Post office Scheme: आता पोस्ट ऑफिस खातेधारकांना मिळणार १३००० महिना; तुम्हीही घेऊ शकता लाभ जाणून घ्या सविस्तर..

0

Post office Scheme: दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. त्यातच रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नसल्याने, आता सर्वसामान्यांच्या समोर जगण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. बाजारांमधील वातावरण अस्थिर असल्यामुळे आता सर्वसामान्य लोकांनी कुठे गुंतवणूक करायची? हा मोठा प्रश्न आहे. अशा वातावरणात नेहमी गुंतवणुक ही विचार पूर्वकच करावी लागते. महागाई आणि बेरोजगारीच्या या जमान्यात कुटुंबाकडे महिन्याचा मंथली इन्कम असणं खूप फायदेशीर ठरतं. जर मंथली फिक्स इन्कम असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे.

संसार करत असताना अनेक जण आपले पैसे कुठलीही जोखीम न घेता गुंतवतणं पसंत करतात. अनेकदा आपण पाहतो, शेती व्यवसायातून किंवा इतरत्र व्यवसायातून अनेकांना लाख दोन लाख इन्कम होतो. त्यामुळे अनेक जण हे पैसे कुठेतरी इन्व्हेस्टमेंट करताना दिसून येतात. मात्र हे पैसे इन्व्हेस्ट करताना अनेक जण खूप विचारपूर्वक गुंतवणूक करतात. कारण कष्टाचे पैसे त्यांना कसल्याही प्रकारचा धोका पत्कारून गुंतवायचे नसतात. जर तुम्हाला कमी पैसे गुंतवून दरमहा हमखास चांगला इन्कम हवा असेल, तर तुमच्यासाठी पोस्ट ऑफिस एक महत्त्वपूर्ण योजना घेऊन आलं आहे. आज आपण याच योजनेविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना (Post Office MIS) जर तुम्ही पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत पैसे गुंतवले, तर तुमच्यासाठी ही योजना खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ही एक अशी योजना आहे ज्यामध्ये तुम्ही जबरदस्त बचत करून,दरमहा चांगला इन्कम मिळवू शकता. पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत तुम्हाला फक्त एकदाच पैसे जमा करावे लागणार आहेत. या योजनेत एकदाच पैसे जमा केल्यानंतर, पाच वर्षांनी तुम्हाला दरमहा या योजनेतून पेमेंट मिळणार आहे. आता आपण या योजनेविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊ.

9 लाखांपर्यंत करू शकता गुंतवणूक

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेमध्ये तुम्हाला सिंगल आणि जॉईंट खाते देखील खोलता येणार आहे. मात्र तुम्ही जर जॉईंट खाते उघडले, तर तुम्हाला या योजनेचा अतिरिक्त फायदा घेता येणार आहे. पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेचे (POMIS) खाते काढण्यासाठी तुम्हाला एक हजार रुपये खर्च करून खाते उघडता येणार आहे. पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत जर तुम्ही खाते काढले, तर तुम्हाला या योजनेमध्ये साडेचार लाख रुपये गुंतवता येणार आहेत. जर तुम्ही जॉईंट खातं काढले, तर तुम्हाला ही मर्यादा नऊ लाखांपर्यंत वाढवून मिळते.

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेचे हे आहेत फायदे

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेचे अनेक फायदे आहेत. मात्र जर तुम्ही दोन किंवा तीन जणांनी मिळून जॉइंट खाते काढलं, तर प्रत्येक खातेदाराला पाच वर्षानंतर मंथली इन्कम चालू होणार आहे. या योजनेतून मिळणारे उत्पन्न हे प्रत्येक सभासदांना सामान दिले जाते. त्याचबरोबर तुम्ही या जॉइंट खात्याचे कधीही एका खात्यामध्ये रूपांतर करू शकता. त्याचबरोबर तुमचे जॉइंट खाते देखील तुम्ही एका खात्यात रूपांतर करू शकता. त्यासाठी तुम्हाला इतर दोन सदस्यांची सहमती बंधनकारक असणार आहे.

या योजनेवर सरकारचे नियंत्रण राहणार आहे

बाजारात अशा अनेक कंपन्या आहेत, जिथे तुमचे पैसे काही वर्षातच डबल करून देतात. मात्र तुमच्या पैशाची या कंपन्यांमध्ये कुठल्याही प्रकारची गॅरंटी दिली जात नाही. त्यामुळे तुम्ही गुंतवलेले पैसे बुडण्याचे देखील मोठे चान्सेस असतात. त्यामुळे कमी उत्पन्न मिळालं, तरी ग्राहक आपली सुरक्षा ठेव ही सुरक्षित ठिकाणीच इन्वेस्ट करतो. पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेवर सरकारचे नियंत्रण असणार आहे. तुम्ही गुंतवलेल्या पैसावर सरकारची सार्वभौम हमी असल्याने, तुम्हाला कुठल्याही प्रकारचा धोका नाही. त्यामुळे तुमच्यासाठी ही योजना खूप महत्त्वपूर्ण ठरते.

हे आहेत व्याजदर 

पोस्ट ऑफिसच्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, या मासिक उत्पन्न योजनेमध्ये तुम्हाला वार्षिक 6.6% व्याजदर मिळणार आहे. तुम्ही गुंतवलेल्या रकमेचे व्याज दर महिन्याला तुम्हाला दिले जाते. देशातील सर्व नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेचे खाते काढत असताना, तुम्ही एक गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे. ती म्हणजे, तुम्ही गुंतवलेले पैसे हे एका वर्षाच्या अगोदर काढता येणार नाहीत.

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेचे खाते कसे उघडाल?

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेचे खाते काढण्यासाठी तुमच्याकडे पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते असणे आवश्यक आहे. हे बचत खाते काढण्यासाठी तुमच्याकडे ओळखपत्र म्हणून, आधार कार्ड, पासपोर्ट, मतदान कार्ड, तसेच ड्रायव्हिंग लायसन इत्यादी कागदपत्रे असणं आवश्यक आहे. सोबतच तुम्हाला पासपोर्ट साईचे दोन फोटो देखील लागणार आहेत. सोबतच तुमच्याकडे लाईट बिल असणं देखील आवश्यक आहे. वरील सर्व कागदपत्रे घेऊन, तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयात जाऊन पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेचा फॉर्म भरू शकता.

हे देखील वाचाDriving License: सरकारचा महत्वपूर्ण निर्णय! Driving License काढण्यासाठी आता RTO ऑफिसला जाण्याची गरज नाही..

PM kisan: या कारणामुळे पीएम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला लागतोय वेळ..

Google Search: गुगलवर या तीन गोष्टी सर्च केल्यास, पोलीस ठोकतील बेड्या..

one nation one ration card: सरकारचा मोठा निर्णय! रेशनकार्ड धारकांनो ३० जूनपर्यंत करा हे काम अन्यथा रेशन होईल बंद..

Hero MotoCorp: दुचाकीस्वारांची पेट्रोलच्या खर्चातून होणार सुटका; आता Hero Splendor इलेक्ट्रिक रूपात..

second hand bike: तीन महीने वापलरेली Pulsar १८ हजारांत Splendor Plus १६ हजारांत तर CB unicorn 30 हजारांत; जाणून घ्या अधिक..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.