IPL 2022: ‘आयपीएल’ला गालबोट! ऋषभ पंतने केली मॅच फिक्सिंग; व्हिडिओ झाला व्हायरल..

0

IPL 2022: क्रिकेट आणि वाद हा काही नवा विषय नाही. त्यात आयपीएल विषयी बोलायचं झाल्यास प्रत्येक सिजनला काही ना काही वाद होतोच होतो. फक्त वादच नाही, तर आयपीएलवर अनेकदा फिक्सिंगचे (match fixing) देखील आरोप झाले आहेत. आयपीएल २०२२चा हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. प्रत्येक संघाचा आता एक-एक सामना शिल्लक राहिला असून, आतापर्यंत आधिकृतरित्या ‘प्ले ऑफ’मध्ये (playoff) गुजरात टायटन Gujarat Titan) आणि ‘लखनऊ सुपर जॉईंट’ (Lucknow super giants) या दोन संघांनी प्रवेश केला आहे. सोबतच राजस्थान रॉयल्स (rajsthan royals) ‘प्ले ऑफ’मध्ये अधिकृतरित्या पोहचला नसला तरी, या संघाचे ‘प्ले ऑफ’ मधील स्थान जवळपास निश्चित मानले जात आहे. तर ‘प्ले ऑफ’मध्ये पोहचण्यासाठी चार संघामध्ये चुरस लागली आहे. साहजिकच या स्पर्धेला कमालीचे महत्व प्राप्त झाले असतानाच, आता पुन्हा स्पॉट फिक्सिंगच्या (IPL Spot Fixing) आरोपाची जोरदार चर्चा रंगल्याने या स्पर्धेला गालबोट लागलं आहे.

2019 मध्ये झालेल्या आयपीएल सामन्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, हा व्हिडिओ दिल्ली कॅपिटल (Delhi capital) संघाचा कर्णधार ऋषभ पंतचा (rishabh pant! आहे. आयपीएलचे संस्थापक आणि माजी अध्यक्ष ललित मोदी (Lalit Modi) यांनी आपल्या ट्विटर अकाउंट करून पोस्ट केलेला हा व्हिडीओ असल्याने या व्हिडिओला अधिकच महत्त्व प्राप्त झाल्याचे पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकत्ता नाईट रायडर्स (Kolkata knight riders) या संघांमधील खेळविण्यात आलेल्या सामन्यादरम्यानचा आहे.

तसं पाहायला गेलं तर, 2019 मध्ये या व्हिडिओची जोरदार चर्चा झाली होती. मात्र आता हा व्हिडिओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर नव्याने वायरल झाला असून, आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे. 2019 मध्ये कोलकत्ता नाईट रायडर आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये सामना सुरू होता. या सामन्यात एक विकेट गेल्यानंतर रॉबिन उथप्पा फलंदाजी करण्यासाठी मैदानावर उतरला. रॉबिन उथप्पा संदीप लामिछान या गोलंदाजाचा सामना करत असताना, पाठीमागे विकेटकीपर ऋषभ पंत म्हणाला, या चेंडूवर असाही चौकारच जाणार आहे.

ऋषभ पंतने म्हटल्या प्रमाणे,झालंही तसंच. रॉबिन उथप्पाने खेळलेला पहिला चेंडू ऑफसाईटला चौकार गेला. हा व्हिडीओ आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांनी आपल्या ट्विटर अकाउंटकरून पोस्ट केला आहे. मात्र या व्हिडीओत अ प श ब्द असल्याने, आम्ही हा व्हिडिओ पोस्ट करू शकत नाही. मात्र जर तुम्हाला हा व्हिडिओ पाहायचा असेल, तर तुम्ही ललित मोदींच्या ट्विटर अकाउंटवर जाऊन पाहू शकता.

ललित मोदी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडिओ पोस्ट करताना म्हटले आहे, किती चेष्टेचा विषय आहे हा, मला विश्वास बसत नाही, आयपीएल सारख्या सर्वोत्तम स्पर्धेत स्पॉट फिक्सिंगही होऊ शकते? आयसीसी, आयपीएल, आणि बीसीसीआयला हे कळणार आहे की, नाही? हे प्रकरण खूप लाजिरवाणी असून, अधिकाऱ्यांना अजिबात काळजी नसल्याचं दिसतं. ललित मोदी यांनी ट्विट केलेला हा व्हिडिओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, या व्हिडीओची चौकशी करण्यात यावी अशी देखील मागणी करण्यात येत आहे.

हे देखील वाचा Police Recruitment 2022: बारावी पास उमेदवारांनो राज्यात पोलीस दलात निघाली मेगा भरती! अर्ज करण्याची अंतिम तारीख ५ जून..

India Post Recruitment 2022: पोस्ट ऑफिसमध्ये ३९ हजार पदांची मेगा भरती; दहावी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी! परिक्षेविनाashi केली जाणार निवड..

PM kisan Update: मोठी बातमी! अकरावा हप्ता आलेल्या लाभार्थ्यांची यादी केंद्र सरकारकडून जाहीर; अशी चेक करा यादी..

Hero MotoCorp: दुचाकीस्वारांची पेट्रोलच्या खर्चातून होणार सुटका; आता Hero Splendor इलेक्ट्रिक रूपात..

Second hand car: Maruti Suzuki, सह नामांकित कंपन्यांच्या सेकंड हॅन्ड कार मिळतायत टू-व्हीलर पेक्षाही कमी किंमतीत; जाणून घ्या कुठे सुरू आहे सेल..

one nation one ration card: सरकारचा मोठा निर्णय! रेशनकार्ड धारकांनो ३० जूनपर्यंत करा हे काम अन्यथा रेशन होईल बंद..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.