मुर्खपणा ठरेल. जगातल्या कुठल्याही महिलेला इतर महिलेची स्तुती झालेली पाहवत नाही. यामुळे तुमच्या पत्नीच्या मनात तुमच्या विषयी गैरसमज निर्माण होऊ शकतात. कित्येकदा तुमच्या पत्नीला असंही वाटू शकतं, आपला नवरा आपल्यावर खुश नसल्याने नवऱ्याला आता आपल्यात रस वाटत नाही. त्यामुळे इतर महिलांची स्तुती करत आहे. त्यामुळे विनाकारण पत्नीच्या मनात अस्थिरता वाढवण्यात काहीही अर्थ नाही.

कपड्यांवरून टोमके मारू नका

लग्नानंतर मुली आपल्या आवडीची कपडे घालण्यास प्राधान्य देतात. मात्र आपल्या पत्नीने घातलेले कपडे आपल्याला आवडतीलच असं नाही. कधी-कधी तुम्हाला पत्नीने घातलेले कपडे आवडत नसले, तरीदेखील त्यावर लगेच रिऍक्ट होऊन चालत नाही. जर तुम्ही तुमच्या पत्नीच्या पोशाखावर ज्ञान देऊ लागला, तर पत्नीला कदापिही आवडणार नाही. पत्नीने तुमच्या आवडीचे कपडे परिधान करायला हवेत, अशी तुमची इच्छा असेल, तर यात काहीही गैर नाही. मात्र या गोष्टी समजून सांगण्याचा अनेक पद्धती आहेत. तुम्ही प्रेमाने पत्नीला तुला कोणते कपडे योग्य दिसतात? कोणते कपडे छान वाटतात? हे प्रेमाने समजावून सांगू शकता. शेवटी प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात, त्यामुळे या गोष्टीकडे तुम्ही गांभीर्याने पाहून स्वातंत्र्य देणे आवश्यक आहे.

चूकूनही तुलना करू नका

वास्तविक पाहता कोणाचीही कधीही कोणाशीही तुलना करू नये. प्रत्येक जण वेगवेगळ्या विचाराचा असल्यामुळे कोणाशीही कोणाची तुलना होऊ शकत नाही. प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या गोष्टीमध्ये कमकुवत आणि स्ट्रॉंग असतो. हा नियम तुमच्या पत्नीबरोबर देखील लागू होतो. तुमच्या पत्नीची जर इतर स्त्रीशी तुलना केली, तर ते तुमच्या पत्नीला कदापिही आवडणार नाही. मग ती तुलना चांगली असो, किंवा वाईट असो. अलीकडच्या मुली स्वतंत्र विचारांचे असल्याने, त्यांना आपले स्वतंत्र अस्तित्व असावे, असं नेहमी वाटत असतं. त्यामुळे तुम्ही चुकूनही तुमच्या पत्नीची तुलना कोणाशीही करू नका. अन्यथा यामुळे तुमच्या वैवाहिक नात्यांमध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो.

हे देखील वाचा JCB tire burst: हवा भरताना जेसीबीच्या टायरचा झाला स्पोट; कर्मचाऱ्यांच्या शरीराचे टुकडे उडाले हवेत, व्हिडिओ पाहून उडतोय थरकाप..

second hand bike: तीन महीने वापलरेली Pulsar १८ हजारांत Splendor Plus १६ हजारांत तर CB unicorn 30 हजारांत; जाणून घ्या अधिक..

Onion: शेतकऱ्यांनो कांदा विकण्याची गडबड करू नका; या कारणामुळे महिन्याभरातच कांदा सत्तर रुपये किलोने विकला जाणार..

Lifestyle: दररोज से ‘क्स केल्याने काय होतं माहिती आहे? से क्स विषयी जाणून घ्या सविस्तर..

Railway job: दहावी पास विद्यार्थ्यांसाठी रेल्वेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी; परीक्षेविना केली जाणार निवड,जाणून घ्या अधिक..

India Post Bharti: पोस्ट ऑफिसमध्ये 40 हजार पदांची मेगा भरती; दहावी पास उमेदवारांची अशी केली जाणार निवड..

Viral Video: हळदी कार्यक्रमात मुलगा पडला मुलीच्या प्रेमात; नाचत नाचत हातवारे करून असा  दिला मोबाइल नंबर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.