Viral Video: जाळीच्या बाहेरून सिंहाची करत होता थट्टा, हात तोंडात सापडताच सिंहाने पाडला तुकडा; व्हिडिओ पाहून उडेल थरकाप..

0

Viral Video: विनाकारण एखाद्याला डिवचण्याची माणसाला मोठी खोड असते. मात्र कधी-कधी याचे फार गंभीर परिणाम देखील भोगावे लागतात. विनाकारण कोणालाही त्रास दिला, तर सहाजिकच समोरच्याला राग हा येणारच मग तो माणूस असो की प्राणी. जुनी माणसं नेहमी म्हणतात, विनाकारण खोड काढली तर मुंगीलाही राग येतो. आता याच संदर्भातला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एक व्यक्ती जमैका प्राणी संग्रहालयामध्ये बंदिस्त असणाऱ्या एका सिंहाशी मस्ती करत होता, त्याच्या ही मस्ती चांगलीच अंगलट आली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत एक व्यक्ती प्राणी संग्रहालयामध्ये बंदिस्त असणाऱ्या सिंहाची खोड काढत होता. जाळीच्या आत मध्ये बंदिस्त असणाऱ्या सिंहाला आपल्या बोटाने तो डिवचत होता. कधी-कधी तो सिंहाच्या जबड्यातून आपलं बोट बाहेर काढण्यात तो यशस्वी देखील होत होता. सिंहा सोबतचा हा प्रकार खूप वेळ चालूच राहिला. सिंह देखील हा व्यक्ती आपल्या सोबत खेळत आहे, हे पाहून सिंह देखील चांगलाच संतापल्याचे व्हायरल झालेल्या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत हा सगळा प्रकार समोर काही प्राणी प्रेमी आपल्या कॅमेऱ्यात कैद करताना देखील पाहायला मिळत आहेत.

अंगावर लाल टीशर्ट असणारा हा व्यक्ती सिंहाच्या जबड्यात अनेक वेळा आपलं बोट घालून, बाहेर काढण्यात यशस्वी झाला. मात्र अखेर जे व्हायला नको होतं तेच झालं. शेवटी सिंहाच्या जबड्यात या व्यक्तीचे बोट अडकलंच. हा सगळा प्रकार अनेक प्राणी प्रेमी व्हिडीओ शूट करण्यात व्यस्त राहिले, मात्र त्यांनी या व्यक्तीला वाचवण्याचा कुठलाही प्रयत्न केला नाही. यामुळे सोशल मीडियावर या घटनेविषयी अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. हा व्हिडिओ पाहताना अनेकांच्या काळजाचं पाणी पाणी होत असल्याचं पाहायला मिळत असून, सिंहाच्या जबड्यात बोट अडकलेल्या व्यक्तीची काय अवस्था झाली असेल, ते कोणी कल्पनादेखील करू शकत नाही.

काय घडलं नेमकं? 

सिंहासोबत मस्ती करत असणाऱ्या या व्यक्तीचा व्हिडिओ @oneciaG या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत काही प्राणी प्रेमी या दोघांची सुरू असलेली मस्ती आपल्या कॅमेरात शुट करत आहेत. लाल रंगाच्या टी-शर्टवर असणारा हा व्यक्ती सिंहाच्या जबड्यातून आपलं बोट कसं सुखरूप बाहेर काढत आहे, हे या घटनेचं कॅमेराने शूट करणाऱ्या अनेक प्राणी प्रेमींना देखील कौतुक वाटताना पाहायला मिळत आहे. मात्र पुढे सिंहाच्या जबड्यात अडकून त्याचा तुकडा पडणार आहे, याचे या प्राणी प्रेमींना जराशीही कल्पना नाही.

अनेकदा या व्यक्तीने सिंहाच्या जबड्यातून आपलं बोट बाहेर काढण्यात यश मिळवलं. मात्र नंतर काही वेळाने सिंहाने आपल्या जबड्यात त्या व्यक्तीचे बोट पकडलं. सिंहाच्या जबड्यातून आपलं बोट काढण्यासाठी हा तरुण मोठमोठ्याने ओरडत असल्याचं व्हायरल झालेल्या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. सिंहाच्या जबड्यात बोट अडकल्याने त्याला होत असलेल्या वेदना असाह्य होत असल्याने, तो मोठमोठ्याने विव्हळत आहे. आपलं बोट दोन्हीं हाताने तो जोरात ओडत आहे, मात्र तरीदेखील सिंह त्या व्यक्तीचं बोट सोडायला तयार नसल्याचे, या व्हिडिओत पाहायला मिळत आहे.

अथांग प्रयत्नानंतर सिंहाच्या जबड्यात त्याचं बोट सुटताना पाहायला मिळतं, मात्र सिंहाच्या जबड्यात अडकलेल्या बोटाचा तुकडा पडला असल्याचं देखील एकीकडे पाहायला मिळत आहे. हा सगळा प्रसंग समोर प्राणी प्रेमी आपल्या कॅमेऱ्यात कैद करताना पाहायला मिळत आहेत. सिंहाच्या जबड्यात बोट अडकल्यानंतर हा व्यक्ती वेदनेने विव्हळत होता, मात्र त्याला कोणीही मदत केली नाही. या व्यक्तीला कोणीही मदत केली नसल्याने, सोशल मीडियावर माणसाच्या संवेदनशीलता संपत चालल्या असल्याचं बोललं जात आहे.

काय म्हणाले नेटकरी? 

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना, अनेक युजर्स त्या व्यक्तीच्या कर्माचे फळ मिळाल्याची भावना व्यक्त करत आहेत. तर काही जण हा तरुण वेदनेने विव्हळत आहे, तरीदेखील त्याला कोणीही मदतीला गेले नाही. या सगळ्यावल सोशल मीडियाचा झालेला परिणाम असल्याचं बोललं गेलं आहे. संकटात सापडलेल्या तरुणाला सोडवण्याऐवजी अनेक जण हा प्रसंग आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यात व्यस्त होते, यापेक्षा मोठे दुर्दैव काय असू शकतं अशा देखील प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटल्या आहेत.

हे देखील वाचा government job: ३४ विभागात एकूण १लाख रिक्त पदांची मेगा भरती होणार या तारखेला; राज्य सरकारने दिला हिरवा कंदील..

Ayodhya daura: धक्कादायक खुलासा! शरद पवारांनी नाही, भाजपनेच राज ठाकरे यांना अडकवण्याचा रचला कट..

LPG GAS SUBSIDY: फक्त याच गॅस धारकांना मिळणार २०० रूपये अनुदान; तुम्हीही घेऊ शकता लाभ, अशी करा नोंदणी..

Ration shop: या कारणामुळे रेशन दुकानात आता गव्हा ऐवजी मिळणार तांदूळ; अन्न पुरवठा विभागाने घेतला निर्णय..

PM kisan Update: मोठी बातमी! अकरावा हप्ता आलेल्या लाभार्थ्यांची यादी केंद्र सरकारकडून जाहीर; अशी चेक करा यादी..

India Post Recruitment 2022: पोस्ट ऑफिसमध्ये ३९ हजार पदांची मेगा भरती; दहावी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी! परिक्षेविना अशी केली जाणार निवड..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.