Ayodhya daura: धक्कादायक खुलासा! शरद पवारांनी नाही, भाजपनेच राज ठाकरे यांना अडकवण्याचा रचला कट..

0

Ayodhya daura: म शि दी व री ल भों ग्या सं द र्भा त घेतलेल्या भूमिकेमुळे राज ठाकरे गेल्या काही दिवसांपासून कमालीचे चर्चेत आहेत. मशिदीवरील भोंग्यासंदर्भात घेतलेली भूमिका ताजी असतानाच, त्यांनी घोषित केलेला आयोध्या दौरा आणि त्याला उत्तर प्रदेशचे भाजपचे खासदार ब्रजभूषण सिंग यांनी केलेला कडाडून विरोध यामुळे आता राज्याचे राजकारण देखील चांगलेलच तापल्याचे पाहायला मिळत आहे. दोन दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी पुण्याच्या गणेश कला क्रीडा मंदिरात झालेल्या सभेत आपण अयोध्या दौरा का स्थगित केला हे सांगितले. राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा स्थगित करताना, आमच्या कार्यकर्त्यांना उत्तरप्रदेशमध्ये अडकवण्याचा ट्रॅप आखला गेला होता, असा देखील आरोप केला. आता या पाठीमागे शरद पवार यांचा हात असल्याचे मनसेकडून सांगण्यात येत आहे, मात्र आता या पाठीमागे भाजपचा हात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

राज ठाकरे यांनी पाच तारखेला आपण अयोध्या दौरा करणार असल्याचं यापूर्वी घोषित केलं होतं. मात्र उत्तर प्रदेशचे भाजपचे खासदार ब्रजभूषण सिंह यांनी मात्र राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला कडाडून विरोध केला. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांसंदर्भात जी भूमिका घेतली होती, त्याबाबत त्यांनी जाहीर माफी मागावी. आणि मगच अयोध्येच्या भूमीवर पाऊल ठेवावे, अन्यथा त्यांना उत्तर प्रदेशमध्ये येऊ दिलं जाणार नसल्याची भूमिका खासदार ब्रजभूषण सिंग यांनी घेतली आहे. ब्रजभूषण सिंग यांनी राज ठाकरेंच्या दौऱ्याविरोधात दिल्लीमध्ये पत्रकार परिषद देखील आयोजित केली होती. ब्रजभूषण हे आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे लक्षात घेऊन, पुण्यात झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा आपण का स्थगित करत आहोत हेही सांगितलं.

दोन दिवसांपूर्वी पुण्यात झालेल्या सभेत राज ठाकरे अयोध्या दौऱ्याविषयी बोलताना म्हणाले, माझा अयोध्या दौरा अनेकांना का झोंबला मला मला कळत नाही. माझा आयोध्या दौरा रद्द व्हावा यासाठी अनेकांनी प्रयत्न केले असल्याचे देखील राज ठाकरे म्हणाले. उत्तर भारतीयांसंदर्भात घेतलेल्या भूमिकेमुळे जर मला माफी मागायला पाहिजे असेल, तर गुजरातमधून उत्तर भारतीयांना हाकलून लावण्यात आले, त्यांना कोणी माफी मागायला लावणार आहे, की नाही? असा सवाल देखील राज ठाकरे यांनी उपस्थित करत एक प्रकारे भारतीय जनता पार्टीवर निशाणा साधला. माझा अयोध्या दौरा यशस्वी होऊ नये, म्हणून ट्रॅप रचला असल्याचं माझ्या लक्षात आलं आहे. आणि म्हणून मी तूर्तास या दौऱ्याला स्थगिती दिली असल्याचे राज ठाकरे यांनी घोषित केले.

एवढं होऊन देखील जर मी आयोध्या दौरा नियोजित वेळेनुसार केला तर, त्या ठिकाणी काहीतरी वेडं-वाकडं घडण्याची शक्यता आहे. या दौर्‍यात जर मला काही झालं, तर आपली पोरं अंगावर जाणारच, आणि मग त्यांच्यावर केसेस टाकून जेलमध्ये टाकण्यात येईल. मला दौरा स्थगित केल्यामुळे कोणी काहीही म्हटलं तरी फरक पडत नाही. मात्र माझ्या पोरांना मी अशाप्रकारे अडचणीत आणू इच्छित नसल्याचं सांगत राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा स्थगित करण्याचे कारण सांगितलं.

मात्र आता राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा यशस्वी होऊ नये, यासाठी कट नक्की कोणी रचला, हा प्रश्न उपस्थित झाला. ब्रजभूषण सिंग यांनी घेतलेल्या भूमिके पाठीमागे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार असल्याचं मनसेकडून सांगण्यात येत आहे. ब्रजभूषण सिंग हे शरद पवार यांची वारंवार का स्तुती करत आहेत, याचं कारण आता समोर आले असून, या पाठीमागे शरद पवार असल्याचं मनसेकडून बोललं जात आहे. शरद पवार, ब्रजभूषण सिंग, आणि सुप्रिया सुळे यांचे काही फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत ब्रजभूषण सिंह या संदर्भात बोलताना म्हणाले, पक्षाचे काम म्हणूनच आम्ही राज ठाकरे यांना विरोध करत आहे. भाजपकडून मी तब्बल सहा वेळा खासदार झालो आहे. एक वेळा माझी पत्नी खासदार राहिली आहे. माझा मुलगा देखील आमदार आहे. मला विरोध करायचं कोणी काही कारणच नाही. खासदार ब्रजभूषण सिंग यांनी केलेल्या या विधानानंतर पत्रकारांनी ब्रजभूषण सिंग यांना भाजपच्या सांगण्यावरून तुम्ही राज ठाकरे यांना विरोध करत आहात का? असा सवाल देखील विचारला. या प्रश्नावर ब्रजभूषण सिंग म्हणाले, मी भारतीय जनता पार्टीचेच काम करत आहे.

ब्रजभूषण सिंग यांनी केलेल्या विधानामुळे आता राज ठाकरे यांना भारतीय जनता पार्टीनेच आयोध्या दौऱ्याला विरोध करण्याचे कारस्थान रचले असल्याचं बोललं जात आहे. सहाजिकच आता या प्रकरणामुळे राजकारण चांगलेच तापल्याचं पाहायला मिळतं असून, राज ठाकरे उत्तर भारतीयांची माफी मागणार, की खासदार ब्रजभूषण सिंह माघार घेणार, हे पाहणं येणाऱ्या काळात औत्सुक्याचे ठरणार आहे.

हे देखील वाचाQualifier 1: पहिला क्वालिफायर सामना आज पावसामुळे रद्द होण्याची शक्यता; न खेळता गुजरात जाणार फायनलमध्ये तर राजस्थान..

IPL 2022 Update: क्वालिफायर आणि एलिमिनेटर सामन्यांवर वादळ आणि पावसाचं सावट; ..तर RCB आणि LSG न खेळताच जाणार बाहेर..

LPG GAS SUBSIDY: फक्त याच गॅस धारकांना मिळणार २०० रूपये अनुदान; तुम्हीही घेऊ शकता लाभ, अशी करा नोंदणी..

Cardless Withdrawal: आता Card शिवाय ATM मधून UPI द्वारे काढता येणार पैसे; जाणून घ्या प्रोसेस..

one nation one ration card: सरकारचा मोठा निर्णय! रेशनकार्ड धारकांनो ३० जूनपर्यंत करा हे काम अन्यथा रेशन होईल बंद..

Ration shop: या कारणामुळे रेशन दुकानात आता गव्ह ऐवजी मिळणार तांदूळ; अन्न पुरवठा विभागाने घेतला निर्णय..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.