Hero Splendor+ XTEC : USB चार्जर, कॉल अलर्टसह अनेक हाय-टेक वैशिष्ट्यांसह नवीन Hero Splendor+ XTEC लॉन्च..

0

Hero Splendor+ XTEC: नामांकित भारतीय कंपनी Hero MotoCorp च्या Hero Splendor ने संपूर्ण जगातील असंख्य ग्राहकांच्या मनावर राज्य केले. अनेक दशकांपासून( Hero Splendor) ही बाईक ग्राहकांची आवडती बाईक ठरली आहेत. ग्राहकांच्या मनात घर करण्यात Hero Splendor ने यश मिळवले. एवढंच नाही, तर जगात सर्वाधिक विकली गेलेली बाईक म्हणून, देखील या बाईकने नाव कमविले. आता पुन्हा एकदा बाजारात धुमाकूळ घालण्यासाठी Hero Splendor + एका नव्या रुपात आली आहे. Hero MotoCorp ने (Splendor + XTEC)  ही नवी बाईक नुकतीच लाँच केली असून, या बाईकची आता जोरदार चर्चा रंगली आहे.

Hero MotoCorp या कंपनीने ग्राहकांच्या मनावर राज्य केलं आहे. या कंपनीने सुरुवातीला जपानच्या होंडा या कंपनीशी करार करून हिरो होंडा CD 100 SS बाजारात उतरवली आणि या बाईकने अक्षरशः बाजारात धुमाकूळ घातला. 2010 नंतर Hero MotoCorp ने आपला स्वतःचा वेगळा संसार उभा करत, अनेक जबरदस्त टू-व्हिलर मार्केटमध्ये उतरवत ग्राहकांचा विश्वास कायम राखला. आता पुन्हा एकदा या कंपनीने आपली स्प्लेंडर प्लस एका नव्या रुपात लॉंच केली असून, या बाईकची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. Hero MotoCorp ने लॉन्च केलेल्या Hero Splendor + XTEC या टू-व्हीलर बाइकमध्ये नक्की काय काय नवीन फीचर्स आहेत? हे आपण सविस्तर जाणून घेऊ.

Hero MotoCorp ने बाजारात उतरलेल्या Splendor + XTEC च्या किंमती विषयी जाणून घ्यायचे, झाल्यास या बाईकची एक्स-शोरूम प्राइज 72,900 रुपये ठेवण्यात आली आहे. मात्र अनेक जबरदस्त फीचर्स या बाइकला दिले गेले असल्याने, ही किंमत काहीच नसल्याचे सांगण्यात येत आहे. नेहमीच्या वापरात असणाऱ्या टू-व्हिलरमध्ये नवीन तंत्रज्ञान आणि अनेक वैशिष्ट्यांसह Hero MotoCorp ने लॉन्च केली आहे. Splendor + XTEC ही बाईक 100 सीसी असून, या बाइकला कंपनीने तब्बल पाच वर्षांची वॉरंटी देखील दिली आहे. आता आपण या बाईकमध्ये असे कोणते फीचर्स आहेत, ज्यामुळे या गाडीची जोरदार चर्चा रंगली आहे, तेही जाणून घेऊया.

Hero Splendor+ XTEC या बाईकची ही आहेत, नवीन फीचर्स

Hero MotoCorp ने लॉन्च केलेल्या नवीन Hero Splendor+ XTEC या बाईकच्या नवीन तंत्रज्ञानविषयी बोलायचे झाल्यास, ही बाइक पूर्णपणे डिजिटल मीटरसह ग्राहकांच्या भेटीला येणार आहे. जे यापूर्वीच्या Splendor+ मध्ये नव्हते. या डिजिटल डिस्प्लेमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, इन्कमिंग कॉल, मिसकॉल, एवढंच नाही तर एसएमएस अलर्ट देखील तुम्हाला पाहता येणार आहे. अशा अनेक अत्याधुनिक फीचर्ससह ग्राहकांना ही बाइक खरेदी करता येणार आहे. या बरोबरच रिअल टाइम मायलेजची माहिती देखील तुम्हाला इंडिकेटरद्वारे मिळणार आहे. या सोबतच Splendor+ पेक्षा Splendor+ XTEC या बाइकला अधिक मायलेज दिले गेले आहे.

यासोबत Splendor+ XTEC या बाईकला लाऊड ​​एलईडी पोझिशन लॅम्प देखील दिला गेला आहे. जो डिजिटल स्वरूपात आहे. सोबतच USB चार्जर देखील देण्यात आला आहे. असे बरेचसे फिचर्स कंपनीने आपल्या नव्या Splendor+ XTEC या बाइकला दिले आहेत. सोबत ही बाईक ग्राहकांना नवीन तंत्रज्ञानासह म्हणजेच i3S सह येते.

उत्तम सुरक्षितता आणि लाजवाब डिझाईन

Hero MotoCorp ने लॉन्च केलेल्या Splendor+ XTEC या बाईकच्या डिझाईचा विचार करायचा झाल्यास, Hero Splendor + XTEC या बाईकला LED पोझिशन लॅम्प तसेच नवीन ग्राफिक्स देखील दिले गेले आहे. विशेष म्हणजे, hero Splendor+ आणि या बाईकच्या इतर कोणत्याही प्रोफाइलमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल केला गेला नाही. सुरक्षेचा विचार करायचा झाल्यास, या बाइकच्या साईटला अँगल सेन्सर दिले आहेत. ज्यामुळे तुमच्याकडून बाईक पडल्यानंतर लगेच ऑटोमॅटिक बंद होणार आहे.

Hero MotoCorp ने लॉन्च केलेल्या Splendor+ XTEC या बाईकचे इंजिन 97.2 cc BS6 आहे. हे इंजिन 7.9 bhp पॉवरसह येते. यासोबतच 8.05 Nm पीक टॉर्क देखील मिळणार आहे. Hero MotoCorp ने लॉन्च केलेल्या Splendor+ XTEC ही बाइक ग्राहकांना एकूण चार रंगामध्ये मिळणार आहे. यात तुम्हाला कॅनव्हास ब्लॅक, स्पार्कलिंग बीटा ब्लू पर्ल व्हाईट तसेच ‘टोर्नाडो ग्रे’ या चार रंगांचा समावेश आहे.

हे देखील वाचा Police Recruitment 2022: बारावी पास उमेदवारांनो राज्यात पोलीस दलात निघाली मेगा भरती! अर्ज करण्याची अंतिम तारीख ५ जून..

PM Mudra Yojana: व्यवसाय सुरू करायचाय पण पैसे नाहीत? चिंता करू नका, केंद्र सरकार देतय हमीशिवाय दहा लाखांपर्यंत कर्ज; जाणून घ्या सविस्तर..

IPL 2022: ‘आयपीएल’ला गालबोट! ऋषभ पंतने केली मॅच फिक्सिंग; व्हिडिओ झाला व्हायरल..

India Post Recruitment 2022: पोस्ट ऑफिसमध्ये ३९ हजार पदांची मेगा भरती; दहावी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी! परिक्षेविना अशी केली जाणार निवड..

Post office Scheme: आता पोस्ट ऑफिस खातेधारकांना मिळणार १३००० महिना; तुम्हीही घेऊ शकता लाभ जाणून घ्या सविस्तर..

PM kisan Update: मोठी बातमी! अकरावा हप्ता आलेल्या लाभार्थ्यांची यादी केंद्र सरकारकडून जाहीर; अशी चेक करा यादी..

MahaGenco Recruitment: महाराष्ट्र राज्याच्या विद्युत कंपनीत मेगा भरती; जाणून घ्या सर्व डिटेल्स आणि करा असा अर्ज..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.