Lifestyle: महिलांच्या ‘या’ भागांवर केस असतील तर मानले जाते शुभ नवराही समजला जातो भाग्यवान..

0

Lifestyle: पुरुषांच्या शरीरावरील केस (body hair) असणे ही सामान्य बाब आहे. अनेक पुरुषांच्या अंगावर खूप मोठ्या प्रमाणात केस असतात. असे पुरुष भाग्यवान समजले जातात. मात्र काही महिलांच्या शरीरावर देखील केस असतात. महिलांच्या शरीरावर केस असतील, तर हे शुभ मानले जाते. हे तुम्हाला माहिती आहे का? एवढेच नाही, तर अशा महिलांचे पती देखील खूप भाग्यवान समजले जातात. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल, मात्र ज्योतिष तसेच समुद्रशास्त्रामध्ये देखील याबाबत सविस्तर वर्णन करण्यात आले आहे. आज आपण याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.

पुरुषांच्या अंगावर केस असणे ही सामान्य बाब असते, मात्र महिलांच्या अंगावर केस असतील तर, अनेकांना विचित्र वाटते. स्वतः महिला देखील अंगावर केस असतील तर न्यूनगंड बाळगतात. सहाजिकच त्यामुळे आपल्या शरीरावर असणारे केस महिला काढून टाकतात. अनेकांना या विषयी माहिती नाही, महिलांच्या अंगावर केस असतील, तर हे शुभ समजलं जातं. एवढेच नाही, तर त्यांचे पती देखील खूप भाग्यवान समजले जातात. आता आपण महिलांच्या कोणत्या भागावर केस असतील, तर ते शुभ मानले जाते, आणि त्याचे काय परिणाम होतात? याविषयी सविस्तर जाणून घेऊ.

महिलांच्या हातावर केस असतील काय होते?

महिलांच्या हातावर जर केस असतील, तर शुभ मानले जाते. एवढेच नाही तर, त्यांचे पती देखील भाग्यवान समजले जातात. मात्र हातावर केस असतील, तर नक्की काय होतं? ज्योतिष तसेच समुद्रशास्त्रात वर्णन केल्याप्रमाणे, हातावर केस असणाऱ्या महिला हिंमतवान असते.

समर्पणाने काम करण्याची ताकद

ज्या महिलांच्या हातावर केस असतील अशा महिला खुप भाग्यवान तर असतात हे आपण पाहिलं. मात्र अशा महिला हिंमतवान असतात, आणि कोणतेही काम करण्यासाठी समर्पणाने सामोरे जातात. सहाजिकच त्यामुळे संसाराचा गाडाही सुसाट सुटणार यात शंका नाही. आणि यामुळे त्यांचे पती देखील आपल्या पत्नीच्या कार्याबाबतीत समाधानी आणि खूष असतात. सुखाचा संसार होण्यासाठी पत्नी कुठल्याही अडचणीचा सामना करण्यासाठी सक्षम असेल, तर पती देखील कोणतेही निर्णय घेताना मागेपुढे पाहत नाही.

लक्ष्मी प्राप्ती

हातावर केस असणाऱ्या महिलांना प्रचंड श्रीमंत समजलं जातं. अशा महिलांकडे लक्ष्मीचा वास असतो. अशा महिलांकडे पैशाची कमतरता नसते. कोणत्याही कामात अशा महिलांना यश मिळत असतं. साहजिकच याचे परिणाम त्यांच्या पतीवर होतात, आणि ते देखील भाग्यवान समजले जातात. मात्र अलीकडे महिला सौंदर्याच्या कारणामुळे आपल्या शरीरावर असणारे केस काढताना पाहायला मिळतात.

छातीवर केस असतील काय होते? 

हाताबरोबरच महिलांच्या छातीवर देखील केस असतात. अशा महिला खुप भाग्यवान समजल्या जातात. अशा महिला स्वभावाने खूप प्रेमळ आणि समाधानी असतात. अशा महिलांमध्ये चिडचिडेपणा खूप कमी असतो. अनेक विषयांना समजून घेण्याची पद्धत त्यांची खूप उत्तमरित्या असल्याने संसारात देखील काही अडचणी उद्भवत नाहीत. आणि याचा परिणाम थेट आपल्या पतीच्या आयुष्यावर देखील होताना पाहायला मिळतो.

कानावर केस असतील तर काय होतं?

कानावर केस असतील, तर त्याच्या आयुष्यात खूप पैसा असतो. असं तुम्ही अनेक वेळा ऐकलं असेल. ज्योतिष शास्त्रानुसार कानावर केस असतील, तर कमी कष्ट करून अशा लोकांना भरपूर पैसा आणि यश मिळत असल्याचं बोललं गेलं आहे. अशी लोकं खूप प्रतिभावान असतात. शिवाय या लोकांवर भगवंताची देखील इतर लोकांच्या तुलनेत अधिक कृपा असल्याचे देखील ज्योतिषशास्त्रात नमूद करण्यात आलं आहे.

टिप: प्राथमिक माहितीच्या आधारावर ही माहिती देण्यात आली आहे, याविषयी महाराष्ट्र लोकशाही खात्री देत नाही.

 हे देखील वाचा Railway Jobs 2022: दहावी पास उमेदवारांसाठी रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी! परिक्षेविना अशी केली जाणार निवड; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Second hand bike: जबरदस्त कंडिशन असणारी CB shine केवळ १८ हजारांत तर pulsar फक्त १५ हजारांत; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

second hand Hero Splendor Plus: दहा हजार किलोमीटर पळालेली hero-splendor-plus मिळतेय फक्त २१ हजारांत; जाणून घ्या डिटेल्स..

10th result 2022: ठरलं! दहावीचा निकाल लागणार या तारखेला; या पद्धतीने पाहता येणार निकाल..

effects of lack of sex: शारीरिक संबंधांमध्ये अधिक अंतर पडल्यास, तुमच्या आरोग्यावर होतात हे सहा गंभीर परिणाम..

Flipkart End of Season Sale: Flipkart चा धूमधडाका! हे स्मार्टफोन खरेदी करता येणार निम्म्या किंमतीत..

Flipkart Big Bachat Dhamaal: फ्लिपकार्टचा धमाका! Smartphone तसेच electronic वस्तूंवर तब्बल ७० टक्क्यांपर्यंत सूट; जाणून घ्या अधिक..

Lifestyle: महिलांमध्ये हे पाच गुण असतील, तर पती समजले जातात भाग्यवान; संसाराचा गाडाही सुटतो सुसाट..

Lifestyle: पुरुषांच्या या चार गोष्टींवर महिला टाकतात जीव ओवाळून; जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.