SSC Phase 10 Recruitment: केंद्रीय कर्मचारी निवड आयोगात दहावी, बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी..

0

SSC Phase 10 Recruitment: बेरोजगारीच्या या दुनियेत सरकारी नोकरी मिळवणे खूप मोठी कसोटी आहे. महागाई दिवसेंदिवस वाढत चालली असताना कुठेतरी चार पैशाची नोकरी करणं सर्वांसमोर मोठं आव्हान आहे. उच्च शिक्षण घेऊन देखील आता अनेक क्षेत्रात पुरेशी नोकरीच्या संधी उपलब्ध नसल्याने, अनेकजण विनाकारण शिक्षण देखील घेत नसल्याचं दिसतं. अनेकांच्या घरची परिस्थिती उच्च शिक्षण घेण्याची नसल्याने, दहावी बारावी झाल्यानंतर, अनेकजण नोकरीच्या शोधात देखील असल्याचे, पाहायला मिळते. आता आयटीआय आणि दहावी बारावी झालेल्या विद्यार्थ्यांसाठीची नोकरीची सुवर्णसंधी आहे.

दहावी बारावी झालेल्या विद्यार्थ्यांना जर नोकरी करायची असेल, तर त्यांच्यासाठी आता कर्मचारी निवड आयोगाने केंद्रीय विभागांमध्ये अनेक पदांसाठी भरती संदर्भातील अधिसूचना जारी केली आहे. अधिसूचनेनुसार तब्बल 2065 रिक्त पदे भरण्यात येणार असल्याची माहिती असून, यासाठी विद्यार्थ्यांना 13 जून 2022 पर्यंत अर्ज करता येणार आहेत. ही भरती एस एस सी द्वारे निवड पोस्ट फेज-१० अंतर्गत केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांना अधिकृत वेबसाईटवर 13 जून पर्यंत ऑनलाईन जाऊन अर्ज करणे आवश्यक आहे. या भरती प्रक्रिया संदर्भात सविस्तर माहिती आता आपण जाऊन घेऊ.

केंद्र सरकारने कर्मचारी निवड आयोग केंद्रीय विभागांमध्ये विविध पदांसाठी तब्बल 2065 पदे भरणार असून, यासंदर्भातील अधिसूचना जारी केली आहे. भरती प्रक्रिया एसएससी द्वारे निवड पोस्ट अंतर्गत केली जाणार असून, इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 13 जून पर्यंत www.ssc.nic.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करणे आवश्यक आहे. आता आपण या भरती संदर्भात शैक्षणिक पात्रतेविषयी जाणून घेऊया.

शैक्षणिक पात्रता

वेगवेगळ्या पदांसाठी उमेदवारांची वेगवेगळी पात्रता ठेवली गेली आहे. उमेदवारांनी दहावी आणि बारावी कुठल्याही मान्यताप्राप्त बोर्डामधून उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. या भरती प्रक्रिया बाबत अनेक पदांसाठी वेगवेगळी पात्रता ठेवली गेली आहे.(www.ssc.nic.in) यावर क्लिक करुन तुम्ही कोण कोणत्या पदासाठी काय काय पात्रता आहे, यासंबंधी सविस्तर माहिती घेऊ शकता.

आता पण या भरतीसाठी निवड कशी केली जाणार हे पाहू. 

अर्ज केलेल्या उमेदवारांच्या गुणवत्तेनुसार परीक्षेसाठी निवड करण्यात येणार आहे. कर्मचारी निवड आयोग परिक्षेसाठी निवड केलेल्या उमेदवारांची कॅम्पुटर बेस टेस्ट घेणार आहे. त्यामुळे अर्ज केलेल्या उमेदवारांची परीक्षेसाठी निवड करताना दहावी-बारावीमध्ये असणाऱ्या गुणांच्या टक्केवारीचा देखील विचार करण्यात येणार आहे. त्यामुळे साहजिकच ज्या विद्यार्थ्यांना दहावी-बारावीमध्ये अधिक टक्केवारी असेल, अशांसाठी ही मोठी संधी आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी अर्ज प्रक्रिया 12 मेपासून 13 जून पर्यंत सुरू राहणार आहे. तसेच परिक्षेसाठी निवडलेल्या उमेदवारांची परीक्षा ऑगस्टमध्ये घेतली जाणार आहे.

या पद्धतीने करा अर्ज

प्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील क्रोमवर जाऊन www.ssc.nic.in असं सर्च करायचं आहे. असं सर्च केल्यानंतर तुमच्या समोर कर्मचारी निवड आयोगाची अधिकृत वेबसाइट ओपन होईल. जर तुम्ही पहिल्यांदाच अर्ज करत असल्यास, तुमचा ईमेल, पत्ता, तसेच संपर्क क्रमांक, नाव टाकून मुख्यपृष्ठाच्या डाव्या बाजूला ‘आता नोंदणी करा’ या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

यानंतर तुमचा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड तयार केला जाईल. जो तुमच्या नोंदणीकृत मोबाईल आणि ईमेल पत्त्यावर पाठवला जाणार आहे. आता तुम्हाला मुख्य पेजवर पुन्हा यावे लागणार आहे. आणि तुमचा नोंदणी केलेला क्रमांक आणि पासवर्ड पुन्हा लॉगिन करावा लागणार आहे. लॉगिन केल्यानंतर, तुम्हाला Phase-10/2022/selection posts examination यावर क्लिक करायचं आहे.

Phase-10/2022/selection posts examination यावर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला सविस्तर अर्ज भरून, ‘सबमिट’ या बटनावर क्लिक करायचा आहे. आता तुम्हाला शुल्क भरा या पर्यायावर क्लिक करून शुल्क भरावे लागणार आहे. आता शुल्क भरल्यानंतर तुम्हाला सर्व सूचीबद्ध दस्तऐवज योग्य स्वरुपात आणि आकारात अपलोड करावा लागणार आहे. आता तुम्ही भरलेला फॉर्म अपलोड करून त्याची प्रिंट काढून घ्या. अधिक माहितीसाठी तुम्ही यावर क्लिक करा.

हे देखील वाचा Lifestyle: एखाद्या व्यक्तीविषयी फक्त शारीरिक आकर्षण आहे, की तुम्ही त्याच्या प्रेमात पडलाय? हे कसं ओळखायचं, वाचा सविस्तर.. 

Ration Card: आता या लोकांचे रेशन कार्ड होणार बंद! सरकारचा महत्वपूर्ण निर्णय 

Ration Card Update: रेशनकार्डमध्ये नवीन सदस्याचे नाव समाविष्ट करायचंय? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया सोप्या भाषेत..

PM kisan Update: मोठी बातमी! अकरावा हप्ता आलेल्या लाभार्थ्यांची यादी केंद्र सरकारकडून जाहीर; अशी चेक करा यादी..

Second hand car: Maruti Suzuki, सह नामांकित कंपन्यांच्या सेकंड हॅन्ड कार मिळतायत टू-व्हीलर पेक्षाही कमी किंमतीत; जाणून घ्या कुठे सुरू आहे सेल..

Dharmaveer Movie Review: आनंद दिघेंना जिवंत करणारा धर्मवीर..

Hero MotoCorp: दुचाकीस्वारांची पेट्रोलच्या खर्चातून होणार सुटका; आता Hero Splendor इलेक्ट्रिक रूपात..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.