beauty vibes: मेकअप पेक्षाही सुंदर आणि मुलायम दिसेल चेहरा, फक्त लावा हा ‘फेस’लेप’; लग्नाला जाताना तर हमखास लावा सगळ्यांच्या नजरा..

0

beauty vibes: सुंदर दिसणे कोणाला आवडत नाही. इतरांपेक्षा आपण उजवे दिसावे, असं प्रत्येकाला नेहमी वाटतं असतं. त्यासाठी आपण नेहमी प्रयत्न देखील करतो. मात्र अनेकांच्या चेहऱ्यांवर सुरकुत्या, काळे डाग, अशा अनेक समस्या असतात. यामुळे अनेकजण त्रस्त देखील असतात. मात्र आता या समस्यांपासून तुम्ही घरगुती उपाय करून आराम मिळवू शकता. यामुळे तुमची त्वचा खुप मुलायम होण्यास मदत तर होणार आहेच, शिवाय आता तुम्हाला मेकअप (makeup) करण्याची देखील आवश्यकता भासणार नाही.

एखाद्या लग्न पार्टीत किंवा वाढविसाच्या पार्टीमध्ये जाताना इतरांच्या चेहर्‍यापेक्षा आपला चेहरा उजळून दिसावा असं प्रत्येकाला वाटतं असतं. तुम्हाला देखील असं वाटत असेल तर, हा लेख तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. कारण आपण या लेखात घरगुती उपाय करून चेहऱ्यावर असणारे काळे डाग कसे घालवायचे आणि आपली त्वचा कशी मुलायम करायची हे सविस्तर जाणून घेणार आहोत.

चेहऱ्यावर काळे डाग, सुरकुत्या, तसेच पिंपल यामुळे अनेक जण त्रस्त असतात. ही समस्या जवळजवळ सर्वांनाच असते. चेहऱ्यावर सतत मेकअप केल्याने चेहऱ्यावरवर वाईट परिणाम देखील होतात. याकडे आपण दुर्लक्ष करतो, मात्र यामुळे चेहऱ्याची खूप मोठ्या प्रमाणात हानी होते. वेगवेगळ्या ब्रँडचे वेगवेगळे पदार्थ रासायनिक पद्धतीने बनवले जातात. आपण हे प्रोडक्ट सतत वापरतो, आणि याचा परिणाम नकळत आपल्या चेहऱ्यावर होतो. मात्र आपण याकडे दुर्लक्ष करतो. आणि सुंदर दिसण्यासाठी मेकअपचाच सहारा घेतो. तरीदेखील आपल्याला हवे तसे रिझल्ट मिळत नाहीत. आता तुम्हाला सुंदर आणि मुलायम चेहरा हवा असेल, तर काही घरगुती उपाय करावे लागणार आहेत.

तांदळाचं पीठ

तांदळाचे पीठ हे जवळपास प्रत्येकाच्या घरात पाहायला मिळतं. अनेकांना तांदळाचे पिठ किती गुणकारी आहे, हे माहितही नसेल, मात्र आज आम्ही तुम्हाला तांदळाचे पीठ किती गुणकारी आहे, हे सांगणार आहोत. तांदळाच्या पिठाबरोबरच आपल्याला आणखी काही पदार्थ लागणार आहेत. हे सर्व पदार्थ आपल्याला एकजीव करून त्याची पेस्ट बनवायची आहे. सर्वप्रथम तुम्ही तांदळाचे पीठ एका वाटीमध्ये घ्यायचं आहे. हे प्रमाण साधारण एक चमचा घ्या.

बेसन पीठ (besan)

तांदळाच्या पिठाबरोबरच तुम्हाला बेसन पिठाचा एक चमचा देखील तुम्ही ज्या वाटीत तांदळाचे पीठ टाकलं आहे, त्यामध्ये टाकायचं आहे. बेसन पिठामध्ये खूप औषधी गुणधर्म आहेत, हे तुम्हाला माहितीच असेल. तुम्ही अनेकदा ऐकलं असेल, किंवा पाहीलंही असेल, लहान मुलांना लहानपणी आंघोळ घालताना नेहमी बेसन पीठ चोळत असतात. त्यामुळे बेसन पीठ आपला चेहरा मुलायम बनवण्यासाठी खूप उपयोगी ठरते.

कच्चे दूध milk

शेळी किंवा गाईला वासरू झालं असेल, तर तुम्हाला त्याच गाईचे दूध तुमच्या प्रयोगांमध्ये वापरायचं आहे. तुम्हाला माहिती असेल, दुधामध्ये ‘लॅ क्टि क ऍ सि ड चे’ प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात असते. आणि हे लॅ क्टि क ऍ सि ड आपल्या चेहऱ्यावर असणारा काळसरपणा दूर करण्याचं काम करते. तुम्हाला दूध हे कच्चच घ्यायचं आहे, हे लक्षात घ्या. तांदळाचे पीठ, बेसन पीठ, कच्चे दूध, हे सर्व घेतल्यानंतर तुम्हाला लिंबाचा रस देखील लागणार आहे.

लिंबाचा रस lemon

तांदळाचे पीठ, बेसन पीठ, कच्चे दूध, हे एका वाटीत काढून घेतल्यानंतर तुम्हाला दोन लिंबाचा रस देखील यामध्ये टाकायचा आहे. लिंबू हे प्रचंड गुणकारी आहे, हे तुम्हाला वेगळे सांगण्याची गरज नाही. लिंबामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ‘विटामिन सी’ असते. विटामिन सी हे आपल्या चेहऱ्याला मुलायम बनवण्यासाठी मदत करतं हे तुम्ही अनेक वेळा ऐकलं असेल. तुम्ही बाजारात अनेक क्रीम खरेदी करताना विटामिन सी हा घटक त्यामध्ये लिहीलेला देखील पाहिला असेल.

मध  honey

‘लिंबाच्या रसाप्रमाणेच मध देखील खूप गुणकारी औषध आहे. मध आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे, हे तुम्हाला चांगल्याप्रकारे माहिती आहे‌‌. मात्र मध आपल्या चेहऱ्यावर असणाऱ्या मृ त पेशी देखील नष्ट करण्यास मदत करते. आता तुम्हाला आपण वरील पाहिलेले सर्व पदार्थ एका वाटीत घ्यायचे आहेत. तांदळाचे पीठ, बेसन पीठ, लिंबाचा रस, कच्चे दूध आणि मध हे सर्व पदार्थ एका वाटीमध्ये व्यवस्थित मिश्रण करून घ्यायचे आहेत.

एका वाटीमध्ये हे सर्व पदार्थ मिश्रण करून घेताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, ती म्हणजे यात किंचितही पाणी टाकायचं नाही. आपल्या चेहऱ्याला पुरेल अशी पेस्ट आपण वाटीमध्ये तयार केल्यानंतर, झोपताना चेहऱ्याला लावून झोपायचं आहे. किंवा तुम्ही दिवसभर देखील हा लेप लावू शकता. साधारण हा लेप चेहऱ्यावर चार तास लावून ठेवणे आवश्यक आहे. हा प्रयोग तुम्हाला आठवड्यातून दोन ते तीन वेळा करायचा आहे. सकाळी उठल्यानंतर, तुम्हाला नक्कीच परिणाम जाणवणार आहे. चेहऱ्यावर सुरकुत्या पिंपल्स आणि काळे डाग असतील तर ते देखील हळूहळू नष्ट होताना पाहायला मिळतील.

सूचना: हा लेख प्राथमिक माहितीच्या आधारावर लिहिला गेला आहे, महाराष्ट्र लोकशाही याची हमी देत नाही.

हे देखील वाचा Buy laptop: नवीन लॅपटॉप खरेदी करताना या पाच गोष्टी लक्षात ठेवूनच खरेदी करा, अन्यथा पैसे जातील पाण्यात..

Home Remedies: हा घरगुती उपाय केल्यास, एकाच रात्रीत शरीरावर असणारी चामखीळ पडेल गळून..

SSC Phase 10 Recruitment: केंद्रीय कर्मचारी निवड आयोगात दहावी, बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी..

Vivo smartphone: जबरदस्त कॅमेरा आणि 5000 mAh ची बॅटरी असणारा स्मार्टफोन Vivo ने केवळ नऊ हजारांत केला लॉन्च..

PM kisan Update: मोठी बातमी! अकरावा हप्ता आलेल्या लाभार्थ्यांची यादी केंद्र सरकारकडून जाहीर; अशी चेक करा यादी..

one nation one ration card: सरकारचा मोठा निर्णय! रेशनकार्ड धारकांनो ३० जूनपर्यंत करा हे काम अन्यथा रेशन होईल बंद..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.