one nation one ration card: सरकारचा मोठा निर्णय! रेशनकार्ड धारकांनो ३० जूनपर्यंत करा ‘हे’ काम अन्यथा रेशन होईल बंद..

0

one nation one ration card: ‘रेशन कार्ड’ हे प्रत्येक नागरिकाच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. रेशन कार्डच्या माध्यमातून रेशन कार्ड धारकांना स्वस्त धान्य मिळते, मात्र याव्यतिरिक्त देखील रेशन कार्डचे अनेक फायदे आहेत. याविषयी तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. केंद्र सरकारने ‘वन नेशन वन रेशन’ ही योजना लागू केली असून, या योजनेचा लाभ घेण्यासाठी आता सर्व ‘रेशन कार्ड’ धारकांना 30 जून पर्यंत आपले रेशनकार्ड आधारला लिंक करणे, आवश्यक असल्याचं अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने जाहीर केले आहे.

अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने यासंदर्भात अधिसूचना काढून, रेशन कार्ड धारकांनी ‘वन नेशन वन रेशन’ या योजनेचा लाभ घेण्यासाठी 30 जून पर्यंत आपले रेशन कार्ड आधारशी लिंक करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. अन्न आणि नागरी पुरवठा विभागाकडून यापूर्वी रेशन कार्डला आधार कार्ड लिंक करण्याची मुदत 31 मार्च पर्यंत ठेवण्यात आली होती. आता ही मर्यादा 30 जून पर्यंत वाढवण्यात आली आहे. (central government has extended date to 30 june for ration card linking with aadhar)
जर तुम्ही रेशनकार्डशी आधार लिंक केले नसेल तर, ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आता आपण रेशन कार्ड आधारशी कसं लिंक करायचं? याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

काय आहे ‘वन नेशन वन रेशन’ योजना

‘रेशन कार्ड’ धारकांसाठी केंद्र सरकारने ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ ही योजना सुरू केली असून, या योजनेअंतर्गत रेशन कार्डधारकांना देशात कुठल्याही स्वस्त धान्य दुकानात राशन खरेदी करता येणार आहे. यासाठी ‘रेशन कार्ड’ धारकांचे रेशन कार्ड बंद करून एक कार्ड देखील दिले जाणार असल्याची माहिती आहे.

या सोप्या पद्धतीने रेशन कार्ड-आधारशी करा लिंक

‘रेशन कार्ड’ला आधार लिंक करायचं असेल, तर सर्वप्रथ तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती क्रोमवर जाऊन, uidai.gov.in असं सर्च करायचं आहे. क्रोमवर जाऊन तुम्ही uidai.gov.in असं सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर अधिकृत वेबसाईट ओपन झालेली दिसेल. अधिकृत वेबसाईट ओपन झाल्यानंतर, उजव्या बाजूला तुम्हाला
‘Start Now’ हा पर्याय दिसेल, तुम्हाला या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

-‘Start Now’या पर्यायावर क्लिक केल्यानंतर, तुमच्यासमोर राज्याचा तसेच तुमचा संपूर्ण पत्ता समोर दिसणाऱ्या रकान्यात भरणे आवश्यक आहे. समोर दिसणाऱ्या रकान्यात तुम्ही व्यवस्थित पत्ता भरल्यानंतर, तुम्हाला ‘Ration Card Bedefit’ या पर्यायावर क्लिक करायचं आहे. ‘Ration Card Bedefit’ या पर्यायावर क्लिक केल्यानंतर, तुमच्यासमोर नवीन पेज ओपन झालेला दिसेल. या पेजवर विचारण्यात आलेली तुमची संपूर्ण माहिती म्हणजेच, आधार नंबर, रेशन कार्ड नंबर, ईमेल आयडी, व्यवस्थित भरायची आहे.
ईमेल आयडी, रेशन नंबर, आधार नंबर व्यवस्थित भरल्यानंतर, तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल. या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागणार आहे. ती म्हणजे, तुमच्या आधारशी तुमचा मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे. जो मोबाईल नंबर आधारशी लिंक आहे, त्याच्यावरच हा ओटीपी येणार आहे‌. तुमच्या मोबाईलवर आलेला OTP समोर दिसणाऱ्या रकान्यात भरून, सबमिट या पर्यायावर क्लिक करायचं आहे. सबमिट या पर्यायावर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर Process Complete’ असा मेसेज पाहायला मिळेल. याचा अर्थ तुमचं ‘रेशन कार्ड’ आधारशी लिंक झालं आहे, असा होतो.

ऑफलाईन पद्धतीनेही करु शकता लिंक

ज्या रेशन कार्ड धारकांना ऑनलाइन रेशन कार्ड आधारशी लिंक करता येत नाही, अशा रेशन कार्ड धारकांनी ऑफलाइन पद्धतीने देखील रेशन कार्ड आधारशी लिंक केलं तरी चालणार आहे. त्यासाठी तुम्हाला आधार कार्डची झेरॉक्स, रेशन कार्डची झेरॉक्स, पासपोर्ट साईज फोटो, इत्यादी कागदपत्रे तुम्हाला जवळच्या रास्त भाव दुकानदाराकडे जाऊन जमा करावी लागणार आहेत. पोच पावती म्हणून, तुम्ही या कागदपत्रांची झेरॉक्स काढून, रेशन दुकानदाराची सही देखील घेऊ शकता.

हे देखील वाचा Ration Card: आता या लोकांचे रेशन कार्ड होणार बंद! सरकारचा महत्वपूर्ण निर्णय 

Ration Card Update: रेशनकार्डमध्ये नवीन सदस्याचे नाव समाविष्ट करायचंय? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया सोप्या भाषेत..

रेशनची पावती मिळत नाही? चिंता करू नका; असा चेक करा दर महिन्याला मिळालेला माल अन् उठवा रेशन दुकानदारचा बाजार..

Online shopping: या सरकारी वेबसाईटवर आहे अनेक वस्तूंवर बंपर ऑफर; लॅपटॉप तर केवळ..

PM kisan: या कारणामुळे पीएम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला लागतोय वेळ..

Leopard Attack: पंधरा जणांवर हल्ला करून बिबट्या गेला पळून; पोलिस आणि बिबट्याची झुंज पाहून व्हाल थक्क..

Aadhaar Updation: आधार कार्डवर जन्मतारीख चुकीची असल्यास घेता येणार नाही या योजनांचा लाभ; या सोप्या पद्धतीने बदला जन्मतारीख..

Google Search: गुगलवर या तीन गोष्टी सर्च केल्यास, पोलीस ठोकतील बेड्या..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.