Viral video: रानडुकराला वाघाने पकडलं जबड्यात, तेवढयात मगरीनेही केला वाघावर हल्ला; पहा हा थरारक व्हिडीओ.. 

0

Viral video: प्राण्यासंदर्भातले नवनवीन व्हिडीओ सोशल मीडियावर (social media) रोज व्हायरल होत आहेत. खास करून एकमेकांच्या शिकारीचे व्हिडिओ तुफान व्हायरल (video Viral) होत असून, या व्हिडिओला नेटकरी देखील मोठ्या प्रमाणात पहात असल्याचं पाहायला मिळतं. प्राण्यांच्या जीवनशैली (lifestyle) विषयी जाणून घेण्याची प्रत्येकाची इच्छा असते. कदाचित यामुळेच प्राण्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ कधी काळजाचा थरकाप उडवतात, तर कधी मन हेलावून टाकत असतात. आता असाच काळजाचा थरकाप उडवणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

वाघ, (tiger) चित्ता, बिबट्या (leopard) सिंह, (lion) मगर हे अतिशय हिंस्र प्राणी म्हणून ओळखले जातात. एकदा का या प्राण्यांच्या जबड्यात एखादा प्राणी सापडला, तर तो संपलाच म्हणून समजा. या प्राण्यांनी एखाद्या प्राण्याची शिकार करायची ठरवलं, तर हमखास शिकार होतेच होते. हे प्राणी एकमेकांची शिकार करत असतानाचे दृश्य अनेकदा आपल्याला विचलित करून टाकतं. आता याच संदर्भातला एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वाघाने एका रानडुकराची शिकार केल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. मात्र तेवढ्यात पाठीमागून एक मगर वाघावर हल्ला करते. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओने अनेकांना विचलित करून टाकलंं आहे.

वाघ हा अतिशय चपळ प्राणी म्हणून ओळखला जातो. अनेकदा वाघ भल्याभल्या प्राण्याची सहज शिकार करतो, हे तुम्हाला वेगळे सांगण्याची गरज नाही. वाघाची शिकार करणारा प्राणी अजूनही जन्माला नाही, असं आपण नेहमी म्हणतो. मात्र वाघाची शिकार करणारे देखील काही ठराविक पाणी आहेत, त्यापैकी सर्वप्रथम आपल्याला मगरीचे नाव घ्यावे लागेल. मगर वाघाची शिकार करतानाचे व्हिडिओ तुम्ही अनेक वेळा पाहिले असतील. तलावात राहून पाणी पिण्यासाठी येणाऱ्या प्राण्यांना मगर कशा पद्धतीने आपला भक्ष्य बनवते, हे तुम्ही अनेकदा पाहिलं आहे. कितीही मोठा प्राणी असला तरी, मगरीच्या एकदा जबड्यात सापडला की, तो हतबल होतो. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओ देखील हेच पाहायला मिळत आहे.

काय घडलं नेमकं? 

@wildcapturd या ट्विटर हँडलवर वाघाचा, मगरीचा आणि रानडुकराचा एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओत वाघ भल्यामोठ्या रानडुकराला आपली शिकार बनवून, त्याला ठार मारण्याचा प्रयत्न करत आहे. रानडुकराची शिकार केल्याने वाघ आता आपल्याच धुंदीत असल्याचे या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. तेवढ्यात पाठीमागून भली मोठी मगर वाघावर हल्ला करते. अवघ्या तीस सेकंदाचा हा व्हिडीओ असला तरी, हा व्हिडीओ पाहताना नेमकं काय होणार? याचा विचार करून काळजाचं पाणी-पाणी होतं.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओत आता वाघाची मगर शिकार करणार असं वाटत असतानाच नवीन ट्विस्ट येतो. वाघाने उगीचच चपळ प्राणी म्हणून आपली ओळख निर्माण केली नाही, हे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लक्षात येतं. आपण शिकारीत मग्न असलो तरी, आपल्या वर कोणीतरी ह ल्ला करत आहे, हे वाघाला चांगल्या प्रकारे माहीत असल्याचं हा व्हिडिओ पाहताना शेवटी लक्षात येतं. मगर तिच्या जबड्यात आपलं शरीर पकडणार एवढ्यात वाघ जबरदस्त चपळाई दाखवत बाजूला सरतो, आणि मगरीचा हा डाव अपयशी ठरतो.

काय म्हणाले नेटकरी? 

वाघ आता आपली शिकार करण्यामध्ये व्यस्त असल्याचे पाहून मगर वाघावर हल्ला करण्याच्या उद्देशाने हळूहळू पुढे सरकते, मगर हल्ला देखील करते. मात्र या हल्ल्यातून वाघ अतिशय चपळाईने मगरीचा हा डाव उलथून लावतो. वाघाची शिकार करण्यात अपयशी ठरलेली मगर, त्याच ठिकाणी हतबल होऊन, वाच रानडुकराची कशाप्रकारे शिकार करतो आहे, हे पाहत बसल्याचं सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत दिसत आहे. या व्हिडिओ खाली कमेंट करताना अनेक यूजर्सने वाघाचं कौतुक केलं आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ आतापर्यंत साठ हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर अनेकांनी या व्हिडिओ खाली कमेंट केल्या आहेत. एका युजर्सने कमेंट करताना लिहिले आहे, वाघाला चपळ का म्हणतात? हे आज प्रत्यक्षात पाहायला मिळाले. तर दुसऱ्या एका यूजर्सने लिहिले आहे, मगर आपली शिकार करायला आली आहे, हे माहीत असूनही, वाघ किंचितही घाबरला नाही, याचा अर्थ त्याला त्याच्या ताकदीवर पूर्ण विश्वास आहे.

हे देखील वाचा Lifestyle: पुरुषांच्या या चार गोष्टींवर महिला टाकतात जीव ओवाळून; जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य..

Viral video: चिमुकल्यावर वानराने केला हल्ला, बहाद्दराने न घाबरता केला पलटवार..,: पुढे काय झालं पहा तुम्हीच..

Video Viral: बाबा आईला मारु नका म्हणून लेकरं ओरडत राहिली पण नराधमाने ऐक नाही ऐकलं; मन हेलावून टाकणारा व्हिडिओ व्हायरल..

Viral Video: जाळीच्या बाहेरून सिंहाची करत होता थट्टा, हात तोंडात सापडताच सिंहाने पाडला तुकडा; व्हिडिओ पाहून उडेल थरकाप..

Jio Recharge Plans: जिओच्या या प्लॅनने उठवला Airtel Voda चा बाजार; 155 रुपयांत 2GB डाटा आणि अनलिमिटेड कॉलिंग..

Hair Problems: डोक्यातील पांढरे केस तोडल्यानंतर केस आणखी पांढरे का होतात? जाणून घ्या शास्त्रीय कारण..

Home Remedies: ha घरगुती उपाय केल्यास, एकाच रात्रीत शरीरावर असणारी चामखीळ पडेल गळून..

India Post Recruitment 2022: पोस्ट ऑफिसमध्ये ३९ हजार पदांची मेगा भरती; दहावी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी! परिक्षेविना अशी केली जाणार निवड..

ITBP Recruitment 2022: ITBP मध्ये निघाली बंपर भरती; 12 वी उत्तीर्ण उमेदवारांनो लवकर करा अर्ज..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.