Death signs: मृत्यू होण्यापूर्वी मनुष्याला मिळतात ‘हे’ आठ संकेत..

Death signs: मृत्यू म्हणजे आयुष्याचा शेवट. ते प्रत्येकाच्या आयुष्यात येणारच आहे. त्यातून कोणालाही सुटका नाही. मृत्यू कधी कोणाचा होईल, हे तर कोणच सांगू शकत नाही. बरेच लोक म्हणतात थोड्या वेळापूर्वी माझ्यासोबत बोलला, तंदुरुस्त वाटत होता. सांगायचे तात्पर्य एवढं की आजकाल मरण खूप सोपं झालंय. कोरोना महामारीपासून तर ते अधिकच सोपं झालं, असं वाटायला लागले. कोरोना महामारीत अक्षरशः उत्तर प्रदेश सारख्या ठिकाणी मयतांचे शरीर नदीत टाकून देण्यात आले होते. महाराष्ट्रात देखील परिस्थिती भयंकर होती. अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीत कितीतरी डेड बॉडी पडून होत्या. हृदयविकाराचा धक्का हे देखील अनेक लोकांच्या मृत्यचे कारण बनत चालले आहे. हृदय विकाराने देखील बऱ्याच लोकांचा मृत्यू झाल्याचे आपण वारंवार पाहिले असेल. व्हायग्रा पुरुषांच्या लैंगिकतेवर असं करत काम; अतिसेवन झाल्यास होतात हे गंभीर दुष्परिणाम..

मृत्यू होण्याच्या वयाच्या व्याख्येत बदल झाला आहे, असं आजकाल बोललं जाते. कारण पूर्वी तरुत वयात मृत्यू येण्याचं प्रमाण आजच्या एवढं नक्कीच नव्हते. बरीच लोकं 80-90 वर्ष आरामात जगत होती. आजकाल वीस पंचवीसीतील तरूण मुलांना देखील हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे आपण पहात आहे. त्याला आजकालची बदलत चाललेली जीवनशैली देखील तेवढीच कारणीभूत आहे. आजकालच्या तरुणाईचा आहार, धकाधकीचे जीवन, मोबाईलवर सतत व्यस्त राहणे, व्यायाम न करणे, जिभेचे चोचले पुरवणारे अन्नपदार्थ सतत खात राहणे याच गोष्टींमुळे तरुणाई आजाराच्या विळख्यात गुंतत चालली आहे.शारीरिक संबंधांमध्ये अधिक अंतर पडल्यास, तुमच्या आरोग्यावर होतात हे सहा गंभीर परिणाम..

जर तुम्ही पूर्वीच्या जुन्या लोकांशी बोलला असाल तर पूर्वी जुने म्हातारे लोक सांगायचे की, अगोदर मरण पावलेली व्यक्ती मरण येण्याअगोदर लोकांना बोलायची. त्यांच्या बोलण्यातून आता त्यांच्या मृत्यू जवळच आला आहे, असे ते वाटायचे. म्हणजे उदाहरण द्यायचे झाले तर, “माझ्या म्हातारीची काळजी घ्या रे, तिने खूप कष्ट केलंय, लय खस्ता खाल्ल्यात मी गेल्यानंतर तिला कशाचीही कमी पडू देऊ नका.” किंवा मग कधीकधी ते आपल्या मुलींना बोलवून घ्यायला लावायचे. जर मुल लांब असतील तर त्यांना बोलावून घ्यायला लावायचे. माझा जायचा वेळ झालेला आहे, असे बोलायचे. म्हणजे खऱ्या अर्थाने त्यावेळी त्या लोकांना आता आपल्याला आपला देह सोडावा लागणार आहे, हे समजत असावे. त्यांना कदाचित तसे संकेत देखील मिळत असतील. दररोज से क्स केल्याने काय होतं माहिती आहे? से क्स विषयी जाणून घ्या सविस्तर..

परंतु आजकाल सर्व तंत्रज्ञान आले आहेत. पूर्वी एखाद्याला काही बोलायचे म्हटले की, पत्र पाठवावे लागत असायचे. मग त्याचे उत्तर तिकडून यायचे. म्हणजे एवढी वाट बघावी लागत होती. एखादी व्यक्ती पाहुण्याच्या गावाला चालली असेल तर ती लोकांना विचारायची अमुक अमुक गावाला चाललो आहे, कोणाचा काही निरोप आहे का? परंतु आजकाल ती पद्धत बंद झाली. कारण आजकाल प्रत्येकाच्या हातात मोबाईल नावाची वस्तू आहे. अगदी ५०० रुपयांपासून ते लाखात मिळणारे मोबाईल उपलब्ध झाल्याने गरिबापासून श्रीमंतांच्या हातात मोबाईल आला आहे आणि हे काम अगदी चुटकीसरशी होत असते.

पूर्वी एखाद्या गावाला जायचे म्हटले की लोकांना बैलगाडीने जावे लागत होते. मग लोक मध्ये कुठेतरी थांबून घरून घेऊन गेलेल्या शिदोरीवर ताव मारत असायचे. मग पुन्हा पुढच्या प्रवासाला लागत असायचे. बैलगाडीचा वेग तर तुम्हाला सांगण्याची गरज नाही. परंतु सध्या तुम्हाला एवढा उपद्व्याप करण्याची गरज नाही. तुम्ही कुठे जायचे असेल तर लगेच तुमची दोनचाकी किंवा चारचाकी कार घेऊन कुठेही जाऊ शकता. आजकाल अपघाताचे देखील प्रमाण वाढले आहे.

दररोज कितीतरी मृत्यू अपघाताने होत असल्याचे आपण पाहिले असेल. म्हणजेच जसे तंत्रज्ञान विकसित होत गेले. तसे मृत्यूचे देखील स्पीड वाढलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे पूर्वीच्या लोकांप्रमाणे आपल्या मृत्यूची चाहूल सध्याच्या पिढीला लागत असेल हा देखील संशोधनाचा विषय आहे. मृत्यूच्या अगोदर मनुष्याला काय संकेत मिळतात जाणून घेऊ सविस्तर.

शरीराच्या भागांवर होतात परिणाम

मरणाच्या अगोदर त्याने अंग टाकले होते, एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर, आपल्या घरातील मंडळी असं बोलताना तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. आपण अनेकदा त्याचाकडे दुर्लक्ष करतो. मात्र गरुड पुराणात सांगितल्याप्रमाणे याला महत्व आहे. आणि मृत्युच्या अगोदर असे संकेत मिळत राहतात. संबंधित व्यक्तीचे हातपाय अनेकदा थरथरायला देखील लागत असल्याचे
गरुड पुराणामध्ये सांगण्यात आले आहे.

बोलण्यात अडचणी निर्माण होतात

गरुड पुराणामध्ये सांगण्यात आल्याप्रमाणे, मृत्यूच्या अगोदर माणूस बोलताना अनेकदा अडखळतो. नेहमी उत्तम गप्पा मारणारा मनुष्य अचानक भलतच काहीतरी बोलू लागतो. विषय वेगळा चालला असताना तो वेगळ्याचं विषयावर बोलताना तुम्ही देखील पाहिलं असेल. जर असं होतं असेल तर समजून जा मनुष्याचा मृत्यू जवळ आला आहे.

चव देखील कळत नाही.

गरुड पुराणामध्ये सांगितल्याप्रमाणे, मनुष्याला मृत्यूचे अनेक संकेत मिळतात. त्यामध्ये तोंडाची चव गेलेली असते. हे देखील एक संकेताचे लक्षण आहे. मृत्यू होण्याच्या अगोदर मनुष्य घरामध्ये जेवण वेळेवर करत नाही. शिवाय त्याच्या आहारापेक्षा तो कमी खूप कमी जेवण करतो. याचाच अर्थ त्याच्या तोंडाला चव नसते. हे देखील मृत्यूच्या अगोदर मिळणारे संकेत आहे.

शरीर पिवळसर पडते

मृत्युच्या अगोदर मनुष्याला अनेक संकेत मिळतात. यामध्ये त्याचे शरीर पिवळे पडल्यासारखे दिसू लागते. अनेकांना यावर विश्वास बसणार नाही. मात्र ही माहिती गरुड पुराणामधील गृहितकावर आधारित आहे. या बरोबरच मृत्यूच्या अगोदर शरीर पांढरे पडल्यासारखे देखील वाटते.

हे अवयव येतात जड
मनुष्याचा मृत्यू जवळ आल्यानंतर, त्याला अनेक संकेत मिळतात. त्यामधे, जीभ, तोंड, डोळे, कान तसेच नाक खूप जड जड अगदी दगडासारखे जाणवू लागते. जर हे लक्षण असेल, तर त्या मनुष्याचा मृत्यू जवळ आला आहे,  असे सांगण्यात आले आहे.

सावली देखील दिसत नाही.

गरुड पुराणामध्ये मनुष्याचा मृत्यू जसजसा जवळ येऊ लागतो, तसतसे त्याला अनेक संकेत मिळतात. त्यात त्याची त्याला सावली देखील दिसत नाही. असे सांगण्यात आले आहे. अनेकांना यावर विश्र्वास बसणार नाही. मात्र हे खरे आहे. मृत्यू जवळ आल्यानंतर संबंधीत मनुष्याला स्वतःची सावली दिसत नसल्याचा भास होतो. गरुड पुराणामधील सांगितल्या गृहितकामध्ये असे वर्णन केले आहे.

यमराजने पाठवलेले दूत लागतात दिसू

मनुष्याचा मृत्यू फारच जवळ आला असेल, तर त्या व्यक्तीला सावली ऐवजी त्याला यमराजने पाठवलेले दूत दिसू लागतात. साहजिकच यामुळे तो मनुष्य प्रचंड घाबरतो. आणि यामुळे त्याला आपली माणसे देखील दिसत नाहीत. यामुळेच तो काहीही बरळू लागतो. आणि त्याच्या तोंडाची चव निघून जाते.

शरीराचा वास देखील येऊ लागतो.

गरुड पुराणामधील सांगितल्याप्रमाणे, गृहितकामध्ये मनुष्याचा मृत्यू जर फारच जवळ आला असेल, तर त्याला त्याच्या शरीराचा वास देखील येऊ लागतो. एवढंच नाही तर यामुळे त्याला त्याचे पाण्यात प्रतिबिंब देखील दिसत नसल्याची माहिती यामध्ये दिली गेली आहे.

टीप- ही माहिती गृहितकावर आधारित आहे. याच्याशी महाराष्ट्र लोकशाही खात्री देत नाही.

हे देखील वाचा Lifestyle: महिलांच्या या भागांवर केस असतील तर मानले जाते शुभ नवराही समजला जातो भाग्यवान..

Lifestyle: महिलांमध्ये हे पाच गुण असतील, तर पती समजले जातात भाग्यवान; संसाराचा गाडाही सुटतो सुसाट..

Lifestyle: नदीत नाणं का फेकतात? घरात लिंबू मिरची का बांधतात? अंत्यसंस्कार केल्यानंतर आंघोळ का करतात? जाणून घ्या शास्त्रीय कारणे..

Second hand bike: जबरदस्त कंडिशन असणारी CB shine केवळ १८ हजारांत तर pulsar फक्त १५ हजारांत; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

second hand Hero Splendor Plus: दहा हजार किलोमीटर पळालेली hero-splendor-plus मिळतेय फक्त २१ हजारांत; जाणून घ्या डिटेल्स..

Railway job: दहावी पास विद्यार्थ्यांसाठी रेल्वेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी; परीक्षेविना केली जाणार निवड,जाणून घ्या अधिक..

Agneepath Scheme: अग्नीपथ योजनेअंतर्गत देशातील या तरुणांना चार वर्ष करता येणार देशसेवा; 40 हजार पगारासह मिळणार अनेक सुविधा..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.