Digilocker on Whatsapp : ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, आधारकार्ड, आता whatsapp वर करता येणार डाउनलोड; जाणून घ्या प्रोसेस..

0

Digilocker on Whatsapp: देशात व्हाट्सअप (whatsapp) वापरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अनेक जण व्हाट्सअपद्वारे एकमेकांना डॉक्युमेंट्स देखील पाठवण्याचे काम करतात. व्हाट्सअप चॅटिंग ॲप खूप सोपं आणि साधं असल्याने, असंख्य युजर्स व्हॉट्सऍप वापरताना पाहायला मिळतात. ही बाब लक्षात घेऊन, इलेक्‍ट्रॉनिक्‍स आणि आयटी मंत्रालयाने व्हाट्सअपवर आता ग्राहकांना पॅन कार्ड ( PAN Card) ड्रायव्हिंग लायसन, driving License) आरसी (RC) दहावी बारावी मार्क लिस्ट, इद्यादी डॉक्युमेंट्स डाऊनलोड करता येणार आहेत. त्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने MyGov हेल्पडेस्कवर व्हाट्सअप युजर्सना जाण्याची सुविधा तयार केली आहे.

आता तुम्हाला चुकून तुमचं लायसन घरी राहिलं असेल, किंवा पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन इतर कागदपत्रे जवळ बाळगायची नसतील, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. ड्रायव्हिंग लायसन, पॅन कार्ड तसेच इतरही काही कागदपत्रे तुम्हाला व्हाट्सअपवर सहज डाऊनलोड करता येणार आहेत. आता आपण याच संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. डिजीलॉकर या सेवेत जाण्यासाठी व्हाट्सअप युजर्स आता MyGov हेल्पडेस्कच्या माध्यमातून या सुविधेचा लाभ घेऊ शकणार आहेत. आता आपण पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी कागदपत्रे कशी डाउनलोड करायची? हे सविस्तर जाणून घेऊ.

केंद्र सरकारने व्हॉट्सॲप युजर्ससाठी एक नवीन भन्नाट फीचर आणले आहे. या फीचर्समुळे आता तुम्हाला सरकारी सेवांचा लाभ घेणं पूर्वीपेक्षा अधिक सोपं झालं आहे. आज आपण याच संदर्भात बोलणार आहोत. केंद्र सरकारकडून डिजीलॉकर सेवा WhatsApp वापरणाऱ्यांसाठी बनवण्यात आली आहे. ज्याद्वारे तुम्ही तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स, आरसी बुक, पॅन कार्ड, तसेच इतरही महत्त्वाची कागदपत्रे सहज व्हाट्सअपवर डाऊनलोड करू शकणार आहे. जर तुम्हाला पोलिसांनी ड्रायव्हिंग लायसन्ससाठी पकडलं, तर तुम्ही स्वतः ला फाईन भरण्यापासून वाचवू शकता.

इद्यादी कागदपत्रे तुम्ही डाउनलोड करू शकता? 

ड्रायव्हिंग लायसन (DL) पॅन कार्ड (PAN Card), आर.सी (RC), दहावीची मार्कशीट, दुचाकी विमा पॉलिसी, विमा पॉलिसी दस्तऐवज १२ ची मार्कशीट इत्यादी अनेक महत्त्वाची कागदपत्रे तुम्ही डिजिलॉकरच्या साह्याने सहज डाऊनलोड करू शकता. सरकारने सुरू केलेल्या या सुविधेमुळे अनेक सर्वसामान्यांच्या अडचणी आता दूर होण्यास मदत होणार आहे. या सुविधेमुळे अनेकांचा वेळ पैसा आणि शारीरिक कष्ट वाचणार आहे. आता आपण या सुविधेचा लाभ कसा घ्यायचा? हे सविस्तर जाणून घेऊ

या पद्धतीने डाउनलोड करा कागदपत्रे

या सरकारी सेवांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये +91 9013151515 हा नंबर जतन करावा लागणार आहे. हा नंबर तुम्ही जतन केल्यानंतर, या नंबरवर तुमचं व्हाट्सअप ओपन होईल. आता तुम्ही या नंबरवर व्हाट्सअप ओपन केल्यानंतर, तुम्ही या नंबरवर ‘hi’ किंवा ‘Digilocker’ असं टाईप करून पाठवायचं आहे. टाईप करून तुम्ही या नंबरवरून पाठवल्यानंतर, तुमच्यासमोर COWIN आणि Digilocker असे दोन पर्याय पाहायला मिळतील.

आता तुम्ही या दोन पर्यायांपैकी ‘डिजिलॉकर’ हा पर्याय निवडायचा आहे. हा पर्याय निवडल्यानंतर, तुमच्या मोबाईलची आधार पडताळणी करण्यात येईल. आधार पडताळणी झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी पाठवला जाईल. आता तुम्हाला तुमच्या डिजिलॉकरमध्ये तुम्ही कोण-कोणती कागदपत्रे काढली आहेत, हे तुम्हाला सांगण्यात येईल.

आता समोर तुम्हाला दस्तऐवजामध्ये तुमचा जो मोबाईल क्रमांक नोंदणीकृत आहे, तोच मोबाईल तुम्हाला प्रविष्ट करावा लागणार आहे. नंतर या मोबाईल क्रमांकावर तुम्हाला एक ओटीपी पाठवला जाईल, OTP ची पडताळणी झाल्यानंतर, तुम्ही तुम्हाला हवी असणारी कागदपत्रे, सहज डाऊनलोड करू शकणार आहे.

हे देखील वाचा Edible Oil: खाद्यतेलाबाबत मोठी बातमी, शासनाने घेतला हा मोठा निर्णय; खाद्यतेल महागणार की स्वस्त होणार

Viral Video: जाळीच्या बाहेरून सिंहाची करत होता थट्टा, हात तोंडात सापडताच सिंहाने पाडला तुकडा; व्हिडिओ पाहून उडेल थरकाप..

Ration shop: या कारणामुळे रेशन दुकानात आता गव्हा ऐवजी मिळणार तांदूळ; अन्न पुरवठा विभागाने घेतला निर्णय..

Lifestyle: दररोज से&क्स केल्याने काय होतं माहिती आहे? से क्स विषयी जाणून घ्या सविस्तर..

India Post Recruitment 2022: पोस्ट ऑफिसमध्ये ३९ हजार पदांची मेगा भरती; दहावी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी! परिक्षेविना अशी केली जाणार निवड..

beauty vibes: मेकअप पेक्षाही सुंदर आणि मुलायम दिसेल चेहरा, फक्त लावा हा फेस लेप लग्नाला जाताना तर हमखास लावा सगळ्यांच्या नजरा..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.