Mahavitaran: अजित पवारांसह अनेक बड्या मंत्र्यांची लाखो रुपयांची विज बिले थकीत; जाणून घ्या, कोणाच्या नावावर कीती थकबाकी..

0

Mahavitaran: शेतकरी (farmer) तसेच सर्वसामान्य लोकांना थकीत वीज बिल भरण्यासाठी आमदार मंत्री तसेच महावितरण (Mahavitaran)  देखील धारेवर धरत असते. आमदार, मंत्री नेहमी शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्य विज धारकांना वेळेवर वीज बिल भरण्याचे सल्ले देत असतात. मात्र आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांसह (Ajit pawar) तब्बल 372 जणांची 1 कोटी 27 लाखांची वीजबिल थकीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. उर्जा विभागाकडून थकीत विज बिल असणाऱ्या मंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली असल्याने, आता सोशल मिडीयावर जोरदार चर्चा रंगली आहे.

सर्वसामान्य तसेच शेतकऱ्यांसमोर विज बिल हा मोठा ग्रहण प्रश्न आहे. सर्वसामान्य तसेच शेतकऱ्यांना भारनियमनाला मोठ्या प्रमाणात सामोरं जावं लागतं. शेतकऱ्यांना कधीही वेळेवर वीज मिळत नाही. दिवसभर होल्टेज कमी जास्त होत असल्याने, शेतकऱ्यांच्या मोटरा देखील व्यवस्थित चालत नाहीत. त्यामुळे सहाजिकच शेतकऱ्यांना रात्री आपलं भरणं काढावं लागतं. खूप मोठ्या प्रमाणात तडजोड करून, शेतकऱ्यांना वीज वापरावी लागते. मात्र वीज बिल भरतेवेळी शेतकऱ्यांवर कोणीही दयामाया दाखवत नाही. शेतकऱ्यांचे दहा पंधरा हजार वीज बिल थकीत असले तरीदेखील महावितरणकडून वीज तोडण्यात येते.

सर्वसामान्य तसेच शेतकऱ्यांची केवळ पंधरा वीस हजार रुपयाची वीजबिल थकीत असली तरी देखील त्याची महावितरणाकडून वीज तोडली जाते. सोबतच सरकारमधील मंत्री देखील शेतकऱ्यांनी वेळेत विज बिल भरणे आवश्यक असल्याच्या बड्या बड्या बाता मारतात. मात्र आता याच मंत्र्यांची तब्बल 1 कोटी 27 लाखांची वीजबिले थकीत असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. काही महिन्यांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील शेतकऱ्यांना आपली थकीत वीज बिले भरावे लागतील, कोणालाही मोफत वीज मिळणार नसल्याचे म्हटलं होतं. मात्र आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह तब्बल ३७२ आमदार आणि मंत्र्यांची विज बिले थकित आहे. त्यामुळे आता आपल्याच बुडाखाली अंधार असणारे हे मंत्री शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्यांना थकीत वीज बिल वेळेत भरा, असे आवाहन कसे काय करू शकतात? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

आता आपण ऊर्जा विभागाने जाहीर केलेल्या यादीनुसार कोणकोणत्या मंत्र्याकडे किती वीज बिल थकीत आहे हे पाहू

कोणाची किती विज बिल थकीत?

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांची 25 हजार रूपये थकबाकी आहे. कोव्हीडच्या उपचारासाठी महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सरकारी तिजोरीतून 34 लाख रुपये खर्च केल्याची बातमी समोर आली होती. मात्र नंतर राजेश टोपे यांनी मी वैयक्तिक माझा उपचारासाठी एक रुपयाही सरकारी तिजोरीतून खर्च केला नाही. 34 लाख रुपयांची बिले माझ्या आईसाठी खर्च झाले असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. आता याच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची तब्बल चार लाख रुपयांचे विज बिल थकित आहे. राज्यमंत्री विश्वजित कदम यांची देखील 20 हजार रुपये वीज बिल देणे बाकी आहे.

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची 3 हजार 541 रूपये थकबाकी राहीली आहे. तसेच महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात दहा हजार रुपये वीज बिल थकीत आहे. आमदार अशिष जयस्वाल यांचे तब्बल 3 लाख 36 हजार रुपये विज बिल थकित आहे. श्रीमंत युवराज संभाजीराजे यांचे तब्बल 1 लाख 25 हजार 934 रुपये वीज बिल थकीत आहे. माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांची एकूण चार विज कनेक्शन आहेत. या चार विज कनेक्शनची मिळून तब्बल तीन लाख रुपये विज बिल थकित आहे.

माजी मंत्री सुभाष देशमुख यांच्या नावावर कोणतीच बिल कनेक्शन आहेत या तीन वीज कनेक्शन आचे मिळून साठ हजार रुपये वीज बिल थकीत असल्याची माहिती आहे. मान खटावचे भाजपचे भाजप आमदार जयकुमार गोरे यांची तब्बल सात लाख रुपये विज बिल थकित आहे. महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे तब्बल दोन लाख 63 हजार रुपये वीज बिल थकीत असल्याची माहिती ऊर्जा विभागाने दिली आहे.

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि सध्या जेलमध्ये असणाऱ्या अनिल देशमुखांची तब्बल 2 लाख 25 हजारांचे विज बिल थकित आहे. पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे यांचे देखील वीस हजार विज बिल थकित आहे. माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या पत्नी सुमन सदाशिव खोत यांची देखील 1 लाख 32 हजार 435 रूपये विज बिल थकित आहे.

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे देखील 70  हजार रूपयांचे विज बिल थकित आहे. बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांचे तब्बल 3 लाख 53 हजार रूपये विज बिल थकित आहे. करमाळ्याचे आमदार बबनराव शिंदे आणि त्यांचे आमदार बंधू संजय शिंदे या दोघांच्या कुटुंबीयांची एकूण 22 विज कनेक्शन आहेत. २२ वीज कनेक्शन मिळवून तब्बल 7 लाख 86 हजार रुपये विज बिल थकित आहे. आमदार संग्राम थोपटे यांची एकूण चार विज कनेक्शन आहेत. चार कनेक्शनची मिळून एकूण 1 लाख रुपये विज बिल थकित आहे.

शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांचे तब्बल 2 लाख 80 हजार विज बिल थकित आहे. माजी खासदार प्रतापराव जाधव यांचे देखील तब्बल दिड लाख रुपयांचे विज बिल थकित आहे. शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचे देखील 50 हजार रुपयांचे विज बिल थकित आहे. खासदार नवनीत राणा यांचे पती रवी राणा यांचे देखील 40 हजार रुपये विज बिल थकित आहे. माजी मंत्री विजयकुमार गावित यांचे 42 हजारांचे विज बिल थकित आहे. संदीपान भुमरे यांचे देखील तब्बल1 लाख 50 हजार रुपयांचे विज बिल थकीत आहे.

राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे देखील 2 लाख 30 हजार रुपयांचे विज बिल थकित आहे. राज्यमंत्री संजय बनसोडे यांचे देखील 50 हजार रुपयांचे विज बिल थकित आहे. खासदार रजनीताई पाटील यांचे देखील 3 लाख रुपये विज बिल थकित आहे. आमदार प्रकाश सोळंके यांचे 80 हजार रुपयांचे विज बिल थकित आहे. आमदार महेश शिंदे यांचे 70 हजार रुपये विज बिल थकित आहे. महाराष्ट्राचे माजी मंत्री सुरेश खाडे यांच्या कुटुंबीयांचे एकूण 1 लाख 32 हजार विज बिल थकित आहे.

हे देखील वाचा Onion: शेतकऱ्यांनो कांदा विकण्याची गडबड करू नका; या कारणामुळे महिन्याभरातच कांदा सत्तर रुपये किलोने विकला जाणार..

second hand bike: तीन महीने वापलरेली Pulsar १८ हजारांत Splendor Plus १६ हजारांत तर CB unicorn 30 हजारांत; जाणून घ्या अधिक..

SAUR KRUSHI PUMP YOJANA: सौर कृषी पंपासाठी राज्य सरकारकडून आता ९५ टक्के अनुदान; असा करा अर्ज..

Marriage tips: या 4 गोष्टी पत्नीपासून लपवून ठेवाव्याच लागतील, अन्यथा होईल सत्यानाश..

Railway job: दहावी पास विद्यार्थ्यांसाठी रेल्वेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी; परीक्षेविना केली जाणार निवड,जाणून घ्या अधिक..

India Post Bharti: पोस्ट ऑफिसमध्ये 40 हजार पदांची मेगा भरती; दहावी पास उमेदवारांची अशी केली जाणार निवड..

JCB tire burst: हवा भरताना जेसीबीच्या टायरचा झाला स्पोट; कर्मचाऱ्यांच्या शरीराचे टुकडे उडाले हवेत, व्हिडिओ पाहून उडतोय थरकाप..

wheat: जबरदस्त पौष्टिक आणि भरघोस उत्पन्न मिळवून देणाऱ्या शरबती गव्हाला आहे सर्वाधिक मागणी; जाणून घ्या अधिक..

Raj Thackeray: राज ठाकरे यांनी आपल्या नातवाचे नाव ठेवले आगळे वेगळे; जाणून घ्या, नावाचा नावाचा अर्थ..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.