Healthy Food For Kidney: यामुळे किडनीच्या समस्या उद्भवतात; ‘या’ चार पदार्थाचे सेवन केलयास किडनीच्या समस्या होतात दूर..

Healthy Food For Kidney: सध्या किडनीचे म्हणजेच मुत्रपिंडाचे वेगवेगळे आजार होण्याचे प्रमाण आता वाढलेलं पाहायला मिळते. बरेचसे आजार आजकाल कमी वयात होताना पाहायला मिळत आहेत. किडन्यांचे आजारही (kidney diseases) आजकाल बऱ्याच लोकांना होताना पाहायला मिळतात. आजकालची बदलती जीवनशैली या गोष्टींना कारणीभूत असल्याचे तज्ञ सांगतात. मुख्य कारण म्हणजे कमी पाणी पिणे, फास्टफूड- जंकफूड खात राहणे, शरीराला गरजेचा असलेला व्यायाम न करणे या गोष्टींमुळे किडनी खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे.

किडनी हे मानवी शरीरातील खूप महत्वाचा घटक आहे. किडनीचे खरे महत्व ज्यांची किडनी निकामी झाली आहे, या लोकांपेक्षा कोणालाही जास्त समजू शकत नाही. किडनी आपल्या शरीरातील विषारी घातक द्रव्ये बाहेर फेकण्याचे काम करते. त्यामुळे किडनीचे आरोग्य उत्तम ठेवण गरजेचे आहे. त्यासाठी तुम्हाला खूप मोठी मेहनत घ्यावी लागणार नाही, अगदी सहज तुम्ही तुमच्या किडनीचे आरोग्य उत्तम ठेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला तुमच्या आहारात बदल करावा लागेल. त्याविषयी आपण या लेखात सविस्तर जाणून घेणार आहोत. ते आपण सविस्तरपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

रोजच्या जीवनशैलीत माणूस काही चुका करतो, ज्यामुळे दोन्ही किडन्या निकामी होऊन जातात. या चुका देखील टाळता येऊ शकतात. आपण थोडंसं याबाबत सविस्तर जाणून घेऊया. बऱ्याचदा तुम्हाला काही त्रास होत असेल, तुमच्या शरीराचा कुठल्या भागात वेदना होत असेल, अशावेळी आपण वेदना कमी करण्यासाठी नॉन स्टरोईड अँटी – इन्फ्लेमेंटरी औषधे घेत असतो. परंतु या औषधांमुळे किडनीला हानी होण्याची शक्यता आहे. त्यातच जर तुम्ही अशी औषधे वारंवार घेणं टाळले तर तुमच्या किडनीच्या आरोग्याच्या दृष्टीने ही गोष्ट अत्यंत फायदेशीर ठरेल.

उच्च रक्तदाब हे किडनीचे आरोग्य बिघडण्याचे एक कारण आहे. जेवणात मिठाचे प्रमाण अधिक असल्यास रक्तदाब वाढू शकतो. त्यामुळे जेवणात मीठ कमी कसे वापरता येईल किंवा कमी मीठ वापरून तयार केलेले जेवण घेण्याची सवय तुम्हाला तुम्हाला फायदेशीर ठरेल. जेवणात वरून मीठ घेणे हे देखील तुमच्या आरोग्याला हानिकारक आहे. तसेच किडनीच्या आरोग्यासाठी व संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी तुम्हाला रात्रीची चांगली झोप गरजेची आहे.

एकाच जागी बसून असणं देखील किडनीचे आरोग्याला हानिकारक आहे. जर तुमची कार्यशैली एकाच ठिकाणी बसून असेल. दर एक दोन तासाला थोडंसं जमेल तेवढं चालणं गरजेचं आहे. कारण जर तुमच्या शरीराची हालचालच नसेल तर त्याचा तुमच्या किडनीच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तुम्ही जरी एका ठिकाणी बसून काम करत असाल तरी तुम्ही अधून मधून हालचाल केली पाहिजे. त्याचा फायदा तुम्हाला बऱ्याच गोष्टींसाठी होईल.

दररोज कमीत कमी ३ ते ४ लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. कारण पाणी पिल्याने किडनी स्टोन आजार तुम्हाला टाळता येईल. कारण जास्त पाणी पिण्याने शरीरातील टॉक्सिक आणि सोडियम बाहेर काढण्यास मदत होत असते. तसेच धूम्रपान देखील किडनीला ईजा पोहोचण्यास मदत करते. धूम्रपानामुळे फुफ्फुस आणि लिव्हरला ईजा होण्याची शक्यता नाकारता येत नाही परंतु किडनीच्या आरोग्यावर देखील त्याचा परिणाम होतो.

जर तुम्हाला तुमच्या किडनीचे आरोग्य उत्तम ठेवायचे असेल तर हे 4 पदार्थ गरजेचे आहेत.
1. आलं: आलं हे बऱ्याचदा आपण चहामध्ये टाकून घेत असतो. आपल्याकडे आल्याचा चहा प्रसिद्ध आहे. आल्यात जिंजरॉल नावाचा घटक असतो, जो शरीराच्या शुद्धीकरणासाठी फायदेशीर आहे. त्यामुळे आलं हे डिटॉक्स एजंट (Detox Agent) ओळखले जाते. बऱ्याच आयुर्वेदिक औषधींमध्ये आलं वापरले जाते. आलं हे किडनी तसेच लिव्हरमधील घातक घटक बाहेर काढण्यास फायदेशीर आहे. तसेच आल्याचे इतर देखील फायदे आहेत. आले रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यात फायदेशीर आहे.

2. हळद: किडनीच्या आरोग्याच्या दृष्टीने हळद खूप महत्वाची आहे. आपल्या किडनीला होणारा संसर्ग तसेच लघवी मार्गाला होणारा संसर्ग (Infection) आणि वेगवेगळे आजार टाळण्यासाठी हळद खूपच फायदेशीर आहे. शक्यतो प्रत्येक स्वयंपाक घरात जेवणात हळदीचा वापर होतच असतो. परंतु तरीसुद्धा आठवड्यातून एक किंवा दोन वेळा हळद टाकून उकळलेले दूध प्यायला हवे किंवा हळद आणि आल्याचा काढा करून प्यायाला हवा. तज्ञांच्या मतानुसार जर तुम्ही हे नियमितपणे केल्यास किडनी निकामी होण्याचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी होतो. तसेच तुमची रोगप्रतिकारक शक्तिदेखील वाढेल. तसेच हळदीमध्ये कर्करोग (कॅन्सर) रोगाला वाढण्यापासून थांबवू शकते.

3. धने: किडनीच्या आरोग्याच्या दृष्टीने धने खूपच फायदेशीर ठरतात. आपल्या स्वयंपाकघरात धने कायम असतातच. परंतु जर मसालेदार भाज्या वगैरे केल्या तरच आपण धने वापरत असतो. मुत्राशयाचा संसर्ग किंवा मूत्राशयाचा इतर कुठलाही आजार होऊ नये म्हणून धने फायदेशीर आहेत. जर किडनीला निरोगी ठेवायचे असेल तर धने नियमित खाणं गरजेचं आहे. आपण नियमित पण जेवणात थोडा थोडा धन्याचा वापर करू शकतो. धन्याची पावडर तुम्ही जेवणात थोडी थोडी वापरू शकता. शक्यतो जर तुम्ही धने भाजून त्याची पावडर केली तर मग अजूनच फायदेशीर ठरेल. ही पावडर तुम्ही प्रत्येक भाजीत वापरू शकता.

4. त्रिफळा: आवळा, हिरडा आणि बेहडा या टी तिघांना एकत्रित केल्यावर त्रिफळा चूर्ण बनते. त्रिफळा चूर्ण देखील किडनीच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे आहे. सोबतच लिव्हरचे काम व्यवस्थित ठेवण्यासाठी देखील त्रिफळा चूर्ण फायदेशीर आहे. त्रिफळा बद्धकोष्ठतेसाठी देखील खूपच फायदेशीर आहे. अशक्तपणा घालवण्यासाठी देखील त्रिफळा फायदेशीर आहे. तसेच त्रिफळा चूर्णमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, पचनक्रिया चांगली होते, डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते. त्वचेचे आरोग्य देखील त्रिफळाने उत्तम राहते.

महत्वाच्या बातम्या: Lifestyle: या पाच कारणांमुळे मुलं साडी नेसलेल्या मुलींकडे होतात आकर्षित: कारण जाणून व्हाल आश्चर्यचकित.. 

Lifestyle: दररोज सेक्स केल्याने काय होतं माहिती आहे? से क्स विषयी जाणून घ्या सविस्तर.. 

Marriage tips: लग्नाच्या पहिल्या रात्री या पाच चूका केल्यास ‘से’क्स लाईफ सुरू होण्यापूर्वीच संपेल.. 

Goat Farming: शेळीपालन करण्यासाठी या बँका देतायत पन्नास हजारांपासून इतक्या लाखांपर्यंत कर्ज; असा करा अर्ज.. 

Death signs: मृत्यू होण्यापूर्वी मनुष्याला मिळतात हे आठ संकेत.. 

Jobs in Maharashtra: बारावी आणि ग्रॅज्युएशन विद्यार्थ्यांनासाठी नोकरीची सुवर्णसंधी! परीक्षा विना केली जाणार निवड; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.