ITBP Recruitment 2022: ITBP मध्ये निघाली बंपर भरती; 12 वी उत्तीर्ण उमेदवारांनो लवकर करा अर्ज..

0

ITBP Recruitment 2022: उच्च शिक्षण घेण्याची अनेकांची परिस्थिती नसल्यामुळे, अनेक जण बारावीनंतरच नोकरीच्या शोधात असतात. तसं पाहायला गेलं तर, बेरोजगारीच्या या दुनियेत उच्चशिक्षण घेऊन देखील नोकरी मिळेल याची कसलीही शाश्वती नसल्याने देखील, आता अनेक तरुण कुठेतरी चार पैशाची नोकरी मिळविण्यासाठी धडपड करतात. गेली दोन वर्षे कोरोणामुळे अनेकांना नोकरी गमवावी लागली. त्याचबरोबर ग्रॅज्युएट तसेच बारावी झालेल्या विद्यार्थ्यांना नोकरीसाठी कुठेही अर्ज करता आला नाही. मात्र कोरोनानंतर आता परिस्थिती पूर्वपदावर येत असून, अनेक क्षेत्रात नोकरीच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

देशसेवा करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. त्यासाठी अनेकजण आर्मी जॉईन करण्याचे स्वप्न बाळगतात. आता तुम्हाला या क्षेत्रात नोकरी करण्याची इच्छा असेल, आणि तुम्ही देशसेवा करू इच्छित असाल तर, तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे. देशसेवेचे स्वप्न बाळगणाऱ्या तरुणांसाठी आता ITBP इंडो-तिबेट बॉर्डर हेड (HC) कॉन्स्टेबल तसेच सहाय्यक उपनिरीक्षक (ASI) अशा एकूण 286 पदांसाठी भरती प्रक्रिया पार पडणार असल्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. आता आपण या भरती संदर्भात सविस्तर जाणून घेऊया.

ITBP इंडो-तिबेट बॉर्डर हेड (HC) कॉन्स्टेबल तसेच सहाय्यक उपनिरीक्षक या पदांसाठी डायरेक्ट एन्ट्री अँड लिमिटेड या विभागीय स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून (LDCE) एकूण 286 रिक्त पदे भरली जाणार आहेत. आता या भरतीबाबद अर्ज कसा करायचा? या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे? अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे? तसेच निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना मासिक वेतन काय असणार आहे? या संदर्भात आपण सविस्तर जाणून घेऊ.

या भरती संदर्भात सर्वप्रथम आपण पात्रता आणि वयोमर्यादा काय ठेवण्यात आली आहे, हे पाहूया.

आयटीबीपी हेड कॉन्स्टेबल तसेच सहाय्यक उपनिरीक्षक या पदांसाठी निवडण्यात येणार्‍या 286 जागांसाठी उमेदवारांना कुठल्याही मान्यताप्राप्त शिक्षण संस्था मंडळातून बारावी पास असणे आवश्यक आहे. याबरोबरच अर्ज करणाऱ्या उमेदवारांना हिंदी आणि इंग्रजी टायपिंग करता येणे आवश्यक आहे. या भरती प्रक्रियेसंदर्भात वयोमर्यादेचा विचार करायचा झाल्यास, उमेदवारांचे वय 18 ते 25 दरम्यान असणे आवश्यक आहे. काही पदांकरिता 18 वर्षे वयोमर्यादा ठेवण्यात आले आहे. तर काही पदांसाठी 25 वर्षे वय असणे आवश्यक असल्याचं अधिसूचनेत जारी करण्यात आलं आहे. याबरोबरच या भरती प्रक्रियेत काही पदांसाठी वय वर्ष 35 ठेवण्यात आलं आहे.

किती असेल मासिक वेतन? 

आयटीबीपी हेड कॉन्स्टेबल या पदासाठी निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना दर महिन्याला पंचवीस हजार पाचशे रुपये ते 81 हजार रूपये पगार दिला जाणार आहे. त्याचबरोबर सहाय्यक उपनिरीक्षक यासाठी निवडण्यात आलेल्या उमेदवारांच्या मासिक वेतनाविषयी सांगायचं झाल्यास, 29 हजार 200 ते 93 हजा रूपये वेतन देण्यात येणार आहे. याबरोबरच ठराविक काळानंतर, वेतनात वाढ देखील होणार आहे. आता आपण या भरती प्रक्रियेसाठी अर्ज कसा करायचा? हे सविस्तर जाणून घेऊ.

या पद्धतीने करा अर्ज

इच्छुक उमेदवारांनी या भरती संदर्भात अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम ITBP म्हणजेच इंडो-तिबेट बॉर्डरच्या अधिकृत वेबसाईट itbpolice.nic.in वर जावे लागणार आहे. तुम्ही तुमच्या मोबाईल मधील क्रोमवर जावून itbpolice.nic.in असं सर्च केल्यानंतर, तुमच्या समोर Recruitment हा पर्याय ओपन झालेला दिसेल. तुम्हाला बरोबर या पर्यायावर क्लिक करायचं आहे. रिक्वायरमेंट या पर्यायावर क्लिक केल्यानंतर, तुमच्यासमोर या भरती प्रक्रियेसंदर्भात अर्ज करण्यासाठीची लिंक ओपन झालेली असेल. त्यातल्या एका लिंकवर तुम्हाला नोटिफिकेशन पाहता येणार आहे. तर एका लिंकवर क्लिक करून तुम्हाला अर्ज करता येणार आहे. तुम्ही या दोन्ही लिंकवर क्लिक करून, नोटिफिकेशन पाहू शकता. आणि अर्ज देखील करू शकता.

अर्ज करण्यासाठी देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर ‘रजिस्टेशन’ करा हा पर्याय दिसेल, त्यानंतर तुम्हाला रजिस्टर करून आवश्यक असणारा दस्तऐवज अपलोड करावा लागणार आहे. याबरोबरच तुम्हाला अर्जाचे शुल्क देखील भरावे लागणार आहे. अर्जाचे शुल्क भरल्यानंतर, तुम्ही सबमिट या पर्यायावर क्लिक करायचं आहे. सबमिट या पर्यायावर क्लिक केल्यानंतर, तुमचा अर्ज यशस्वीरित्या पूर्ण होणार आहे. अधिसूचना पाहण्यासाठी आणि डायरेक्ट अर्ज करण्यासाठी यावर क्लिक करा

हे देखील वाचा Lifestyle: नदीत नाणं का फेकतात? घरात लिंबू मिरची का बांधतात? अंत्यसंस्कार केल्यानंतर आंघोळ का करतात? जाणून घ्या शास्त्रीय कारणे..

Viral video: चिमुकल्यावर वानराने केला हल्ला, बहाद्दराने न घाबरता केला पलटवार..,पुढे काय झालं पहा तुम्हीच..

Home Remedies: हा घरगुती उपाय केल्यास, एकाच रात्रीत शरीरावर असणारी चामखीळ पडेल गळून..

beauty vibes: मेकअप पेक्षाही सुंदर आणि मुलायम दिसेल चेहरा, फक्त लावा हा फेसलेप लग्नाला जाताना तर हमखास लावा सगळ्यांच्या नजरा..

Digilocker on Whatsapp : ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, आधारकार्ड, आता whatsapp वर करता येणार डाउनलोड; जाणून घ्या प्रोसेस..

Cardless Withdrawal: आता Card शिवाय ATM मधून UPI द्वारे काढता येणार पैसे; जाणून घ्या प्रोसेस..

Edible Oil: खाद्यतेलाबाबत मोठी बातमी, शासनाने घेतला हा मोठा निर्णय; खाद्यतेल महागणार की स्वस्त होणार

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.