IPL playoffs: दिल्ली पराभूत होताच आरसीबीने केला जल्लोष; विराट कोहली तर वेड्यासारखा लागला नाचू, पहा व्हिडिओ..

0

IPL playoffs: दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्समध्ये (MI vs DC) काल आयपीएलचा (IPL) ६९ वा सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळविण्यात आला. या सामन्याकडे अनेक क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागून राहिलं होतं. मात्र या सगळ्यात सर्वात जास्त लक्ष लागून राहिले होते ते रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचे. (Royal Challenger Bangalore) विशेष म्हणजे, हा सामना बँगलोरच्या संपूर्ण टीमने एकत्र बसून पहिला. जसजशी मुंबईच्या विजयाची शक्यता वाढत होती, तसे बंगलोरचे खेळाडू आपला जल्लोष करत होते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

मुंबई आणि दिल्ली कॅपिटल संघाच्या सामन्यापुर्वी काल रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाने अधिकृतरित्या मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) जाहीर पाठिंबा दिला होता. एवढेच नाही तर, ग्लेन मॅक्सवेल (Glen Maxwell) विराट कोहली Virat Kohli) आणि फाफ डू प्लेसीसने (Faf du Plessis) मुंबईच्या अनेक खेळाडूंना मेसेज करून विजयासाठी विनंती देखील केली होती. मुंबईला सपोर्ट करण्यासाठी बँगलोरचा संपूर्ण संघ टीव्हीच्या समोर मॅच पहात बसला होता. आता या संदर्भातला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

तसं पाहायला गेलं तर, हा व्हिडिओ रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून पोस्ट करण्यात आला आहे. पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडिओत या सामन्यादरम्यान आरसीबीच्या खेळाडूंचे प्रत्येक इमोशन कॅमेऱ्यात कैद करण्यात आले आहे. सामना मुंबईच्या बाजूने जसजसा झुकत होता, तसतसे आरसीबीचे खेळाडू जोरदार जल्लोष करताना या व्हिडिओत पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर हा सामना जसजसा दिल्लीच्या बाजून झुकत होता तसे हे खेळाडू चिंतेत येत असल्याचे देखील या व्हिडिओत आपण पाहू शकतो.

पहिल्यांदाच घडलं हे

आयपीएलमध्ये या पूर्वी अनेकदा एखाद्या संघाच्या पराभवामुळे दुसरा संघ प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र यापूर्वी कधी कोणत्याही संघाने आम्ही प्ले ऑफमध्ये पोहचण्यासाठी तो संघ पराभूत व्हावा, यासाठी कधीही उघडपणे सपोर्ट केला नाही. मात्र रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाने पहिल्यांदाच स्वतः प्ले ऑफमध्ये पोहचण्यासाठी मुंबई इंडियन्सला सपोर्ट केले. फक्त सपोर्टच नाही, तर मुंबईच्या विजयावर मुंबईपेक्षा जास्त आनंद आणि जल्लोष केल्याचं पाहायला मिळाले. अनेकांनी याचं कौतुक केले आहे, तर काहींनी टीका देखील केली आहे. मात्र कोहली आपल्या जुन्या अवतारात अवतरला असल्याने प्ले ऑफ’मध्ये आरसीबी पोहचण्याची अनेकांची इच्छा होती. हे देखील पाहायला मिळाले.

मुंबईच्या विजयानंतर काय म्हणाला विराट

मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल संघाला पराभूत केल्यानंतर आरसीबीच्या खेळाडूंनी जोरदार जल्लोष केला. या सगळ्यात विराटचा जल्लोष पाहण्यासारखा होता. आरसीबीने आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केलेल्या व्हिडिओत, विराटने मुंबई इंडियन्सला धन्यवाद दिले आहेत. विराट म्हणाला, सामना पहात असताना आम्ही सगळे खूप उत्साहित होतो. सामना पाहताना वातावरण खूपच कमालीचं होतं. आम्ही खूप खुश आहोत.

हे देखील वाचा Playoffs: विराट कोहली प्ले ऑफमध्ये पोहचवण्यासाठी दिल्लीने केली मॅच फिक्सिंग; पहा व्हिडिओ..

Maharashtra Police Recruitment 2022: सर्वात मोठी ब्रेकिंग! राज्यात ऑगस्टमध्ये एकाचवेळी तब्बल 13 हजार पोलिस कॉन्स्टेबल पदाची मेगा भरती..

IPL 2022: आयपीएलला गालबोट! ऋषभ पंतने केली मॅच फिक्सिंग; व्हिडिओ झाला व्हायरल..

PM Mudra Yojana: व्यवसाय सुरू करायचाय पण पैसे नाहीत? चिंता करू नका, केंद्र सरकार देतय हमीशिवाय दहा लाखांपर्यंत कर्ज; जाणून घ्या सविस्तर..

PM kisan Update: मोठी बातमी! अकरावा हप्ता आलेल्या लाभार्थ्यांची यादी केंद्र सरकारकडून जाहीर; अशी चेक करा यादी..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.