Playoffs: विराट कोहली ‘प्ले ऑफ’मध्ये पोहचवण्यासाठी ‘दिल्ली’ने केली मॅच फिक्सिंग; पहा व्हिडिओ..

0

Playoffs: दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्समध्ये (MI vs DC) काल आयपीएलचा ६९ वा सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळविण्यात आला. या सामन्याकडे अनेक क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागून राहिलं होतं. दिल्ली कॅपिटल्स (Delhi capital) संघासाठी करो या मरोची स्थिती होती, मात्र नॉक आऊटचा तणाव दिल्लीचा संघ झेलू शकला नाही, आणि हातात असणारा सामना आपल्या चुकांमुळे गमावला. याबरोबरच रॉयल चॅलेंजर बेंगलोर (royal Challenger Bangalore) संघ वाजत गाजत प्ले ऑफ’मध्ये (playoff) दाखल झाला. काल रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाने अधिकृतरित्या मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) जाहीर पाठिंबा दिला होता. एवढेच नाही तर ग्लेन मॅक्सवेल (Glen Maxwell) विराट कोहली Virat Kohli) आणि फाफ डू प्लेसीसने (Faf du Plessis) मुंबईच्या अनेक खेळाडूंना मेसेज करून विजयाची विनवणी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यातच ऋषभ पंतने (rishabh pant) महत्त्वाच्या क्षणी मोठ्या चुका केल्याने, हा सामना फिक्स असल्याचं बोललं जात आहे.

रॉयल चॅलेंजर बंगलोर संघाला प्ले ऑफ’मध्ये पोहोचण्यासाठी दिल्ली संघाचा पराभव होणे फार गरजेचं होतं. सहाजिकच त्यामुळे बॅगलोंरने मुंबईला सपोर्ट करत असल्याचा अधिकृतरीत्या जाहीर केलं. (Royal Challenger Bangalore support Mumbai Indians) एवढंच नाही तर, रॉयल चॅलेंजर बंगलोर संघाच्या लोगोचा कलर देखील लाल ऐवजी निळा करण्यात आला होता. आपण फायनलमध्ये पोहोचण्यासाठी समोरचा संघ इतर संघाकडून पराभूत व्हावा. यासाठी त्या संघाला सपोर्ट करणे आणि विनंती करणं ही आयपीएलच्याइतिहासातली पहिलीच वेळ होती. सहाजिकच त्यामुळे दिवसभर रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या भूमिकेची जोरदार चर्चा सोशल मीडियावर रंगली. सोशल मीडियावर रॉयल चॅलेंजर बंगलोर ‘प्ले ऑफ’मध्ये पोहचावी, असं म्हणणारा मोठा वर्ग असल्याचे पाहायला मिळालं.

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गोलंदाजांनी देखील कॅप्टन रोहित शर्माने घेतलेला हा निर्णय सार्थ ठरवत दिल्लीच्या संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली नाही. दिल्ली संघाची सुरुवात खूपच निराशाजनक झाली, मात्र मधल्या फळीने आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. ऋषभ पंत आणि राॅमन पॉवेल या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 75 धावांची भागीदारी करत दिल्ली संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. 160 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरणार्‍या मुंबई इंडियन्सची सुरुवातीला देखील चांगली झाली नाही. कॅप्टन रोहित शर्मा १३ चेंडूत केवळ २ धावा काढून स्वस्तात परतला. मात्र त्यानंतर मुंबई इंडियन्स फलंदाजांनी ठिकठाक फलंदाजी करत दिल्ली संघाचा पराभव केला. मुंबई इंडियन्स फलंदाजांनी ठिकठाक फलंदाजी केली असली तरी, त्याला दिल्ली कॅपिटल संघाने कमालीचा सपोर्ट केल्याचं पाहायला मिळालं. त्याचे कारण म्हणजे, ‘देवाल्ड ब्रेव्हिस’चा खूप सोपा झेल विकेट किपर पंतने सोडला. एवढंच नाही, तर ब्रेव्हिस बाद झाल्यानंतर, पहिल्याच चेंडूवर टीम डेव्हिड देखील झेलबाद झाला होता. चेंडू बॅटच्या मोठी कड घेऊन विकेट किपर ऋषभ पंतच्या ग्लोजमध्ये जाऊन स्थिरावला, मात्र दोन डीआरएस असताना देखील पंतने डीआरएस घेतला नाही.

‘टीम डेव्हिड’ पहिल्या चेंडूवर झेलबाद होता. मात्र गोलंदाज आणि विकेट किपरकडून फारशी अपील केली गेली नाही, आणि पंचांनी देखील टीम डेव्हिडला बाद दिलं नाही. मात्र ऋषभ पंतकडे दोन डीआरएस शिल्लक असतानाही त्याने त्याचा वापर केला नाही. त्यानंतर ‘टीम डेव्हिड’ने फक्त अकरा चेंडूत ३४ धावांची वादळी खेळी केली. या खेळीत त्याने तब्बल चार षटकार आणि एक चौकार लगावला. या खेळीमुळे दिल्ली कॅपिटल संघाच्या हातातोंडाशी आलेला घास त्याने हिरावून घेतला. या पराभवाबरोबरच या स्पर्धेतील दिल्ली कॅपिटल संघाचे अस्तित्व संपुष्टात आले, आणि रॉयल चॅलेंजर बंगलोर ‘प्ले ऑफ’मध्ये दाखल झाला. एकीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने मुंबई इंडियन्सला सपोर्ट केला. तर दुसरीकडे ऋषभ पंत हातातला सामना आपल्या चुकांमुळे गमावल्याने, सोशल मीडियावर हा सामना फिक्स असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

काय म्हणतायत नेटकरी? 

दिल्ली कॅपिटल संघाने महत्त्वाचा सामना आपल्या चुकांमुळे गमावल्याने सोशल मीडियावर हा सामना फिक्स असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. दिवसभर रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने मुंबई इंडियन्सला सपोर्ट केला. एवढेच नाही तर, रॉयल चॅलेंजर बेंगलोर संघाच्या अधिकृत ट्विटर हँडलचा कलर देखील लालवरून निळा करण्यात आला. आणि त्यातच ऋषभ पंतने महत्त्वाच्या क्षणी केलेल्या चुका लक्षात घेता, अनेकांना हा सामना फिक्स असल्याचं वाटत आहे. मात्र यासंदर्भात अधिकृत अशी कोणतीही माहिती समोर आली नसून, क्रिकेटमध्ये तणावाच्या सामन्यात अशा चुका होत असतात, हे काही नवीन नाही.

 

दिली पराभूत झाल्यानंतर काय म्हणाले मॅक्सवेल विराट कोहली? 

गुजरात टायटन्स संघाला पराभूत केल्यानंतर, विराट कोहलीने आता आम्ही मुंबई इंडियन्सला सपोर्ट करणार असल्याचे सांगितलं होतं. मुंबई इंडियन्सच्या विजयानंतर विराट कोहलीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर दोन ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पहिले ट्विट करताना विराट कोहलीने मुंबई इंडियन्स आणि आरसीबीला टॅग करत प्लेनचा ईमोजी टाकत कोलकत्ता ‘अस’ कॅप्शन लिहिलं आहे. तर काही तासानंतर दुसरे एक ट्विटट करताना विराट कोहलीने आपल्या ट्विटर अकाऊंटवर ग्लेन मॅक्सवेल फाफ डू प्लेसी आणि स्वतःचा फारच गमतीशीर फोटो पोस्ट केला आहे. या फोटोला कॅप्शन देताना लिहिलं आहे, Feels.

तर दुसरीकडे ग्लेन मॅक्सवेल आणि मुंबई इंडियन्स यांच्यामधील पहिली इनिंग पूर्ण झाल्यानंतर, म्हणजेच दिल्ली कॅपिटल संघाने 160 धावांचे आव्हान मुंबई इंडियन्ससमोर ठेवल्यानंतर, एक ट्विट करत म्हटलं आहे. कमवॉन तुम्हाला हे शक्य आहे, रोहित शर्मा आणि ईशान किशन तुम्ही धमाकेदार खेळी करा, अशा आशयाचे एक ट्विट ग्लेन मॅक्सवेलने केले आहे.

 

हे देखील वाचा Maharashtra Police Recruitment 2022: सर्वात मोठी ब्रेकिंग! राज्यात ऑगस्टमध्ये एकाचवेळी तब्बल 13 हजार पोलिस कॉन्स्टेबल पदाची मेगा भरती..

Video Viral: आंबा तोडला म्हणून, दोन चिमुकल्यांना विवस्त्र करून सरपंचाने केली अमानुष मारहाण; पहा माणूसकीला काळीमा फासणारा व्हिडिओ..

Home Remedies: हा घरगुती उपाय केल्यास, एकाच रात्रीत शरीरावर असणारी चामखीळ पडेल गळून..

IPL 2022: आयपीएलला गालबोट! ऋषभ पंतने केली मॅच फिक्सिंग; व्हिडिओ झाला व्हायरल..

India Post Recruitment 2022: पोस्ट ऑफिसमध्ये ३९ हजार पदांची मेगा भरती; दहावी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी! परिक्षेविना अशी केली जाणार निवड..

PM Mudra Yojana: व्यवसाय सुरू करायचाय पण पैसे नाहीत? चिंता करू नका, केंद्र सरकार देतय हमीशिवाय दहा लाखांपर्यंत कर्ज; जाणून घ्या सविस्तर..

Ration shop: या कारणामुळे रेशन दुकानात आता गव्हाऐवजी मिळणार तांदूळ; अन्न पुरवठा विभागाने घेतला निर्णय..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.