Aadhaar Updation: ‘आधार कार्ड’वर जन्मतारीख चुकीची असल्यास घेता येणार नाही ‘या’ योजनांचा लाभ; ‘या’ सोप्या पद्धतीने बदला जन्मतारीख..

0

Aadhaar Updation: आज आधार कार्डचे महत्त्व काय आहे, कोणालाही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. ‘आधार कार्ड’ हे सरकारी कागदपत्रांपैकीच एक मानलं जातं. आधारकार्ड हे तुमच्या जीवनाचा भाग बनलं आहे. ड्रायव्हिंग लायसन्स, रेशन कार्ड, पॅन कार्ड, या पेक्षा ही आधार कार्डला अधिक महत्त्व आले आहे. आधार कार्ड शिवाय कुठल्याही सरकारी योजनेचा लाभ सध्या तुम्हाला घेता येऊ शकत नाही. कुठल्याही सरकारी कार्यालयात किंवा खाजगी कार्यालयात देखील आधार कार्ड मागितले जाते. सध्या प्रत्येकाकडे आधार कार्ड आहे, मात्र अनेकांच्या ‘आधार कार्ड’ची जन्मतारीख चुकची असल्याचे निदर्शनास येत आहे. तुमच्या आधार कार्डवर जन्मतारीख चुकीचे असेल, तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे.

कुठल्याही सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य असल्याचे सरकारने म्हटले आहे. मात्र आता आधार कार्डमध्ये जर काही त्रुटी असेल, तरी देखील सरकारी योजनेचा लाभ घेता येणे अवघड होणार असल्याची माहिती समोर आली आहे. आधार कार्ड प्रत्येकाकडे पाहायला मिळते, मात्र प्रत्येकाचे आधार कार्ड अचूक असेल, याविषयी आपण ठामपणे सांगू शकत नाही. अनेकांच्या ‘आधारकार्ड’मध्ये त्रुटी असल्याची माहिती समोर आली आहे. जर तुमच्याही आधार कार्डवर आणि शाळेच्या दाखल्यावर जन्मतारखेत तफावत असेल, तर तुम्ही ‘आधार कार्ड’ वरील तारीख बदलणे आवश्यक आहे.

तुमच्या आधार कार्डवर जन्मतारीख कशी बदलायची? यासंदर्भात आज आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती सोप्या भाषेत सांगणार आहोत. तुमच्या आधार कार्डवर जन्मतारीख तुम्ही तुमच्या मोबाईलद्वारे अगदी काही मिनिटात बदलू शकता. चला तर मग आपण घेऊया, या संदर्भात सविस्तर. ‘आधारकार्ड’ वरची जन्मतारीख तुम्हाला बदलायची असेल, तर तुमच्याकडे काही कागदपत्रे असणे आवश्यक आहे. सुरूवातीला आपण या कागदपत्रांविषयी जाणून घेऊ.

जन्मतारीख बदलण्यासाठी ही कागदपत्रे असणे आवश्यक

तुमच्या आधार कार्डवरची चुकाची जन्मतारीख तुम्हाला दुरुस्ती करायची असेल, तर तुमच्याकडे शाळेचा दाखला, पासपोर्ट, तसेच पॅन कार्ड, इत्यादी कागदपत्रांपैकी एक कागदपत्र असणे आवश्यक आहे. जर तुमच्या पत्नीच्या नावापुढे पती म्हणून, तुमचं नाव लावायचं असेल, तर तुम्हाला अधिकृत सरकारी एजन्सीद्वारे जारी केलेले विवाह प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे.

कशी बदलाल जन्मतारीख

आधार कार्ड संदर्भातली कोणतीही अपडेट करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये क्रोमवर जायचं आहे. क्रोमवर गेल्यानंतर तुम्हाला uidai.gov.in असं सर्च करावे लागणार आहे. तुम्ही असं सर्च केल्यानंतर तुमच्या समोर एक पेज ओपन झालेला असेल, त्या पेजवर माय आधार विभागात तुम्हाला ‘अपडेट डेमोग्राफिक्स डेटा ऑनलाइन’ या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

अपडेट डेमोग्राफिक्स डेटा ऑनलाइन’ या पर्यायावर क्लिक केल्यानंतर, आणखी एक पेज ओपन झालेलं दिसेल. त्यात तुम्हाला ‘प्रोसीड टू अपडेट आधार’ या पर्यायावर क्लिक करायचं आहे. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला तुमचा आधार कार्ड क्रमांक, आणि कॅप्चा कोड टाकायचा आहे. आता तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल, त्यावर एक ओटीपी आलेला असेल. आलेला ओटीपी तुम्ही तुमच्या समोर असणाऱ्या रकान्यात समाविष्ट करायचा आहे. आणि अपडेट डेमोग्राफिक्स डेटा’ या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

इथपर्यंत सगळी प्रोसेस झाल्यानंतर, तुम्हाला तुमच्या आधार कार्डमध्ये काय बदल करायचे आहेत. तो ऑप्शन निवडायचा आहे. हे काम करत असताना तुमच्या एक गोष्ट लक्षात घ्यायची गरज आहे. ती म्हणजे, यासाठी लागणारी कागदपत्रे देखील अपडेट करणं गरजेचे आहे. तुम्हाला पॅन, पासपोर्ट इत्यादी ओळखीच्या पुराव्याची स्कॅन केलेली प्रत सबमिट करणे आवश्यक असणार आहे. तुम्ही तुमची कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तुम्हाला, पेमेंट करण्यासाठी कन्फर्म करावं लागणार आहे.

तुम्ही केलेले पेमेंट पूर्ण झाल्यानंतर, एक अपडेट रिक्वेस्ट नंबर (URN) उत्पन्न होईल. याचा अर्थ तुमची रिक्वेस्ट सक्सेसफुल झाली असा होतो. यानंतर तुम्ही तुमची पोचपावती डाउनलोड देखील करू शकता. यानंतर काही दिवसांत तुम्हाला तुमचा आधार कार्ड दिलेल्या पत्त्यावर घरी मिळणार आहे.

ऑफलाईन पद्धतीनेही करता येईल दुरुस्ती

आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तुम्हाला ऑफलाईन देखील प्रक्रिया आहे. मात्र ती थोडी त्रासदायक आणि तुमचा वेळ वाया जाणारी असल्याने, तुम्ही याकडे दुर्लक्ष केलेलंच बरं. मात्र याविषयी देखील आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहोत. ऑफलाइन आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या आधार केंद्राशी संपर्क साधावा लागणार आहे.

जर जन्मतारीख किंवा आधारशी संबंधित कोणतीही माहिती पाहिजे असेल, तर तुम्ही १९४७ या टोल फ्री क्रमांकावर कॉल करा. help@uidai.gov.in यावर मेक करून देखील तुम्ही सविस्तर माहिती घेऊ शकता. याशिवाय तुम्ही आमच्या Maharashtralokshahi@gmail.com ‘मेल’वर देखील संपर्क करू शकता.

हे देखील वाचा Aadhar card update: लग्नानंतर बदललेलं नाव आधारकार्डवर अपडेट करायचंय? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया सोप्या भाषेत..

Aadhaar card: आधार कार्ड हरवलंय? काळजी करू नका, या सोप्या पद्धतीने चुटकीसरशी घरबसल्या डाऊनलोड करा..

Online shopping: या सरकारी वेबसाईटवर आहे अनेक वस्तूंवर बंपर ऑफर; लॅपटॉप तर केवळ..

PM kisan: या kaरणामुळे पीएम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला लागतोय वेळ..

PM kisan: शेतकऱ्यांच्या खात्यावर या तारखेला पीएम किसान योजनेचा ११ वा हफ्ता जमा होणार, लवकर करा हे काम..

ई-केवायसी कशी करायची? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया; अन्यथा पीएम किसान हप्ता होईल बंद

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.