Video Viral: आंबा तोडला म्हणून, दोन चिमुकल्यांना विवस्त्र करून सरपंचाने केली अमानुष मारहाण; पहा माणूसकीला काळीमा फासणारा व्हिडिओ..

0

Video Viral: लहान मुलं ही देवाघरची फुलं असतात, असं आपण नेहमी ऐकतो, लहान मुलांनी काहीही केलं तरी आपण मोठ्या मनाने अनेकदा माफ देखील करतो. मात्र समाजात अशीही काही क्रुर माणसं आहेत, जी लहान मुलांना देखील किरकोळ कारणांवरून अमानुष मारहाण करतात. अशीच एक घटना बिहारमध्ये (Bihar) घडली आहे. दोन चिमुकल्यांनी झाडाचे आंबे तोडले म्हणून, मधुबनी मधील वासुदेवपुर गावच्या सरपंचांनी vaasudevpir sarpanch) कपडे काढून अमानुष मारहाण केल्याची निंदनीय घटना घडली समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, हा व्हिडिओ पाहताना अनेकांच्या तळपायाची आग मस्तकात गेली आहे.

सध्या आंब्याचा सिझन चालू आहे, आंबा कोणाला आवडतं नाही. लहान मुलांचं सगळ्यात आवडत फळ कोणतं असेल, तर तो सहाजिकच आंबा. त्यामुळे सहाजिकच लहान मुलं आंबा खाण्यासाठी काहीही करत असतात. जर त्यांना आंब्याची बाग दिसली, तर सहाजिकच निष्पाप मनाने ही मुलं आंबे तोडतीलच तोडतील, यात विशेष असं काही नाही. आणि या गोष्टीचं दुःख आणि संताप येण्याचं तर काहीही कारण नाही. मुलांनी अशी कृत्य केल्यानंतर, आपण फारतर त्याला समजावून सांगू शकतो. दुसऱ्यांच्या कुठल्याही वस्तूला आपण कधीही हात लावायचा नाही, आपण हेच सांगत असतो. याच्या पुढे जाण्याची काही आवश्यकता नसते, कारण ती लहान मुले असतात.

मात्र बिहारमधून माणुसकीला काळीमा फासणारी घटना तर आहेच, मात्र सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून अनेकांच्या तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही. झाडाचे आंबे तोडले म्हणून, दोन चिमुकल्यांना, मधुबनी मधील ‘वासुदेवपुर’ गावच्या सरपंचांनी कपडे काढून, ज्या पद्धतीने अमानुष मारहाण केली आहे, ते पाहता या सरपंचाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे का? हा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.

आंबे तोडले म्हणून, दोन चिमुकल्यांची कपडे काढून अमानुष मारहाण तर केलीच, मात्र या मारहाणीने देखील या निर्दयी सरपंचाचं समाधान झालं नाही. म्हणून आंब्यावर असणाऱ्या ‘लाल मुंग्याचा एक गड’ या दोघांच्याही अंगावर टाकला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत आपण पाहू शकतो, ही दोन चिमुकली मुलं वेदना सहन होत नसल्याने, विव्हळत आहेत. विशेष म्हणजे, या मुलांची होणारी तडफड समोरून कोणीतरी कॅमेरात कैद देखील करत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, हा व्हिडीओ पत्रकार ‘उत्कर्ष सिंग’ यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे.

काय आहे व्हिडिओत?

पत्रकार उत्कर्ष सिंग यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून पोस्ट करण्यात आलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओ दोन मुलांना उघडं करून दोघांचेही दोन्हीं हात बांधलेले आहेत. आणि मधुबनी मधील ‘वासुदेवपुर’ गावचे सरपंच उपेंद्र यादव हे या दोन्हीं मुलांना अमानुष मारहाण करताना पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, या निर्दयी सरपंचाचे अमानुष मारहाण करून समाधान झालं नसल्याने, शेवटी त्याने आंब्यावर असणाऱ्या लाल मुंग्याचा एक गड दोघांच्याही अंगावर टाकला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत या दोन लहान मुलांची होणारी तडफड डोळ्यानी पाहवत नाही.

काय म्हणाले नेटकरी? 

मुकेश कुमार यांनी या व्हिडिओखाली रिप्लाय देताना म्हटले आहे, ही घटना माझ्याच गावची आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, व्हिडिओ शुट करणारा देखील ग्रामपंचायत सदस्य शकील अहमद हा आहे. आता मला लाज वाटतेय, आमच्या गावचे हे सरपंच आहेत. सध्या हे दोघेही फरार असल्याचं त्याने म्हटलं आहे. अनेकांनी या घटनेचा संताप व्यक्त केला असून, लवकरात लवकर या दोघांना अटक करून कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

हे देखील वाचा Maharashtra Police Recruitment 2022: सर्वात मोठी ब्रेकिंग! राज्यात ऑगस्टमध्ये एकाचवेळी तब्बल 13 हजार पोलिस कॉन्स्टेबल पदाची मेगा भरती..

IPL 2022: आयपीएलला गालबोट! ऋषभ पंतने केली मॅच फिक्सिंग; व्हिडिओ झाला व्हायरल..

Ration shop: या कारणामुळे रेशन दुकानात आता गव्हाऐवजी मिळणार तांदूळ; अन्न पुरवठा विभागाने घेतला निर्णय..

India Post Recruitment 2022: पोस्ट ऑफिसमध्ये ३९ हजार पदांची मेगा भरती; दहावी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी! परिक्षेविना अशी केली जाणार निवड..

PM Mudra Yojana: व्यवसाय सुरू करायचाय पण पैसे नाहीत? चिंता करू नका, केंद्र सरकार देतय हमीशिवाय दहा लाखांपर्यंत कर्ज; जाणून घ्या सविस्तर..

Hero Splendor+ XTEC : USB चार्जर, कॉल अलर्टसह अनेक हाय-टेक वैशिष्ट्यांसह नवीन Hero Splendor+ XTEC लॉन्च..

Post office Scheme: आता पोस्ट ऑफिस खातेधारकांना मिळणार १३००० महिना; तुम्हीही घेऊ शकता लाभ जाणून घ्या सविस्तर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.