Driving License: सरकारचा महत्वपूर्ण निर्णय! Driving License काढण्यासाठी आता RTO ऑफिसला जाण्याची गरज नाही..

0

Driving License: कोणतंही वाहन चालवण्यासाठी तुमच्याकडे Driving License असणं आवश्यक आहे. जर तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसेल, तर तुम्हाला फाइन भरावा लागतो. फक्त एवढंच नाही, तर अनेक अडचणींना तोंड देखील द्यावे लागते. Driving License हे आता तुमचं ओळखपत्र देखील बनलं आहे. त्यामुळे ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्याकडे असणे फार गरजेचे आहे. जर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स (DL) काढायचं असेल, तसेच रिन्यू करायचे असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वपूर्ण आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने आता ड्रायव्हिंग लायसन्स संदर्भात नवे नियम घालून दिले आहेत. हे नवे नियम१ जुलै पासून लागू होणार असून आता Driving License काढण्यासाठी तुम्हाला आरटीओ ऑफिसला जाण्याची आवश्यकता नाही. यापूर्वी Driving License काढण्यासाठी तुम्हाला आरटीओ ऑफिसला (RTO office) जाऊन ड्रायव्हिंगची टेस्ट द्यावी लागत होती. मात्र आता तुम्हाला ड्रायव्हिंगची टेस्ट देण्यासाठी आरटीओ ऑफिसला जाण्याची गरज नाही.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकदून बनवण्यात आलेले हे नियम पूर्वीच्या ड्रायव्हिंग लायसन्सच्या नियमापेक्षा अधिक सोईस्कर असल्याने आता ड्रायव्हिंग लायसन्स काढणारांसाठी ही आनंदाची बातमी आहे. त्यामुळे आता ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी अर्ज केलेल्यांसाठी देखील केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून १ जूलैला नवे नियम लागू झाल्यानंतर दिलासा मिळणार आहे. त्यांनादेखील आता आरटीओ ऑफिसला जाऊन ड्रायव्हिंग ची टेस्ट द्यावी लागणार नाही.

आरटीओ ऑफिसला न जाता असं काढा ड्रायविंग लायसन्स

आता तुम्हाला आरटीओ ऑफिसला न जाता ड्रायव्हिंग लायसन काढता येणार आहे. ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलमध्ये तुम्ही ड्रायव्हिंगचे प्रशिक्षण घेतले आहे तिथेच तुम्हाला ड्रायव्हिंग टेस्ट देऊन लायसन्स काढता येणार आहे. जर तुम्ही ड्रायव्हिंग घरच्या घरी शिकला असाल, तरी देखील तुम्हाला तुमच्या जवळच्या ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलमध्ये जाऊन ड्रायव्हिंगची टेस्ट देऊन ड्रायव्हिंग लायसन्स काढता येणार आहे. या ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलमध्ये तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी थेअरी आणि प्रॅक्टिकल द्यावे लागणार आहे.

29 तास असेल प्रॅक्टिकल

ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलमध्ये तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स काढता येणार आहे. त्यासाठी आरटीओ कार्यालयात जाण्याची गरज नाही. मात्र या ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलमध्ये तुम्हाला थेअरी आणि प्रॅक्टिकलच्या दोन्हीं परीक्षेत पास व्हावे लागणार आहे. यासाठी तुम्हाला चार आठवड्यात २९ तास ट्रेनिंग म्हणजेच प्रॅक्टिकल करावे लागणार आहे. ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलमध्ये प्रॅक्टिकल करताना तुम्हाला हायवे, गावातील रस्ते, रिव्हर्सिंग तसेच पार्किंग यासाठी तुमचं प्रॅक्टिकल होणारा आहे. हे प्रॅक्टिकल तुम्हाला 21 तास करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर 8 तास तुम्हाला थेअरीकरता देण्यात आहे आहेत.

ट्रेनिंग सेंटरसाठी देखील दिल्या आहेत गाइडलाइन्स

आरटीओ कार्यालयात न जाता आता तुम्हाला ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलमध्येच ड्रायव्हिंगची टेस्ट देता येणार आहे. मात्र यासाठी ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून काही नियम घालून दिले आहेत. दुचाकी तसेच तीनचाकी आणि हलक्या मोटर वाहनांचे ट्रेनिंग सेंटर असेल, तर यासाठी एक एकर जागा असणे आवश्यक आहे. या बरोबरच या ट्रेनिंग सेंटरचा ट्रेनर 12वी पास असणे बंधनकारक असणार आहे. याबरोबरच त्याला कमीतकमी पाच वर्ष ड्रायव्हिंगचा अनुभव असणे आवश्यक आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून काही या संदर्भात घालून दिलेल्या नियमात ट्रेनिंग सेंटरवर बायोमेट्रिक सिस्टम असणं देखील आवश्यक असल्याचे म्हंटले आहे. सोबतच ड्रायव्हिंग सेंटरमध्ये थेअरी आणि प्रॅक्टिकल अशा दोन भागात अभ्यासक्रम घेणे आवश्यक आहे. हेवी मोटर गाड्यांसाठी 6 आठवड्यात ३८ तासांचा कोर्स घेणे आवश्यक आहे. यामध्ये 8 तास थेअरी तर 31 तास प्रॅक्टिकल असणं आवश्यक आहे.

हे देखील वाचा one nation one ration card: सरकारचा मोठा निर्णय! रेशनकार्ड धारकांनो ३० जूनपर्यंत करा हे काम अन्यथा रेशन होईल बंद..

PM kisan: या कारणामुळे पीएम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला लागतोय वेळ..

Leopard Attack: पंधरा जणांवर हल्ला करून बिबट्या गेला पळून; पोलिस आणि बिबट्याची झुंज पाहून व्हाल थक्क..

Google Search: गुगलवर या तीन गोष्टी सर्च केल्यास, पोलीस ठोकतील बेड्या..

second hand bike: तीन महीने वापलरेली Pulsar १८ हजारांत Splendor Plus १६ हजारांत तर CB unicorn 30 हजारांत; जाणून घ्या अधिक..

Hero Motocorp Requirement: Hero कंपनीमध्ये इंजीनियरिंग सेच या उमेदवारांसाठी नोकरी करण्याची सुवर्णसंधी! असा करा अर्ज..

Hero MotoCorp: दुचाकीस्वारांची पेट्रोलच्या खर्चातून होणार सुटका; आता Hero Splendor इलेक्ट्रिक रूपात..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.