Jio Recharge Plans: जिओच्या ‘या’ प्लॅनने उठवला Airtel Voda चा बाजार; 155 रुपयांत 2GB डाटा आणि अनलिमिटेड कॉलिंग..

0

Jio Recharge Plans: जिओ (Jio) बाजारात उतरण्यापूर्वी ग्राहकांची अनेक टेलिकॉम कंपन्या प्रचंड लूट करताना पाहायला मिळत होत्या. मात्र रिलायन्स जिओने (Reliance jio) टेलिकॉम क्षेत्रात पाऊल ठेवल्यानंतर, आपल्या ग्राहकांना तब्बल एक वर्ष इंटरनेट, कॉलिंग तसेच एसएमएस सेवा मोफत दिली. सहाजिकच त्यामुळे जिओचे देशभरात असंख्य यूजर्स तयार झाले. एका वर्षानंतर रिलायन्स जिओने आपले दर जारी केले. जिओनी सर्वप्रथम ग्राहकांना डाटा वापरण्याची सवय लावली. आणि नंतर कर लावायला सुरुवात केली. असं देखील बोललं जातं, मात्र इतर टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेत जिओ हे अधिक स्वस्त इंटरनेट कॉलिंग आणि एसएमएस सेवा देतं.

जीवो आपल्या ग्राहकांसाठी नेहमी नवनवीन ऑफर्स घेऊन येत असतं. आता पुन्हा एकदा जिओ आपल्या ग्राहकांसाठी एक भन्नाट ऑफर घेऊन आलं आहे. या ऑफरमुळे आता एअरटेल, वोडाफोन, आयडिया यांच्यासाठी मोठी डोकेदुखी ठरणार आहे. काय आहेत जिओचे नवीन प्लॅन? यासंदर्भात आपण सविस्तर जाणून घेऊ. या प्लॅन विषयी एक गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे, ते म्हणजे तुम्हाला या प्लॅनचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्हाला My Jio वरूनच रिचार्ज करावा लागणार आहे. अन्यथा तुम्हाला या ऑफर्स मिळणार नाहीत.

जिओने नुकताच आपला नवीन प्लॅन लॉन्च केला असून, या प्लॅनमध्ये आपल्या ग्राहकांसाठी अनलिमिटेड कॉलचा पर्याय दिला आहे. त्याबरोबरच तुम्हाला दोन जीबी डाटा आणि 300 एसएमएस देखील या प्लॅनमधून मिळणार आहेत. आता आपण हा प्लॅन कसा ऍक्टिव्हेट करायचा? माय जिओवरून कसा रिचार्ज करायचा आहे? हे सविस्तर जाणून घेऊ, आणि त्यानंतर या प्लॅनविषयी सविस्तर जाणून घेऊ.

असा करा माय जीवो वरून रिचार्ज

ग्राहकांना रिचार्ज फक्त माय जिओ या अॅपरूनच करता येणार आहे. इतर कुठल्याही UPI app वरून तुम्ही रिचार्ज करू शकणार नाही. या ऑफर्सचा लाभ घेण्यासाठी, तुम्हाला सर्वप्रथम तुमचा मोबाईल मधील माय जिओ हे ॲप ओपन करायचं आहे. त्यानंतर डाव्या बाजूला तुम्हाला तीन रेषा दिसतील, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर, आता तुम्हाला अनेक वेगवेगळे पर्याय पाहायला मिळतील. त्या पर्यायांपैकी तुम्हाला ‘टॉप-अप’चा पर्याय निवडावा लागणार आहे.

तुम्ही ‘टॉप-अप’ हा पर्याय निवडल्यानंतर यामध्ये देखील तुम्हाला रिचार्जचे अनेक पर्याय पाहायला मिळतील. मात्र या तक्त्याच्या सर्वात खाली जाऊन तुम्हाला 155 रुपयांचा जो ‘टॉप-अप’ पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करायचं आहे. आता तुम्ही या पर्यायावर क्लिक केल्यानंतर, तुमचा नंबर टाकायचा आहे. नंबर टाकल्यानंतर, तुमचा रिचार्ज सक्सेसफुल होईल. आता आपण या रिचार्जचे बेनिफिट्स विषयी जाणून घेऊ या

155 च्या रिचार्जमध्ये काय आहेत, बेनिफिट्स

155च्या रिचार्जमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग मिळणार आहे. तसेच ग्राहकांना दोन जीबी डाटा देखील मिळणार आहे. याची वैधता 28 दिवस असणार आहे. विशेष म्हणजे, तुमचा डाटा संपल्यानंतर देखील तुम्ही इंटरनेट वापरू शकता. मात्र इंटरनेटचा स्पीड कमी झालेला असेल. इंटरनेटवचे स्पीड 64Kbps च्या वेगाने तुम्ही इंटरनेट वापरू शकता. सोबतच तुम्हाला २८ दिवसांसाठी ३०० एसेमेस देखील मिळणार आहेत. मात्र या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपण वरती माहिती जाणून घेतल्यानूसार, हा रिचार्ज तुम्हाला My Jio अॅप मधूनच करावा लागणार आहे.

जिओ १४९चा रिचार्ज देखील आहे उपयुक्त

155 रुपयाच्या प्लॅन व्यतिरिक्त तुम्ही 149चा हा प्लान देखील परचेस करू शकता. आपल्यामध्ये तुम्हाला जिओ अनलिमिटेड कॉलिंग ऑफर करत आहे. तुम्हाला प्रति दिवस एक जीबी डाटा देखील मिळणार आहे. प्लॅनमध्ये तुम्हाला जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ सिक्युरिटी, जिओ क्लाउडचे सबस्क्रिप्शन देखील मिळणार आहे. जिओचा हा सर्वाधिक विक्री होणारा प्लॅन आहे. त्या प्लॅन ची वैधता वीस दिवस असणार आहे. तुम्हाला वीस जीबी डाटा मिळणार असून, तो प्रति दिवस एक जीबी या स्वरूपात दिला जाईल.

हे देखील वाचाLifestyle: नदीत नाणं का फेकतात? घरात लिंबू मिरची का बांधतात? अंत्यसंस्कार केल्यानंतर आंघोळ का करतात? जाणून घ्या शास्त्रीय कारणे..

Viral video: चिमुकल्यावर वानराने केला हल्ला, बहाद्दराने न घाबरता केला पलटवार.., पुढे काय झालं पहा तुम्हीच..

Amazon prime: आता Hotstar, Netflix-Amazon prime सबस्क्रिप्शन न करता मोफत पाहता येणार; फक्त करा हे काम..

Cardless Withdrawal: आता Card शिवाय ATM मधून UPI द्वारे काढता येणार पैसे; जाणून घ्या प्रोसेस..

Digilocker on Whatsapp : ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, आधारकार्ड, आता whatsapp वर करता येणार डाउनलोड; जाणून घ्या प्रोसेस..

Lifestyle: या चार सवयी बदलल्या नाहीत, तर संसार पडेल उघड्यावर; पत्नीच्याही उतराल मनातून.. 

India Post Recruitment 2022: पोस्ट ऑफिसमध्ये ३९ हजार पदांची मेगा भरती; दहावी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी! परिक्षेविना अशी केली जाणार निवड..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.