Railway Jobs 2022: दहावी पास उमेदवारांसाठी रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी! परिक्षेविना ‘अशी’ केली जाणार निवड; जाणून घ्या सर्व डिटेल्स..
Railway Jobs 2022: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल (10th exam result) दोन दिवसात लागणार असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून दहावीचे विद्यार्थी निकालाची प्रतीक्षा करत आहेत. विद्यार्थ्यांबरोबरच पालक देखील आपल्या पाल्याच्या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. निकाला बरोबरच दहावीच्या विद्यार्थ्यांना आता दुहेरी आनंद मिळणार आहे. या आनंदाचे कारण म्हणजे, नॉर्थ ईस्ट फ्रंटियर रेल्वेने (Indian railways) अनेक ठिकाणी शिकाऊ पदांच्या जागा भरण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. यासंदर्भात अर्ज मागवण्यात आले असून, अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे.
बेरोजगारीचा दर दिवसेंदिवस वाढत चालला असल्याने नोकरी मिळवणं अलीकडच्या काळात मोठं आव्हान आहे. महागाई देखील दिवसेंदिवस वाढत चालली असल्याने, आता सर्वसामान्य कुटुंबाततील व्यक्तींना उच्च शिक्षण न घेता कुठेतरी चार पैशाचे नोकरी मिळवणं फार आवश्यक बनलं आहे. तुम्ही देखील नोकरीच्या शोधत असाल आणि भारतीय रेल्वेमध्ये नोकरी करू इच्छित असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे. भारतीय रेल्वेमध्ये नोकरी करू इच्छीत असणाऱ्या तरुणांसाठी भारतीय रेल्वेने मेगा भरती आयोजित केली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून ठेवण्यात आली असून, या भरतीसाठी एकूण 5636 जागा भरण्यात येणार आहेत.
वयोमर्यादा आणि पात्रता
भारतीय रेल्वेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, या भरतीसाठी तब्बल पाच हजार सहाशे छत्तीस जागा भरण्यात येणार आहेत. भारतीय रेल्वेने जारी केलेल्या अधीसूचनेनुसार, विद्यार्थ्यांच्या वयाचा आणि शैक्षणिक पात्रतेचा विचार करायचा झाल्यास, या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांची दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. याबरोबरच विद्यार्थ्यांनी ITI मध्ये पदवी संपादन करणे आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आयटीआय पदवी संपादन केली नसेल, अशा विद्यार्थ्यांना परीक्षेस बसता येणार नाही.
ज्या विद्यार्थ्यांची दहावी झालेली असेल, आणि ज्यांचा आयटीआय झालेला असेल, अशाच विद्यार्थींना या परीक्षेसाठी पात्र होता येणार आहे. अधिसूचनेनुसार या परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वयाचा विचार करायचा झाल्यास, या परीक्षेसाठी पात्र होण्यासाठी विद्यार्थ्यांचे वय १५ ते २४ वर्ष ठेवण्यात आलेले आहे. आता आपण विद्यार्थ्यांची या भरती प्रक्रियेसाठी निवड कशी केली जाणार? याविषयी सविस्तर जाणून घेऊ.
उमेदवारांची अशी केली जाणार निवड
भारतीय रेल्वेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, या परिक्षेसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची निवड ही दहावीच्या गुणांवर तसेच आयटीआयमध्ये मिळालेल्या गुणांवर निवड करण्यात येणार आहे. दहावीच्या गुणांची आणि आयटीआयमध्ये मिळालेल्या गुणांची यादी प्रसारित करण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना दहावीमध्ये आणि आयटीआयमध्ये देखील चांगले गुण असतील, अशा विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारची परीक्षा देण्याची आवश्यकता नसणार आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्याकडून 100 रुपये आकारण्यात येणार आहे.
असा अर्ज करा
या परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना सर्वप्रथम आपल्या मोबाईल मधील क्रोमवर जाऊन nfr.indianrailways.gov.in असं सर्च करावं लागणार आहे. क्रोमवर जाऊन nfr.indianrailways.gov.in असं सर्च केल्यानंतर, तुमच्या समोर रेल्वेची अधिकृत वेबसाईड ओपन झालेली दिसेल.
या नंतर तुम्हाला ‘जनरल इन्फो’ या पर्यायावर क्लिक करावं लागणार आहे. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला पुन्हा ‘रेल्वे रिक्रूटमेंट सेल’ या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
इथपर्यंत व्यवस्थित प्रोसेस केल्यानंतर, तुम्हाला अर्जाच्या लिंकवर जाऊन या संदर्भातला तपशील काळजीपूर्वक भरावा लागणार आहे. हा तपशील भरल्यानंतर, तुम्हाला कागदपत्रे अपलोड करून अर्ज भरवा करणे आवश्यक आहे. आता आपण या भरतीसाठी कुठे कुठे किती जागा भरायचा आहेत? या संदर्भात देखील सविस्तर जाणून घेऊ.
रिक्त जागांचा तपशील
कटिहार (KIR) त्याचबरोबर TDH कार्यशाळासाठी 919 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. रंगियासाठी (RNY): तब्बल 551 रिक्त जागा भरण्यात येणार. लुमडिंग (एलएमजी) / कार्यशाळा / एमएलजी/ एस अँड टी (पीएनओ) आणि ट्रॅक मशीन यासाठी तब्बल 1140 रिक्त जागा भरण्यात येणार. तिनसुकियासाठी (TSK) 547 रिक्त जागा भरण्यात येणार.
अलीपुरद्वारसाठी एकूण रिक्त जागा (APDJ): 522 भरण्यात येणार. नवीन बोंगाईगाव कार्यशाळा (NBQS) तसेच EWS/BNGN साठी एकूण 1110 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. आणि दिब्रुगड कार्यशाळेसाठी (DBWS): तब्बल 847 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
हे देखील वाचा Mahaforest Recruitment 2022: महाराष्ट्र वन विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी! मासिक वेतन ४० हजार..
Lifestyle: महिलांमध्ये हे पाच गुण असतील, तर पती समजले जातात भाग्यवान; संसाराचा गाडाही सुटतो सुसाट..
Flipkart End of Season Sale: Flipkart चा धूमधडाका! हे स्मार्टफोन खरेदी करता येणार निम्म्या किंमतीत..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम
Comments are closed.